Join us

योग्य मापाची ब्रा कशी निवडाल? ३ टिप्स, परफेक्ट फिटिंग चटकन ओळखा, उन्हाळ्यात घ्या विशेष काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2024 18:14 IST

How To Choose Perfect Size Bra For Yourself: चुकीच्या मापाची ब्रा घातली तर त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. शिवाय शरीर बेढबही दिसू लागतं. म्हणूनच ब्रा नेहमी परफेक्ट मापाचीच पाहिजे. (3 important tips for perfect bra size)

ठळक मुद्देजास्त घट्ट किंवा जास्त सैल मापाचं ब्रा घातलं तर त्यामुळे शरीर तर बेढब दिसतेच. पण त्याचा शारिरीक त्रासही होतो.

मुली वयात आल्यापासून त्यांची आई त्यांना ब्रा घालण्याची सवय लावते. सुरुवातीला सवय नसल्याने कठीण जातं. पण हळूहळू ते सवयीचं होऊन जातं. पण वयाच्या १५- १६ व्या वर्षीपासून आपण जो कपडा घालतो, तो आपल्यासाठी परफेक्ट मापाचा आहे की नाही, हे कित्येकींच्या लक्षातही येत नाही. जास्त घट्ट किंवा जास्त सैल मापाचं ब्रा घातलं तर त्यामुळे शरीर तर बेढब दिसतेच. पण त्याचा शारिरीक त्रासही होतो (How to know your bra size is correct). म्हणून आपण घालतो आहोत ते ब्रा आपल्यासाठी परफेक्ट मापाचं आहे की नाही (how to choose perfect size bra for yourself), हे ओळखण्यासाठी या ३ सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (3 important tips for perfect bra size)

 

तुम्ही घालता ते ब्रा योग्य मापाचं आहे की नाही ते कसं ओळखायचं?

आपण घातलेलं ब्रा हे आपल्यासाठी योग्य मापाचं आहे की नाही, हे सगळ्यात सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं, याविषयीचा एक व्हिडिओ ishitasalujaimageconsultancy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

अस्सल हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

१. यामध्ये ज्या ३ गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हातांची खाली- वर अशी हालचाल करा. हाताच्या प्रत्येक हालचालीसोबत जर छातीचा भागही हलताना दिसत असेल तर तुम्ही चुकीच्या मापाची ब्रा घालत आहात

 

२. ब्रा घातल्यानंतर ब्रा कप्सच्या वरच्या बाजुला काखेच्या जवळ जर त्वचेचा बराचसा भाग बाहेर आल्यासारखा, फुगल्यासारखा वाटत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही खूप घट्ट ब्रा घालत आहात.

उन्हामुळे त्वचा रापल्यासारखी दिसते? बघा १ खास फेसपॅक, १० मिनिटांत त्वचा होईल स्वच्छ- चमकदार

३. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रा चा खालच्या भागातला जो मागचा आणि पुढचा बेल्ट असताे, तो मागून आणि पुढून अशा दोन्ही बाजुंनी एका सरळ रेषेतच दिसला पाहिजे. तो जर मागून किंवा पुढून खाली लोंबल्यासारखा किंवा वर ओढल्यासारखा वाटत असेल तर ती ब्रा चुकीच्या मापाची आहे. 

 

टॅग्स :खरेदीमहिलाआरोग्यहेल्थ टिप्स