Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्लीप डिव्होर्स घेत आहेत तरुण जोडपी, हा कुठला नवा घटस्फोट? पाहा त्याची कारणं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:34 IST

Sleep Divorce: सध्या ‘स्लीप डिव्होर्स’ हा नवा ट्रेंड चर्चेत आला आहे. नाव ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी तज्ज्ञांच्या मते हा नातं तोडण्यासाठी नाही, तर नातं टिकवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

Sleep Divorce:  आजच्या काळात कपल्समध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे सामान्य झाले आहे. कधी कधी हे छोटे वाद इतके वाढतात की नातं तुटण्यापर्यंत म्हणजेच घटस्फोटापर्यंत पोहोचते. अशातच सध्या ‘स्लीप डिव्होर्स’ हा नवा ट्रेंड चर्चेत आला आहे. नाव ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी तज्ज्ञांच्या मते हा नातं तोडण्यासाठी नाही, तर नातं टिकवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया स्लीप डिवोर्स म्हणजे नेमकं काय.

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचं तर स्लीप डिव्होर्स म्हणजे पती-पत्नीने आपापली झोप पूर्ण व्हावी म्हणून जाणीवपूर्वक वेगळ्या बेडवर किंवा वेगळ्या खोलीत झोपण्याचा निर्णय घेणे. हा कोणताही वेगळेपणा किंवा नात्यातील दुरावा नसतो. उलट, दोघांनीही परस्पर सहमतीने घेतलेला असा निर्णय असतो, ज्यामुळे दोघांनाही चांगली झोप मिळते आणि सकाळी चिडचिड होत नाही.

नवीन आकडेवारी काय सांगते?

अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या सर्वेनुसार सुमारे ३१% अमेरिकन प्रौढ आता स्लीप डिव्होर्सचा पर्याय स्वीकारत आहेत. याचा अर्थ काही कपल्स एकाच खोलीत वेगळ्या बेडवर झोपतात किंवा वेगळ्या खोलीत झोपतात, जेणेकरून दोघांनाही त्यांच्या सोयीप्रमाणे शांत आणि गाढ झोप मिळू शकते.

कोण जास्त फॉलो करत आहे?

या सर्वेनुसार ३५ ते ४४ वयोगटातील लोक (३९%) हा ट्रेंड सर्वाधिक स्वीकारत आहेत. तर ६५ वर्षांवरील लोकांमध्ये (१८%) हा ट्रेंड कमी प्रमाणात दिसतो. तज्ज्ञांच्या मते, झोप पूर्ण न झाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या वागणुकीवर होतो. झोप कमी झाल्यास माणूस चिडचिडा होतो आणि छोट्या गोष्टींवरूनही वाद वाढू शकतात.

लोक स्लीप डिव्होर्स का स्वीकारत आहेत?

१) घोरणे

घोरण्याच्या आवाजामुळे पार्टनरची झोप खराब होऊ शकते.

२) स्लीप एपनिया

झोपताना श्वास अडथळ्याची समस्या किंवा पाय हलवण्याची सवय असली तरी झोपेत व्यत्यय येतो.

३) वारंवार कड बदलणे

जर पार्टनर खूप हालचाल करत असेल तर दुसऱ्याची झोप मोडू शकते.

स्लीप डिव्होर्समध्ये रोमॅन्स कसा टिकवावा?

१) रात्रीचा एकत्र वेळ

झोपण्यापूर्वी एकत्र बसून टीव्ही शो पाहणे किंवा दिवसातील अनुभव शेअर करणे.

२) क्वालिटी टाइम

दिवसभरात काही वेळ खास एकमेकांसाठी ठेवणे.

३) समतोल राखणे

कधी शक्य असेल तेव्हा एकत्र झोपण्याचा प्रयत्न करून स्लीप पॅटर्नमध्ये थोडा बदल करणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sleep Divorce: Couples choosing separate beds for better sleep.

Web Summary : Sleep divorce, where couples sleep separately for better rest, is gaining popularity. It's not about separation but improving sleep quality. Studies show many adults, especially those aged 35-44, are adopting this trend to avoid disturbances like snoring, leading to improved well-being and relationship harmony.
टॅग्स :रिलेशनशिपघटस्फोट