Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > तिचं चुकलं की त्याचं चुकलं, लोकांचं मात्र फावलं! मेरी कोमचा घटस्फोट-ट्रोलिंग आणि बिनकामाचे सल्ले

तिचं चुकलं की त्याचं चुकलं, लोकांचं मात्र फावलं! मेरी कोमचा घटस्फोट-ट्रोलिंग आणि बिनकामाचे सल्ले

मेरी कोमचा घटस्फोट आणि नवऱ्याशी भांडण हा सोशल मीडियातल्या गलिच्छ चर्चेचा विषय ठरला, हेच किती भयंकर.. पुरुषांनी काहीही केलं तरी ते योग्यच म्हणणारा आपला समाज बाईची कर्तबगारी कधीच सहन करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:45 IST2026-01-22T16:05:50+5:302026-01-22T16:45:03+5:30

मेरी कोमचा घटस्फोट आणि नवऱ्याशी भांडण हा सोशल मीडियातल्या गलिच्छ चर्चेचा विषय ठरला, हेच किती भयंकर.. पुरुषांनी काहीही केलं तरी ते योग्यच म्हणणारा आपला समाज बाईची कर्तबगारी कधीच सहन करू शकत नाही

Whether it was her fault or his, people were left disappointed! Mary Kom's divorce - trolling and useless advice | तिचं चुकलं की त्याचं चुकलं, लोकांचं मात्र फावलं! मेरी कोमचा घटस्फोट-ट्रोलिंग आणि बिनकामाचे सल्ले

तिचं चुकलं की त्याचं चुकलं, लोकांचं मात्र फावलं! मेरी कोमचा घटस्फोट-ट्रोलिंग आणि बिनकामाचे सल्ले

- निशा नामपूरकर

इतरांच्या भांडणात रस असणं, ती ऐकणं, त्यांची चर्चा करणं, त्यावर गॉसिप करणं, ते रंगवून रंगवून चार लोकांना सांगणं आणि मग कुणाचं कसं चुकलं याचा न्यायनिवाडा आपल्या हाती घेत चार सल्ले देणं, उपदेश करणं ही आपली सामाजिक आवड आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यातही नवरा-बायकोच्या भांडणात लोकांना अजून जास्त रस असतो. सोशल मीडियाच्या काळात तर लोक स्वत:हून आपली सुख-दु:ख चावडीवर मांडतात आणि मग आपलं कर्तव्य असल्यासारखं आपल्या घरात बसून त्यावर वाट्टेल त्या टिप्पणी करणं, इतरांना अक्कल शिकवणं, नावं ठेवणं, गलिच्छ शब्दात ट्रोल करणं हे सारंच सुरू होतं.

सध्या मेरी कोमच्या संदर्भात हे सारं ऑनलाइन जगात सुरू आहे. मेरी अत्यंत लोकप्रिय खेळाडू, देशासाठी पदक जिंकणारी कर्तृत्त्ववान महिला. तिचा घटस्फोट झाला. ओनलर कोम आणि ती विभक्त झाले. तीन लेकरंही त्यांना आहेत. तर अलिकडे एका टीव्ही कार्यक्रमात मेरीनं नवऱ्याविषयी जाहीर सांगितलं की तो एक पै कमवत नव्हता, माझाच पैसा उडवत असे, बसून खात असे, फुटबॉल खेळत असे.तर तिचा आक्षेप खोडून काढताना त्यानं तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले.आणि त्यावरून सोशल मीडियात मेरीसह अनेक महिलांचं ट्रोलिंग अनेकांनी केलं की, बायका असंच वागतात.

नवरा करिअर सोडून यांच्या करिअरसाठी मुलं सांभाळतो म्हणाला, बायकोच्या पाठीशी उभा राहिला तरी कृतघ्न बायका हे सारं विसरतात. तर काहींचं म्हणणं होतं की, नवऱ्यानं मुलं सांभाळली म्हणून आणि तिच्या पाठीशी उभं राहिला म्हणून इतकं काय कौतुक करायचं. जगभर बायका हेच करतात. नवरे यशस्वी होतात त्याचं श्रेय कुणी बायकोला देतं का, मग बायको यशस्वी झाली की त्याचं श्रेयही नवऱ्यालाच देणं ही पुरुषी मानसिकताच आहे.

ही चर्चा इथेच थांबली नाही तर अनेकांनी मेरीच्या चारित्र्यासह स्वार्थी असण्यावर, दिसण्यावर, आईपणाची जबाबदारीच ती नाकारत असल्याचे आरोप करत गलिच्छ भाषेत ट्रोलिंग केले. काहींनी तर इथवर म्हटलं की, बायकांना संधी मिळून त्या यशस्वी होताच कृतघ्न होतात.

याउलट दुसरी बाजूही तितकंच ट्रोलिंग करत म्हणत होती की, पुरुषांनी काहीही केलं तरी ते योग्यच म्हणणारा आपला समाज बाईची कर्तबगारी कधीच सहन करू शकत नाही.
वाद दोन्ही बाजूचे. ट्रोलिंगही दोन्ही बाजूचं.

मात्र त्यातून ऑनलाइन जगाचं एक भयंकर चित्र मात्र दिसलं की, लोकांच्या पर्सनल नात्यावर, पर्सनल विषयांवरही अनेक लोक चर्चा करतात. त्यावर मत मांडताना अगदी हिंस्त्र कमेंट करतात. अपमान करतात आणि वर त्याचं समर्थनही करतात की, ती माणसंच जर आपल्या नात्यांविषयी जाहीर बोलत असतील तर लोक त्यांच्यावर टीका करणारच!

टीकेला ना नसते, पण असभ्य शब्दांना आणि गचाळ आरोपांना तर सभ्य समाजात ना असली पाहिजे. कुणाचंही म्हणजेच महिला अगर पुरुषाचं चारित्र्यहनन करणं, फोटो मॉर्फ करून त्यावर गलिच्छ शब्द लिहिणं हे काही योग्य नाहीच. कारण त्यातून हशिल काही नाही. केवळ इतरांचं दोन घटका मनोरंजन होतं, पण त्यापलिकडे ज्यांच्या जगण्याच्या चिंधड्या उडवल्या जातात, त्यांच्यासाठी या ऑनलाइन खुणा कायम राहतात.

केवळ प्रसिद्ध व्यक्तीच नाही तर सोशल मीडियात अनेकदा सर्वसामान्य माणसांसंदर्भातही हे घडू लागलं आहे. त्यामुळे कुणाहीवर असभ्य कमेंट करताना प्रत्येकानं विचार करायला हवा की, मी जे ऑनलाइन व्यक्त होतो/होते आहे ते योग्य आहे का?

Web Title : मैरी कॉम के तलाक पर ऑनलाइन ट्रोलिंग, बिन मांगी सलाह, सामाजिक फैसले।

Web Summary : मैरी कॉम के तलाक ने ऑनलाइन आलोचना को जन्म दिया, जो व्यक्तिगत जीवन के प्रति सामाजिक जुनून को दर्शाता है। ट्रोलर्स ने उनके चरित्र और उपलब्धियों पर हमला किया जबकि अन्य ने उनका बचाव किया। ऐसी ऑनलाइन व्यवहार सम्मानजनक ऑनलाइन बातचीत की आवश्यकता को उजागर करती है, चरित्र हनन और नफरत भरी टिप्पणियों से बचना चाहिए।

Web Title : Mary Kom's divorce triggers online trolling, unsolicited advice, and societal judgment.

Web Summary : Mary Kom's divorce sparked online criticism, revealing societal obsession with personal lives. Trolls attacked her character and achievements while others defended her. Such online behavior highlights the need for respectful online interactions, avoiding character assassination and hateful comments.