Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात नुसतेच स्टायलिश गॉगल उपयोगाचे नाही; ४ गोष्टी पाहूनच करा खरेदी, नाहीतर डोळ्यांचं नुकसानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 17:31 IST

Shopping Tips for Summer Special Sun Glasses: उन्हाळ्यात गॉगल घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे...(how to choose goggle or sunglasses for summer?)

सध्या वातावरण अतिशय गरम झालेलं आहे. दुपारच्यावेळी तर उन्हाचा कडाका भयंकरच असतो. पण सकाळी अगदी १० वाजेच्या आधीही घराबाहेर पडायला नकोसं वाटावं एवढं ऊन वाढलेलं असतं. उन्हामुळे मग साहजिकच डोळे चमकायला लागतात. उन्हाचा कडाका डोळ्यांना सहन होत नाही. त्यामुळे मग गॉगल लावावाच लागतो. एरवी हौस म्हणून स्टायलिश गॉगल लावणं चालू शकतं. पण उन्हाळ्यात मात्र गॉगल ही फक्त स्टाईल नसून गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात गॉगलची खरेदी थोडी काळजीपुर्वक करणं गरजेचं आहे. नाहीतर डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं...(how to choose goggle or sunglasses for summer?)

 

उन्हाळ्यात गॉगल विकत घेताना कोणती काळजी घ्यावी?

१. उन्हाळा सुरू झाला की ठिकठिकाणी गॉगलचे स्टॉल लागलेले दिसतात. अगदी प्रत्येक शहरातल्या कित्येक चौकांमध्ये, मुख्य रस्त्यांवर गॉगल विकायला असतात. त्याठिकाणी मिळणारे गॉगल अतिशय आकर्षक असतात. त्यामुळे साहजिकच ते घेण्याचा मोह होतो.

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

पण तो आवरा. कारण ते स्वस्तातले गॉगल तुमच्या डोळ्यांसाठी चांगले असतीलच असं नाही. कारण एरवी ते गॉगल लावण्यास हरकत नाही. पण उन्हाळ्यात जर खरोखर डोळ्यांचं संरक्षण करायचं असेल तर असे स्वस्तातले गॉगल टाळलेलेच बरे.

 

२. दुकानात गॉगल घेताना त्या गॉगलची फक्त स्टाईल बघू नका. शक्यतो ऊन असताना दुपारच्या वेळी गॉगल खरेदी करा. तो गॉगल घालून पाहा. खरंच डोळ्यांना शांत वाटत असेल तरच खरेदी करा.

कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

३. उन्हाळ्याच्या दिवसांत पिवळसर छटा असणारे गॉगल घेण्यापेक्षा काळपट, निळसर काचा असणारे गॉगल खरेदी करणं जास्त चांगलं. कारण या रंगांचे गॉगल डोळ्यांना जास्त गारवा देतात.

४. गॉगलच्या काचांचा आकार विचारात घ्या. खूप लहान आकाराचे गॉगल घेऊ नका. गॉगलची काच एवढी असावी की तिने तुमचा डोळा आणि डोळ्याच्या आजुबाजुचा काही भाग पुर्णपणे झाकला जावा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Stylish sunglasses aren't enough; buy wisely to protect your eyes.

Web Summary : Choose sunglasses carefully in summer. Avoid cheap options. Test for comfort in sunlight. Darker lenses (black, blue) are preferable. Ensure adequate coverage for eye protection.
टॅग्स :खरेदीसमर स्पेशलफॅशन