Join us

केस पातळ-कोरडे झालेत? केस धुण्यासाठी 'हा' शॅम्पू वापरा- केसांसाठी रिपेअरिंग सोल्यूशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:25 IST

Herbal Essences Moroccan Argan Oil Shampoo : गळणाऱ्या-रुक्ष केसांसाठी उत्तम मुलायम पर्याय.

रोज विंचरताना केस गळतात, धुतानाही केस गळतात, केसांची वाढ खुंटलीये अशा समस्या  आजकाल प्रत्येक तरूण-तरूणीला उद्भवतात. (Hair Care  Tips) वारंवर हिटींग टुल्सचा केसांवर वापर केल्यानं कोरडे पडतात आणि गळायला सुरूवात होते. केस वाढवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं उपलब्ध आहेत पण याचा फारसा उपयोग केसांवर दिसून येत नाही.  आजकाल महिला केसांना स्ट्रेचनिंग, स्मूथनिंग करतात त्यानंतर तेल लावणं टाळतात.

केसांच्या वाढीबाबत विचार केला तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. हेअर फॉल कमी करण्यासाठी भरपूर शॅम्पू, तेलं वापरली जातात. पण आपल्या हेअर टाईपनुसार केसांना नेमका कोणता शॅम्पू सुट होईल, याची माहिती नसते. यावर सोपं सोल्यूशन म्हणजे हर्बल एसेन्सेस मोरोक्कन अर्गन ऑइल शॅम्पू (Herbal Essences Moroccan Argan Oil Shampoo)

मोरोक्कन अर्गन ऑइल शॅम्पूची खासियत

मोरोक्कन अर्गन ऑइल शॅम्पूमध्ये ९० टक्के नैसर्गिक घटकांचा याचा वापर केला जातो. हे तेल एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण आहे. याचा रंग पूर्णपणे सुरक्षित आहेत.  यात नैसर्गिक रंगाचा वापर केला असून यात पॅराबेन अजिबात नाही. पुरूष आणि महिलाही हे तेल वापरू शकतात. PETA ने हर्बल एसेन्सेसला मान्यता दिली आहे. या शॅम्पूचा सुगंध तीव्र नसून माईल्ड आहे आणि गुळगुळीत टेक्चर आहे.

हर्बल एसेन्सेस हा यूके स्थित ब्रँड आहे. या शॅम्पूचे 4 भिन्न प्रकार आहेत. केस खराब होतात कारण ते दिवसभर प्रदूषणाच्या संपर्कात येतात. हा शॅम्पू केसासाठी अशुद्धता काढून तुमचे केस सिल्की बनवतो. हर्बल एसेन्सेस अर्गन ऑइल शॅम्पू निळ्या रंगाच्या बाटलीमध्ये येतो. ज्यामध्ये बाटलीवर समोर आणि मागे दोन्ही बाजूंनी छापलेल्या शॅम्पूबद्दल सर्व माहिती असते.

फायदे

मोरोक्कन अर्गन ऑइल शॅम्पू डॅमेज झालेले केस दुरूस्त करण्यासाठी फायदेशीर ठरतो. जेणेकरून केस मऊ राहतात.  या शॅम्पूमुळे केस जास्तीत जास्तवेळ चांगले राहतात.  केसांचे टेक्सचर सुधारते,  स्काल्प स्वच्छ होतो, केस मुळापासून मजबूत होतात. 

किंमत 

494- 400 ML

व्हॅल्यू फॉर मनी

किंमतीच्या दृष्टीने शॅम्पूची क्वॉन्टीटी  आणि क्वालिटी उत्तम आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सकेसांची काळजीखरेदी