Lokmat Sakhi >Relationship > अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

Why do we crave romance during the monsoons? : पावसाळ्यात पार्टनरसोबत असलेलं बॉण्डिंग घट्ट करायचं असेल तर, ५ गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 04:15 PM2024-07-05T16:15:22+5:302024-07-05T16:16:39+5:30

Why do we crave romance during the monsoons? : पावसाळ्यात पार्टनरसोबत असलेलं बॉण्डिंग घट्ट करायचं असेल तर, ५ गोष्टी करा..

Why do we crave romance during the monsoons? | अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

'अब के सजन सावन में', 'रिमझिम गिरे सावन', पावसाळा सुरु होताच ही रोमॅण्टिक गाणी आठवतात (Monsoon Season). मान्सून म्हणजे रोमॅण्टिक ऋतू. या दिवसात प्रेमी युगल एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडतात (Romantic Season). रिमझिम सरी बरसत असताना, सोबत पार्टनर असेल तर, वेळ पुढे जाऊ नये असे वाटते (Relationship Tips). 'ए वक़्त ठहर जा ज़रा', अशी भावना मनात येते.

पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे या रोमॅण्टिक वातावरणात पार्टनरला द्यायला वेळ मिळत नाही. ज्यामुळे बऱ्याचदा नात्यात दुरावा येतो. या ऋतूत जर एकमेकांसोबत वेळ घालवलात तर प्रेमाचं झाड नव्याने बहरेल. पण मान्सूनमध्ये पार्टनरसोबत कोणता प्लॅन आखावा? हा प्रश्न तुमच्या देखील मनात आला असेल. पावसाळ्यात पार्टनरसोबत असलेलं बॉण्डिंग घट्ट करायचं असेल तर, ५ गोष्टी करा. नात्यात प्रेमाचा पाऊस पडेल(Why do we crave romance during the monsoons?).

अशा प्रकारे पावसाळा रोमॅण्टिक करा

पावसात एकत्र भिजा

पावसात अनेकांना भिजायला आवडते. जोडीदारासोबत पावसात भिजणे ही वेगळीच गोष्ट आहे. यामुळे पार्टनरसोबत असलेली बॉण्डिंग वाढेल. आपण पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्हला देखील जाऊ शकता. एकत्र वेळ घालवा. यामुळे तुम्ही एकमेकांना अधिक समजून घ्याल.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

फिरायला गेल्यावर एकाच छत्रीत फिरा

जर आपल्याला भिजायल आवडत असेल आणि पार्टनरला आवडत नसेल तर, एकाच छत्रीत राहून पावसाचा आनंद घ्या. कुठेतरी छत्री घेऊन बसून पावसाचा आनंद लुटू शकता. एकमेकांची स्तुती करा. प्रेमाच्या गोष्टी शेअर करा.

एकत्र गाणी ऐका

जर आपल्याला पावसात भिजायला आवडत नसेल तर, घरातच गाणी ऐकत बसा. एकमेकांची आवडती गाणी ऐका. आपण एकेमेकांसोबत डान्सही करू शकता. यामुळे नक्कीच घरातच रोमॅण्टिक वातावरण तयार होईल.

विराट कोहली म्हणतो फिटनेस महत्वाचा म्हणून तो 'या' पद्धतीने खातो भाज्या; फिट व्हायचं तर तुम्हीही करा..

मनातील भावना पार्टनरसोबत शेअर करा

पार्टनरसमोर मनातील भावना व्यक्त करा. यामुळे त्यांना नक्कीच स्पेशल फील होईल. पावसात रोमॅण्टिक गोष्टी शेअर करा. मॉमेण्ट तयार करा. या गोष्टी आपल्याला कायम आठवत राहतील.

डेट प्लॅन आखा

रिमझिम पावसात जोडीदारासोबत हात धरून रस्त्यावर फिरा. कॅफेमध्ये गरम चहा किंवा कॉफीचा आनंद घेऊ शकता किंवा नवनवीन ठिकाणी डेट प्लॅन आखू शकता.

Web Title: Why do we crave romance during the monsoons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.