मंजूषा कुलकर्णी
काय मग सेटल कधी होणार, आता किती दिवस करिअरच्या मागे पळणार, असा प्रश्न लग्नाचं वय झालेल्या तरुण मुला-मुलींना सतत विचारला जातो. आणि ते करू, पाहू म्हणत गोष्टी पुढे ढकलतात. घरोघर पालक आणि मुलं यांच्यात लग्न कधी करणार, या मुद्द्यावरून वाद होतात.(fear of commitment) मात्र मुलं लग्न नको, असं का म्हणतात? (young men and marriage) तर नव्या भाषेत त्याला एक टर्म आहे, सेटलिंग डाऊन फोबिया.(modern relationship issues)
मान-गाल पाठीवर लव्ह बाईट्स कसे लपवाल? ५ सोपे उपाय-डागही दिसणार नाहीत आणि त्रासही होईल कमी
म्हणजे अनेकांना लग्न करण्याची, एकाच पद्धतीचं आयुष्य जगण्याची, एकाच शहरात राहण्याची, एकच एक नोकरी करण्याची, एकाच घराचे हप्ते जन्मभर फेडण्याची भीती वाटते. पूर्वी लोकांना सेटल होण्यात आनंद होता. आता अनेकांना सेटल न होण्यात आनंद वाटतो आहे. चाकोरीतलं आयुष्य त्यांना नको आहे ही एक गोष्ट, पण दुसरी गोष्ट अशी की, सेटल होणं, कुणाची तरी जबाबदारी घेणं, कमिटमेंट करणं, लग्न, मुलं असं सगळं बांधून घेणं स्वत:लाही नको आहे, असं हा नवा फोबिया सांगतो.
त्यामुळे अनेक जण लग्न नकोच म्हणतात., काही जण ठरवून नोकरी बदलतात, शहरं बदलतात, घरं बदलतात. नातीही त्यांची फार घट्ट नसतात, मैत्रीही वर्षानुवर्षे जपतील, असं नाही.
या सगळ्या वागण्याला उथळ असं लेबल पालकांची पिढी लावूच शकते, मात्र आपल्याला असंच आयुष्य जगायचं आहे. मन मारत जगायचं नाही, असं वागण्याचं काही जण ठरवतात. त्याप्रमाणे जगतात आणि भेटलंच कुणी तर लग्नही करतात, प्रेमातही पडतात. केवळ अमूक वयात तमूक केलंच पाहिजे, ही पूर्वीची सक्ती नाकारणारा ही नवीन मानसिकता आहे. आपली मुलं नेमकं काय म्हणतात हे पालकांनी समजून घेण्याशिवाय दुसरा पर्यायही तसा काही नाही.
