लैंगिक आरोग्य (Sexual Health) आणि संबंधांविषयी (Intimacy) समाजात अजूनही मोकळेपणानं चर्चा होत नाही. लैंगिक जीवनात आपल्याला काय समस्या आहेत हे बोललंच जात नाही. यामुळे अनेक विवाहित जोडप्यांना लैंगिक जीवनाचं सुख पुरेपूर अनुभवता येत नाही. लैगिंक जीवनात समस्या येतात पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशावेळी सेक्स कोच ही संकल्पना मदतीस येते. सेक्स कोच हे सेक्स थेरपिस्टपेक्षा वेगळे असतात. थेरपी गंभीर वैद्यकिय समस्यांवर लक्ष केंद्रीत करते तर कोचिंग हे स्किल बिल्डींगवर भर देते. सेक्स कोचला सेक्शुअल शिक्षण आणि लोकांना येणाऱ्या समस्या या दोन्हींची समज असते. (What Is The Role Of Sex Coach)
सेक्स कोच म्हणजे नेमकं काय? (What Is The Sex Coach)
सेक्स कोच म्हणजे एक प्रशिक्षित आणि प्रमाणित व्यावसायिक जो लोकांना किंवा जोडप्यांना लैंगिक जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसंच त्यांच्या लैंगिक समस्या सोडवण्यासाठी लैंगिक व समाधानी जीवन जगण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन, सल्ला आणि आवश्यक कौशल्ये पुरवतो.
सेक्स कोचमुळे लोकांना काय फायदा होतो? (What Does Sex Coach Do)
सेक्स कोच हे त्यांच्या क्लायंट्सना एका सुरक्षित वातावरणात त्यांच्या लैंगिक भावना, इच्छा आणि समस्या मोकळेपणानं व्यक्त करण्यास मदत करतात. त्यांचे मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहे. सेक्स कोच हे केवळ शारीरिक संबंधांपुरते मर्यादित न राहता भावनिक आणि शारीरिक जवळीक कशी वाढवावी, नातेसंबंधात नवा उत्साह कसा आणावा याबाबत मार्गदर्शन करतात (Ref). शरीराची रचना, लैंगिक प्रतिसाद (Sexual Response) आनंद (Desire) कामवासना या बाबतची योग्य आणि वैज्ञानिक माहिती देतात. जोडप्यांमधील लैंगिक इच्छा, गरजा आणि मर्यादा याबाबत प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करतात.
कमी झालेली कामवासना, लैंगिक आत्मविश्वासाचा अभाव, शीघ्रपतन, ऑर्गेझ्मची समस्या किंवा जवळीक कमी होणं अशा अनेक समस्यांवर उपाय म्हणून कृती आधारीत सोल्यूशन्स देतात. व्यक्तीला त्यांची लैंगिकता स्वीकारण्यास, लैंगिक क्षमता ओळखण्यास आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यास प्रोत्साहीत करतात. सेक्स कोच हे लैंगिक जीवनात अडथळे आलेल्यांना किंवा आपलं लैंगिक जीवन सुंदर, समाधानी बनवून इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरक म्हणून काम करतात.