लग्नानंतरही पत्नी दुसऱ्या पुरुषांशी, सहकाऱ्यांशी, जुन्या मित्रांशी एवढंच काय शेजारी कुणाशी बोलत असेल तरी काही नवरे संशय घेतात. त्यांना राग येतो, भांडणं करतात. आपली बायको कुणाशी बोलते म्हणजे लगेच तिचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय घेणाऱ्या नवऱ्याच्या मनोवृत्तीतच गडबड आहे (Relationship Tips). संशयी स्वभाव, पझेसिव्हनेस यासोबत बायकोला कंट्रोल करुन तिला आपली गुलाम असल्यासारखं वागवणं हे सारं त्यात येतं. त्यामुळे बायको स्त्री-पुरुष कुणाशीही सभ्यपणे, मैत्रीभावाने बोलत असेल तर त्यात चूक काहीच नाही. पण तरीही नवरा सतत त्यावरुन भांडत असेल तर काही गोष्टी करायला हव्या. (When Your wife Talks To Another Man After Marriage What to do)
१) शांतपणे बोला
सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे शांतपणे आणि मोकळेपणानं एकमेकांशी बोला. आरोप करण्याऐवजी नेमकं काय खटकतं, असुरक्षित का वाटतं हे नवऱ्यानं बायकोला सांगितलं तर ती तिची बाजू मांडू शकते. संशय घेण्यात अर्थ नाही.
२) नात्यातील अंतर ओळखा
लग्नानंतर बायकोनं जुने सगळे मित्रच तोडून टाकावे, मित्रमैत्रिणींशी बोलूच नये हा आग्रहच चूकीचा. लग्नानंतरही जुनी नाती, त्या नात्यातली भावनिक संवाद किंवा मैत्री महत्वाची सअतेच. तुमच्या नात्यातील संवाद, भावनिक आधार किंवा वेळ देणं कमी झालं आहे का याचा विचार करा. तो वाढला आणि परस्परांवर विश्वास असला तर दुसरं कुणी नात्यात येऊ शकत नाही.
३) विश्वास आणि मर्यादा
लग्नामध्ये विश्वास आणि पारदर्शकता असायला हवी. तुम्ही दोघांनी तुमच्या नात्याच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत का याचा विचार करा. मैत्री असणं चुकीचं नाही. पण जर त्या मैत्रीमुळे तुमच्या वैवाहिक नात्यात ताण येत असेल तर त्याबद्दल स्पष्ट बोलायला हवं.
४) समपुदेशकाची मदत घ्या
जर तुम्हाला एकमेकांशी संवाद साधणं कठीण वाटत असेल तर विवाह समुपदेशकाची मदत घेणं हा एक उत्तम पर्याय आहे. काऊन्सिंग करुन मार्ग निघूच शकतो.
५) आत्मपरीक्षण करा
बायकोनं नवऱ्यावर आणि नवऱ्यानं बायकोवर सतत संशय घेणं, एकमेकांना जाब विचारणं, फोन पाहणंच चूक आहे ते तुम्ही करत असाल तर तुमच्या नात्याचा पायाच ठिसूळ आहे.
