Lokmat Sakhi >Relationship > When Your Partner Says No To Sex : ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

When Your Partner Says No To Sex : ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

When Your Partner Says No To Sex : सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना असं वाटतं की या तीनपैकी कोणत्याही कारणांमुळे पार्टनरकडून नकार मिळत असावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:54 AM2022-05-13T11:54:25+5:302022-05-13T12:43:03+5:30

When Your Partner Says No To Sex : सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना असं वाटतं की या तीनपैकी कोणत्याही कारणांमुळे पार्टनरकडून नकार मिळत असावा.

When Your Partner Says No To Sex : Family health survey says 82 percent women decline to have sex with husband | When Your Partner Says No To Sex : ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

When Your Partner Says No To Sex : ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

लग्नानंतर शरीरसुखासंदर्भात (Married Sex Life) प्रत्येकाच्या मनात स्वत:च्या वेगळ्या कल्पना असतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-५ मध्ये भारतीयांच्या खासगी चार भिंतीतल्या कल्पना आणि नातेसंबंध यासंदर्भात एक महत्वाचा अहवाल समोर आला आहे. (When Your Partner Says No To Sex) २०१९-२०२१ मध्ये  करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितले, जोडीदाराला सेक्ससाठी नकार देण्यात त्यांना काहीच चूक वाटत नाही. (Family health survey says 82 percent women decline to have sex with husband)
या सर्वेक्षणात सेक्ससाठी नकार देण्याची ३ कारणं समोर आली आहे.  एक म्हणजे पतीला काही लैगिंक आजार असणं, दुसरं पत्नीनं इतर कोणासह संबंध ठेवल्यानंतर तिला थकल्यासारखं वाटणं आणि तिसरं कारण म्हणजे मूड नसणं. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना असं वाटतं की या तीनपैकी कोणत्याही कारणांमुळे जोडीदाराकडून सेक्सला नकार मिळत असावा. (Reasons A Married Woman Might Not Be Interested In Sex)

रिपोर्टनुसार देशात ८२ टक्के महिलांचं म्हणणं आहे की त्या आपल्या पतीला सेक्ससाठी नकार देतात.  पतीला सेक्ससाठी नकार देत असलेल्या महिलांमध्ये सर्वाधिक संख्या ही गोवा राज्यात आहे (९२ टक्के) अरूणाचल प्रदेश (६३ टक्के) तर जम्मू आणि काश्मिरची संख्या (६५ टक्के) आहे.

 लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

जेंडर एटिट्यूडबाबत माहिती मिळवण्यासाठी पुरूषांना आणखी काही प्रश्न विचारण्यात आले. पत्नीचा सेक्ससाठी नकार मिळण्याबाबत हे प्रश्न होते. महिलांनी सेक्ससाठी नकार दिल्यास राग काढणं, चिडचिड करणं, घरखर्चासाठी पैसे न  देणं, मारझोड करणं, पत्नीच्या इच्छेविरूद्ध जबरदस्ती सेक्स करणं अन्य महिलांसह संबंध ठेवणं असे प्रकार करण्याचा अधिकार आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले. 

यावर  १५ ते ४९ वर्ष वयोगटातील ६ टक्के पुरूषांनी सांगितलं की पत्नीनं सेक्ससाठी नकार दिल्यास या ४ गोष्टी करण्याचा अधिकार त्यांना आहे.  तर ७२ टक्के पुरूषांनी या चार पैकी कोणताही पर्याय निवडला नाही. १९ टक्के पुरूषांचे म्हणणे आहे की पत्नीनं सेक्ससाठी नकार दिल्यानंतर रागवण्याचा अधिकार आहे.

 सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

३२ टक्के विवाहीत स्त्रिया कमावत्या होत्या

सर्व्हेनुसार लग्न झालेल्या महिलांमध्ये रोजगाराचा दर ३२ टक्के होत तर एनएफएचच्या मागच्या सर्वेत हा दर ३२ टक्के होता.  ३२ टक्के महिलांपैकी १५ टक्के महिलांना वेतन मिळाले नव्हते तर १४ टक्के महिलांकडे खर्च झालेल्या पैशांचा हिशोब नव्हता.

Web Title: When Your Partner Says No To Sex : Family health survey says 82 percent women decline to have sex with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.