कोणताही तळणीचा पदार्थ करायचा म्हटलं की गृहिणींना थोडी भीती असतेच. तळणीचे पदार्थ तळताना तेल जास्त लागू नये तसेच पदार्थ तळताना तेल अंगावर उडू नये या दोन प्रमुख गोष्टींचा विचार प्रत्येक गृहिणी करत असतेच. अनेकदा आपण भजी, पुऱ्या, पापड असे तळणीचे वेगवेगळे पदार्थ घरी करतो. असे तळणीचे पदार्थ करताना तेल काहीवेळा जास्त लागते किंवा काही पदार्थ असतात जे जास्त तेल पितात. एवढंच नव्हे तर काहीवेळा तळणीचे पदार्थ जर जास्त काळ तेलात राहिले तर ते करपून देखील जातात(Deep Frying Strainer & Oil Basket With Fryer Tong).
याचबरोबर, कित्येकदा तळणीचे पदार्थ तेलात सोडताना गरम तेल अंगावर उडते. अशा सगळ्या समस्या दूर करून झटपट तळणीचे पदार्थ अगदी बिनधास्त कमी तेलात पटकन टाळता यावेत यासाठी एक खास भांड सध्या बाजारांत आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकायला येत आहे. तळणीचे पदार्थ तळताना तेल अंगावर उडू नये तसेच कमी तेलात पदार्थ न करपता तयार होण्यासाठी या भांड्याचा वापर कसा करायचा ते पाहुयात(Stainless Steel Kitchen Deep Frying Pot With Strainer).
'डीप फ्राईंग स्टेनर विथ ऑईल बास्केट' म्हणजे काय ?
तळणीचे पदार्थ तळताना आपण शक्यतो खोलगट कढईचा वापर करतो. या कढईत तेल घेऊन पदार्थ तळत. परंतु अशा पद्धतीने पदार्थ तळताना काहीवेळा तेल अंगावर उडते, पदार्थ तळण्यासाठी जास्त तेल लागते किंवा पदार्थ करपतात. असे होऊ नये यासाठी आपण या 'डीप फ्राईंग स्टेनर विथ ऑईल बास्केट' चा वापर करु शकतो. हे भांड स्टील मटेरियलमध्ये तयार केलेले असते.
या भांड्यात, स्टीलचे गोलाकार उभे, उंच असे एक भांडे असते. या भांड्याच्या आत तसेच दुसरे जाळीदार उभे, उंच असे भांडे असते. ही दोन्ही भांडी हातात व्यवस्थित पकडण्यासाठी त्यांना हॅण्डल असते. कोणताही पदार्थ तळताना सर्वात आधी बाहेरच्या स्टीलच्या भांड्यात थोडे तेल घ्यावे. मग ते भांड गॅसवर ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्याच्या आतील जे दुसरे जाळीदार भांड आहे त्यात आपल्याला जो पदार्थ तळायचा आहे तो घालावा. आता हे जाळीदार भांड गरम तेलाच्या भांड्यात अलगद सोडाव.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...
स्वयंपाकाच्या गॅसची करा बचत, फक्त विकत आणा 'ही' वस्तू; गॅस लवकर संपणार नाही...
तळणीचे पदार्थ संपूर्णपणे तेलात बुडतील याची खात्री करावी. यामुळे बाहेरच्या स्टीलच्या भांड्यातील तेल या जाळीदार दुसऱ्या भांड्यातून आत पदार्थांपर्यंत पोहोचते आणि पदार्थ छान, मस्तपैकी तळून तयार होतो. पदार्थ तळून झाल्यावर आपण लगेच हे जाळीदार भांड वर उचलून अगदी सहज पद्धतीने काढू शकता. यामुळे आपल्याला तळणीचे पदार्थ तळताना कढई, झारा किंवा तेल गाळून जाण्यासाठीच्या जाळीदार गाळणीचा वापर करावा लागणार नाही. अशाप्रकारे या भांड्याचा वापर करून आपण अगदी बिनधास्तपणे तळणीचे पदार्थ अगदी सहज तळू शकता.
किंमत आणि रेटिंग.
'डीप फ्राईंग स्टेनर विथ ऑईल बास्केट' आपल्याला ५४० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकत मिळेल. त्याला ग्राहकांकडून ३.७ स्टार देण्यात आले आहेत. असे हे बहूउपयोगी 'डीप फ्राईंग स्टेनर विथ ऑईल बास्केट' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/40RxpTi