Join us  

....म्हणून आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या पुरुषांची महिलांना पडते भुरळ, जोडीदार म्हणून पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 6:31 PM

Why Women Find Older Men So Attractive : वयानं मोठ्या असलेल्या पुरुषांना आयुष्य आणि नातेसंबंधांची चांगली समज असते. जीवनातील समस्या ते त्यांच्या अनुभवाने सहज सोडवतात. या कारणास्तव, ते नात्यातील समस्या आणि निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करतात किंवा पार्टनरवर लहान सहान कारणांवरून विनाकारण रागवत नाहीत.

प्रेमाला वयाचं बंधन नसतंच. नात्यात प्रेम असेल तर बाकीच्या साऱ्या गोष्टी दुय्यम ठरतात.  मात्र समाजरीत अशी की जगात सर्वत्रच महिला आपल्याहून वयानं मोठ्या पुरुषांशी लग्न करतात. वयानं लहान असेल पती तर त्याच्या बातम्या होतात. चर्चा होते. मात्र पुरुष वयानं मोठा आणि स्त्री लहान असेल तर जनरीत म्हणून त्याची काही फार चर्चा होत नाही. वयातलं अंतरही कुणी चर्चेत घेत नाही. सेलिब्रिटींच्या जगातही तेच दिसतं.  (Why Women Find Older Men So Attractive) शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, सैफ अली खान आणि करीना कपूर; आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या अलिकडे गाजलेल्या जोड्या. ज्यात पतीचं वय पत्नीपेक्षा ९-१० वर्षांनी जास्त आहे. मात्र तरी त्यांच्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीची चर्चा होते. (Reasons why young women prefer aged men for relationships)

त्यांच्या नात्यात त्यांचं वय येत नाही. अगदी अलीकडे क्रिकेटपटू अरुण लाल यांनी आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या तरुणीशी लग्न केलं. यासाऱ्यात एक प्रश्न जगभर चर्चेत असतोच की आपल्यापेक्षा वयानं बराच मोठा जोडीदार महिला का निवडतात. समवयीन तरुणांपेक्षा मोठ्या वयाचे पुरुष त्यांना का आकर्षित करतात? सायकॉलॉजी टुडे या वेबपोर्टलने अनुक्रमे २०१६ आणि २०१८ मध्ये याविषयात झालेल्या शास्त्रीय अभ्यासानुसार काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यांचं म्हणणं, स्थैर्य-आर्थिक सुरक्षितता यापेक्षाही काही महिलांना वयानं मोठे मॅच्युअर पुरुषच समवयीन तरुणांपेक्षा जास्त आकर्षित करतात. त्यांना वयाचा आणि वागण्यातल्या समंजसपणासह आकर्षक व्यक्तिमत्त्वाचाही मोह पडतो.

 ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

आकर्षणाचं कारण काय?

१) वयानं मोठ्या असलेल्या पुरुषांना आयुष्य आणि नातेसंबंधांची चांगली समज असते. जीवनातील समस्या ते त्यांच्या अनुभवाने सहज सोडवतात. या कारणास्तव, ते नात्यातील समस्या आणि निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करतात किंवा पार्टनरवर लहान सहान कारणांवरून विनाकारण रागवत नाहीत.

२) अशा पुरुषांना त्यांच्या आयुष्यातून काय हवे आहे हे माहित असते. त्यामुळे, ते त्यांच्या जोडीदारासह वागताना आणि इतर गोष्टीतही गोंधळत नाहीत. आयुष्यात स्थिरता कशी असावी हे त्यांना माहीत असते.

३) वयानं मोठे असलेले पुरूष आर्थिकदृष्या स्टेबल असतात. जरी आज महिला स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, परंतु प्रत्येक स्त्रीला देखील असे वाटते की तिचा जोडीदार आर्थिकदृष्ट्या स्थिर असावा किंवा त्याचा चांगला व्यवसाय असावा. जेव्हा पुरुष त्यांची नोकरी किंवा आर्थिक स्थितीत मजबूत होतात, ज्यामुळे कुटुंब आणि विवाहाचे भविष्य देखील सुरक्षित होते.

लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

४) मानसशास्त्रज्ञांच्या मते, स्त्रियांचे अशा पुरुषांना प्राधान्य देण्यामागील एक प्रमुख कारण हे आहे की या पुरुषांना लैंगिक संबंधांच्या बारकाव्याची चांगली समज असते. शारीरिक गरजा पूर्ण करणे आणि बेडरूममधील गोष्टींची चांगली समज असणे हे सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य आहे. खूप जास्त प्रेम आणि काळजी घेणारी व्यक्ती मिळावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. अनुभवी पुरुष हे करण्यात पटाईत असतात. ते नातेसंबंध सुलभ करतात आणि भावनिक सुरक्षा देखील देऊ शकतात.

 सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

5)  अधिक काळजी घेणारे, प्रामाणिक आणि अनुभवी पुरुष अनेकींना अरवडतात. असे पुरूष पार्टनरला सुरक्षिततेची भावना प्रदान करू शकता जी कोणत्याही नातेसंबंधात महत्वाची असते.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप