Join us  

How to choose perfect bra : ऑनलाईन किंवा दुकानातून न ट्राय करताच ब्रा विकत घेत असाल तर 'या' ५ गोष्टी नक्की ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 12:54 PM

How to choose perfect bra : अनेक स्त्रिया वर्षानुवर्षे एकाच प्रकारची ब्रा घालतात. त्यांच्या शरीरात बदल झालेला असतानाही.

ब्रा ही प्रत्येक महिलेसाठी रोजच्या वापरातली महत्वाची गोष्ट आहे. परंतु बहुतेक महिला ती विकत घेण्यास आणि त्याबद्दल बोलण्यास कचरतात. अनेकांना रोज घालतात त्या ब्राचा आकार, टाईपही अनेकांना माहीत नसतो. कधीकधी चुकीच्या आकाराची ब्रा योग्य समजली जाते. आधी मॉल्समध्ये ब्रा वापरून खरेदी करणे सोपे होते. पण आता तो पर्यायही कोविडपासून बंद झाला आहे कारण बहुतांश ठिकाणी ट्रायल रूम बंद करण्यात आल्या आहेत. (How to go bra shopping)

यासोबतच चांगल्या दर्जाच्या ब्राही ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण योग्य उत्पादन कसे निवडायचे हा प्रश्नही आहे. जर तुम्ही ऑनलाइन ब्रा खरेदी करत असाल किंवा तुम्हाला अशा ठिकाणाहून ब्रा विकत घ्यायची असेल जिथे वापरण्याची सोय नाही, तर तुम्ही काही खास हॅक्स वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला योग्य ब्रा निवडण्यात मदत होईल. (How to choose perfect bra)

ब्रा आरामदायक असायला हवी 

जेव्हा तुम्ही ऑनलाइन ब्रा खरेदी करता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या ब्रा उपलब्ध आहेत. तुम्हीही त्या स्टाइल्समुळे प्रभावित व्हाल, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ब्राच्या स्टाईलसोबत तुम्हाला आराम आणि सपोर्टचीही काळजी घ्यावी लागेल. बर्‍याच वेळा लोक हे विसरतात की एखाद्या विशिष्ट फॅब्रिकचे अंडरवेअर किंवा ब्रा त्यांना शोभत नाहीत किंवा लवचिक ब्रॅलेट्स सपोर्टिव्ह नाहीत. त्या फक्त स्टाईल्ससाठी विकत घेतात. अशी चूक करू नका, तुमच्या स्तनांच्या आरोग्यासाठी तुम्ही आराम आणि आधार या दोन्हींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

कव्हरेजबाबत माहिती घ्या

चांगली शैली, आराम आणि सपोर्ट तर आवश्यक आहेच, त्याच वेळी कव्हरेजची काळजी घ्या. पूर्ण कव्हरेज, अर्ध कव्हरेज किंवा पुश अप ब्रा, तुम्ही तुमच्या स्तनांनुसार घेत असलेल्या ब्राचा प्रकार निवडा. जर स्तन जड असतील तर फुल कव्हरेज ब्रा सर्वोत्तम असेल. अनेकदा लोक कपचा आकार आणि आराम पाहतात, परंतु कव्हरेजची माहिती घेत नाहीत, अशा स्थितीत, जड स्तन असलेल्या महिलांना खूप त्रास होऊ शकतो.

आकार तपासून पाहा

आपण आपल्या आकाराबद्दल पूर्णपणे खात्री बाळगू शकत नाही. अनेक स्त्रिया वर्षानुवर्षे एकाच प्रकारची ब्रा घालतात. त्यांच्या शरीरात बदल झालेला असतानाही. स्वत:साठी नवीन ब्रा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी साईझ तपासा. तुम्ही ऑनलाइन ब्रा आकाराचे कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता किंवा इंच टेपने तुमचा स्वतःचा आकार मोजू शकता. गेल्या वर्षी जी ब्रा साईज घेतली होती ती या वर्षीही घ्यावी, अशी चूक करू नका कारण शरीरात दरवर्षी बदल होत असतात, अशी चूक करू नका. तुम्ही ब्रा ऑनलाइन घेत असाल किंवा ऑफलाइन, दोन्हीमध्ये ब्राचा आकार मोजणे आवश्यक आहे.

एकाचवेळी अनेक ब्रा घेणं

तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असल्यास, एकाच वेळी अनेक ब्रा खरेदी करणे उत्तम. वास्तविक, ऑनलाइन शॉपिंगची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व वस्तू एकाच वेळी ऑर्डर करू शकता आणि ते परत करण्याचा पर्याय नेहमीच असतो. ब्रा खरेदीसाठी, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचा विश्वास असलेल्या साइट्सच निवडा.

रिटर्न पॉलिटी लक्षात ठेवा

हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीसाठी काम करेल. जर तुम्ही ब्रा खरेदी करत असाल तर रिटर्न पॉलिसी नक्कीच लक्षात ठेवा. कारण तुम्ही ट्राय न करता ब्रा खरेदी करत आहात, असे होऊ शकते की तुमच्या ब्राचा आकार बरोबर नसेल आणि तुम्ही घरी जाऊन ती घातल्यास फिटिंग विचित्र वाटेल. अशा परिस्थितीत, ती ब्रा परत करण्याचा पर्याय नेहमीच खुला असावा.

दर 9 महिन्यांनी तुमची ब्रा नेहमी बदला जेणेकरून तुमच्या स्तनांना योग्य आधार मिळेल.

ब्रा खरेदी करताना घामाचा फारसा परिणाम होणार नाही असे रंग निवडा.

जेव्हा तुमची ब्रा शेवटच्या हुकपर्यंत पोहोचते, तेव्हा तुम्ही ती बदलली पाहिजे.

नेहमी तुमच्या शरीरानुसार कपचा आकार निवडा.  A कप पातळ शरीरासाठी आणि D कप अतिशय जड शरीरासाठी योग्य आहे.

टॅग्स :खरेदीआरोग्यहेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य