lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली Fuschia pink रंगाची साडी आठवते ना... सध्या या रंगाचा जबरदस्त ट्रेण्ड सुरु आहे. तुम्हीही अशी साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही ऑनलाईन शॉपिंग साईट नक्की चेक करा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 01:34 PM2021-11-12T13:34:44+5:302021-11-12T13:50:01+5:30

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली Fuschia pink रंगाची साडी आठवते ना... सध्या या रंगाचा जबरदस्त ट्रेण्ड सुरु आहे. तुम्हीही अशी साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही ऑनलाईन शॉपिंग साईट नक्की चेक करा....

This Fuschia pink sari worn by Malaika Arora on Diwali; Available Online in affordable price | मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

Highlightsऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही रंगाच्या बाबतीत अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे.....

गुलाबी रंगाची साडी घ्यायची असेल तर त्यात खूप प्रकार आहेत. राणी कलर, बेबी पिंक, डार्क गुलाबी, ब्राईट पिंक, गुलबक्षी, गुलकंदी अशा अनेक छटा गुलाबी किंवा पिंक प्रकारात मोडतात. यापैकीच आणखी एक छटा म्हणजे Fuschia pink. वरवर पाहता आपण याला गुलाबी रंग म्हणून मोकळे होतो. पण फक्त एवढंच याचं वर्णन नाही. हा रंग गुलाबी रंगाच्या इतर अनेक छटांपेक्षा खूप खूप वेगळा आहे. गुलबक्षी आणि ब्राईट पिंक या दोन रंगांचं कॉम्बिनेशन म्हणजे Fuschia pink रंग. अगदी परफेक्ट याच रंगाची साडी निवडायची म्हणजे खूप सवडीने शॉपिंग करावी लागेल. कारण गुलाबी रंगाच्या विविध छटा एवढ्या एकमेकींमध्ये गुंफलेल्या आहेत की घ्यायचं होतं एक आणि घेतलं भलतंच, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. 

 

जर दुकानामध्ये जाऊन साड्यांची खरेदी करणार असाल, तर प्रत्येक रंग तुम्हाला हातात घेऊन बघता येतो. पण पुन्हा वेळेचा प्रश्न येतो. चार दुकाने फिरून साड्या घेण्याइतकी सवड आजकाल कुणालाच नाही. त्यामुळे अशावेळी सगळ्यात जास्त मदत होते ती ऑनलाईन शॉपिंग साईट्सची. पण मैत्रिणींनो ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही रंगाच्या बाबतीत अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे बरं का. कारण एक तर तुम्ही प्रत्यक्ष ती साडी डोळ्याने बघत नाही.  

मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

 

त्यामुळे साडीचा पोत आणि खरा रंग कसा आहे, हे आपल्याला समजत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला पाहिजे तशा योग्य रंगाची निवड करता येणं हे खरोखरंच मोठं कौशल्याचं काम आहे. यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ती म्हणजे डिस्प्लेला साड्यांचे जे फोटो ठेवले आहेत, त्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रंगावर विश्वास ठेवून कधीच साडी खरेदी करून नका. आतापर्यंत ज्या युजर्सनी ती साडी घेतली आहे, त्यांनी त्यांचे साडी नेसलेले फोटो नक्कीच त्या साईटवर टाकलेले असतात. या सगळ्या युजर्सचे फोटो नीट बारकाईने बघा. कॅमेऱ्याच्या क्वालिटीवरूनही फोटोतले रंग वेगवेगळे येऊ शकतात. त्यामुळे कोणता रंग अधिक वेळा दिसतो आहे, हे तपासा. यामुळे साडीचा रंग नेमका कसा, हे आपल्याला समजणे सोपे होते. 

 

Fuschia pink रंगाची पैठणी हवी?
दिवाळी झाली असली तरी लग्नसराई अजून बाकी आहे. त्यामुळे ज्यांना दिवाळीच्या गडबडीत साड्या घ्यायला जमलं नाही, त्या दिवाळीनंतर थोडी निवांत खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तुम्हीही जर Fuschia pink रंगाची पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर कारागिरी या साईटवर एक मस्त पर्याय उपलब्ध आहे. या साईटवर सध्या सेल सुरू असून तब्बल १९ हजारांपेक्षाही जास्त किमत असणारी पैठणी सेलमध्ये केवळ ७, ६५५ रूपयांना मिळत आहे. ही ऑफर मिस होऊ द्यायची नसेल आणि खरोखरंच साडी कशी आहे, हे बघायचं असेल तर खालच्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता.
https://www.karagiri.com/products/fucsia-pink-paithani-saree-78808?wickedsource=google&wickedid=CjwKCAiAm7OMBhAQEiwArvGi3AvRRuIvc-N8Rf99uGH04UHrTHopKeXlSBQPLdhe-pkcrbUX9d4apBoCfQwQAvD_BwE&wickedid=398032942210&wv=3.1&gclid=CjwKCAiAm7OMBhAQEiwArvGi3AvRRuIvc-N8Rf99uGH04UHrTHopKeXlSBQPLdhe-pkcrbUX9d4apBoCfQwQAvD_BwE

 

२. Fuschia pink जॉर्जेट साडी
या रंगातली जर खूप हेवी साडी घ्यायची नसेल, तर ॲमेझॉनवर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जॉर्जेट प्रकारातली साडी घ्यायची असेल तर ती साधारण १५०० ते ३००० या किमतीत उपलब्ध आहे. या प्रकारातल्या बहुतांश साड्या पुर्णपणे प्लेन असून त्याचे काठ लहान आकाराचे आणि सोनेरी रंगाचे आहेत. ब्लाऊज जर थोडं हटके शिवलं तर या साडीसोबत नक्कीच तुम्ही डिझायनर लूक करू शकता. अशा प्रकारच्या अनेक साड्या तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर बघू शकता. 
https://www.amazon.in/Generic-Georgette-fuschia-georgette-blouse/dp/B09HML9PQV/ref=sr_1_1?keywords=Fuschia+pink+saree&qid=1636703112&qsid=261-4571113-9282016&s=apparel&sr=1-1&sres=B09HML9PQV%2CB09HMY3WFH%2CB07XZC7Z7G%2CB07TZNHX8V%2CB07QJC6KQ9%2CB08KJDZNDC%2CB077TK7VXN%2CB07SCP57HW%2CB07XF4R7NN%2CB0841NCDPN%2CB09BNR1G89%2CB08L6NJC69%2CB082SNYDMX%2CB07WCYWC4X%2CB083NVTZ7S%2CB08VNLRYQZ%2CB07NVR5HKL%2CB078QLNN9V%2CB08PD27ZNS%2CB0913DQPMH&srpt=SAREE


३. नेट प्रकारातही उपलब्ध
Fuschia pink रंगाची साडी तुम्हाला नेट प्रकारात हवी असेल, तर ती देखील myntra या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. या साडीला गोल्डन काठ असून साडीवरही गोल्डन थ्रेडने वर्क केलं आहे. अतिशय भरजरी आणि एखाद्या लग्न- समारंभात शोभून दिसणारी ही साडी २७९८ रूपयांत उपलब्ध आहे. साडी बघण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता.
https://www.myntra.com/saree/tikhi-imli/tikhi-imli-fuchsia-pink-&-golden-embroidered-net-saree/10237713/buy

 

Web Title: This Fuschia pink sari worn by Malaika Arora on Diwali; Available Online in affordable price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.