Lokmat Sakhi >Relationship > नको, लग्नच नाही करणार! -मुली का देत आहेत लग्नाला नकार, त्यांना कशाची भीती वाटते?

नको, लग्नच नाही करणार! -मुली का देत आहेत लग्नाला नकार, त्यांना कशाची भीती वाटते?

Why women fear marriage: Reasons girls avoid marriage: Fear of marriage rituals: लग्न नकोच म्हणणाऱ्या आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही म्हणून वय वाढलं तरी लग्न टाळणाऱ्या मुली, त्यांची बाजू कोण समजून घेणार?

By कोमल दामुद्रे | Updated: April 28, 2025 09:05 IST2025-04-28T09:00:00+5:302025-04-28T09:05:01+5:30

Why women fear marriage: Reasons girls avoid marriage: Fear of marriage rituals: लग्न नकोच म्हणणाऱ्या आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही म्हणून वय वाढलं तरी लग्न टाळणाऱ्या मुली, त्यांची बाजू कोण समजून घेणार?

Why are women afraid of marriage rituals? Why do some girls avoid getting married? What are the real reasons? | नको, लग्नच नाही करणार! -मुली का देत आहेत लग्नाला नकार, त्यांना कशाची भीती वाटते?

नको, लग्नच नाही करणार! -मुली का देत आहेत लग्नाला नकार, त्यांना कशाची भीती वाटते?

मुली हल्ली नकोच म्हणतात लग्न! वय वाढून जातं पण लग्न नको वाटते, लग्नाची भीती वाटते की मनासारखा जोडीदार मिळत नाही असा प्रश्न आहेच पण अनेकींना लग्न नको वाटतं.(Why women fear marriage) पूर्वी अगदी ९०च्या दशकापर्यंत विवाह सोहळ्याबद्दल अप्रूप वाटायचे.(Reasons girls avoid marriage) मुलीने मुलाला न पाहाताच पसंती मिळायची.(Fear of marriage rituals) आईवडिलांच्या शब्दाला मान राखत मुली आपली समंती देत लग्न करत.पण गेल्या काही काळात लग्न नकोच म्हणणारे मुलं आणि मुलीही आहेतच. का त्यांन नको वाटत असेल लग्न? (Why women delay marriage)
प्रतिष्ठा, परंपरा आणि अनुशासन... हे चित्र सर्रास बदलताना दिसत आहे. ९०च्या दशकापासून ते आता तरुण होत असलेल्या  पिढीमध्ये लग्नाबाबत एक वेगळाच संभ्रम पाहायला मिळत आहे. (Real reasons women avoid getting married) वय वाढत जातंय पण न संपणाऱ्या अपेक्षाचं ओझं स्वत:च्याही पाठीवर आहेच. मुला-मुलींच्या एकमेकांबाबत न संपणाऱ्या अपेक्षा आहेत आणि आपलं पुढे जमेल का अशी साशंकताही आहेच.(Psychological reasons behind marriage fear)

महिलांनी हस्तमैथुन केल्यास वाढतो इन्फर्टिलिटीचा धोका, कधीच मूल होत नाही; हे खरं की खोटं?

काळ बदलला तशी विचारसरणी देखील बदलली. तरुण पिढीच्या लग्नाबाबतच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत देखील बदल झाले. वय वाढतंय परंतु, नातं टिकेल का अशी साशंकता वाढतेच. योग्य जोडीदार मिळत नाही. मुलगा शिकलेला, एकुलता एक, कमावणारा, स्वतंत्र घर, एकत्र कुटुंब नको, शेती-वाडी, गाडी- बंगला अशा नाना तऱ्हेच्या अपेक्षा मुलींकडून पाहायला मिळतात. तर मुलांकडून संस्कारी, एकुलती एक, कमावणारी, घर सांभाळणारी आणि सोशिक, उत्तम स्वयंपाक, देखणी हवी असते. म्हणजे त्यांच्या बायकोविषयीच्या अपेक्षा पारंपरिकच आहेत. अपेक्षांच ओझं दोघांनाही न पेलवणारं आहे. मुलगा-मुलगीची पसंती झाल्यानंतर कुटुंबाकडून येणारी आडकाठी वेगळीच आहे. लग्न जुळलेच तर ते साध्या पद्धतीने नको मोठा तामझाम हवा. त्यात लग्नाचा खर्च एकानेच करावा अशी अपेक्षा ठेवली जाते. मग लग्नाच्या न परवडणाऱ्या बजेटमुळे आर्थिक कोंडी होते ती वेगळी. वाढणाऱ्या वयामुळे सामाजिक- मानसिक त्रास सहन करावा लागतो.

आणि अगदी समजा प्रेमविवाहही केला तरी घटस्फोटाचे प्रश्न वाढत आहेतच. लग्नाला ६ महिने  होत नाही तो घटस्फोटापर्यंत जाणारे मित्रमैत्रिणी पाहूनही लग्नाचं भय वाढतं. त्यात  लग्न मोडल्यानंतर बायकोला दिली जाणारी पोटगी हा प्रश्नही चिंतेत भर पाडणारा आहे. दोघांच्या समंतीने नातं मोडलं गेलं नाही तर एकमेकांना मारण्याच्या धमक्या, शारीरिक किंवा मानसिक पद्धतीने दिला जाणारा त्रास हे चित्र देखील पाहायला मिळालं आहे. 
थोडक्यात काय प्रश्न अनेक आहेत.

अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

आपल्याला हवा तसा पार्टनर मिळेल का? समजून घेईल का? की, आपले नाते अगदी काही महिन्यात- वर्षभरात तुटेल अशी चिंता देखील तरुण पिढीला सतावतेय. त्यात जेन झीमध्ये  ब्रेकअप, ब्रेड क्रबिंग, बेचिंग, सिच्युएशनशिप, लिव्ह- इन- रिलेशनशीप असं नातंही स्वीकारलं आणि तोडलंही जातं. 
येत्या काही काळात लग्न संस्था आणि नात्यांचे गणित यामध्ये होरपळून निघेल की, काय अशा प्रश्न वारंवार सतावतो. नात्यांचे बंधन नको असल्यास लग्न करण्याऐवजी तरुण पिढी लिव्ह- इन- रिलेशनशीपला प्राधान्य देऊन शरीरसुख उपभोगू शकतेच, पण त्यातूनही निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं, भावनिक गुंतवणूक आणि फसवले गेल्याचं दु:ख त्याचं काय? न संपणारे प्रश्न आहेत..

Web Title: Why are women afraid of marriage rituals? Why do some girls avoid getting married? What are the real reasons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.