Lokmat Sakhi >Shopping > चुकीच्या दप्तरामुळे मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो! दप्तर खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

चुकीच्या दप्तरामुळे मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो! दप्तर खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

How To Choose Correct School Bag For Kids: मुलांसाठी दप्तर खरेदी करणार असाल तर काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे.(3 tips for the shopping of school bag)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 16:46 IST2025-06-03T16:46:09+5:302025-06-03T16:46:54+5:30

How To Choose Correct School Bag For Kids: मुलांसाठी दप्तर खरेदी करणार असाल तर काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे.(3 tips for the shopping of school bag)

how to choose correct school bag for kids, 3 tips for the shopping of school bag  | चुकीच्या दप्तरामुळे मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो! दप्तर खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

चुकीच्या दप्तरामुळे मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो! दप्तर खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

Highlightsमुलांना दप्तर वर्षभर पाठीवर वागवावं लागतं. त्यामुळे ते घेताना काही गोष्टी तपासूनच घ्यायला हव्या.

दोन ते अडीच महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपून आता लवकरच शाळेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या घरी शाळकरी लहान मुलं आहेत त्या घरांमध्ये मुलांच्या वह्या, पुस्तकं, दप्तर, डबा, वॉटरबॅग अशा वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. शाळा सुरू होणार  त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साह मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांमध्येही असतो. त्याच उत्साहाच्या भरात शाळेसाठी लागणाऱ्या  वस्तूंची खरेदीही केली जाते. बाजारात या दिवसांत खूप गर्दी असते. त्या गर्दीत आपल्याला आवडलेली वस्तू नीट पाहून घेणंही कधी कधी जमत नाही. त्यामुळे मग ती वस्तू जेव्हा आपण घरी येऊन थोडी शांतपणे बघतो तेव्हा तिच्यातल्या चुकीच्या गोष्टी दिसून येतात (how to choose correct school bag for kids?). असंच काहीसं मुलांच्या दप्तराच्या बाबतीतही होऊ शकतं. दप्तर मुलांना वर्षभर पाठीवर वागवावं लागतं. त्यामुळे ते घेताना काही गोष्टी तपासूनच घ्यायला हव्या.(3 tips for the shopping of school bag)

 

मुलांसाठी शाळेचं दप्तर घेताना कोणत्या वस्तू तपासून घ्याव्या?

१. दप्तराचं वजन

मुलांच्या दप्तराचं वजन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दररोज शाळेच्या निमित्ताने मुलांना किमान १ तास तरी ते दप्तर पाठीवर अडकवून ठेवावं लागतं.

'या' कारणामुळे चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन वाढतात! बघा उपाय- डाग जाऊन चेहरा उजळेल

दप्तराचं ओझं जर खूप जास्त असेल तर मुलांच्या पाठीला बाकही येऊ शकतो. तशी कित्येक उदाहरणे तुम्हीही आजुबाजुला पाहिलीच असतील. त्यामुळे दप्तर घेताना सगळ्यात आधी त्याचं वजन तपासून घ्या. ज्या दप्तराचं वजन हलकं असेल ते दप्तर थोडं महाग मिळालं तरी घ्या. 

 

२. दप्तराचा बंद

मुलांच्या दप्तराचा बंद दणकट असावा हे अगदी खरं आहे. पण कधी कधी बंद दणकट करण्याच्या नादात त्याचं वजनही खूपच वाढवलं जातं. शिवाय बंदाचा जो भाग मुलांच्या पाठीवर येतो, त्याठिकाणी व्यवस्थित कुशनिंगही नसते.

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

त्यामुळे मग मुलांच्या खांद्याला तो बंद काचू शकतो. म्हणूनच दप्तराचा बंदही तपासून घ्या. तो कमी वजनाचा आणि मऊ असावा.

३. दप्तराचे कप्पे

कधी कधी दप्तराच्या रंगाला, डिझाईनला आपण भुलतो आणि लगेचच ते घेऊन टाकतो. पण दप्तर खरेदी करताना त्याला किती कप्पे आहेत ते ही बघा. मुलांना जेवढी गरज आहे तेवढेच त्याचे कप्पे असावे. जास्त किंवा कमी नको. कारण दप्तराला जेवढे जास्त कप्पे असतात तेवढं त्याचं वजन वाढू शकतं. 

 

Web Title: how to choose correct school bag for kids, 3 tips for the shopping of school bag 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.