Lokmat Sakhi >Relationship > आपल्याहून कमी सुंदर व्यक्तीला डेट करण्याचा नवा डेटिंग ट्रेंड? Gen-Z जनरेशनलाही भावतोय

आपल्याहून कमी सुंदर व्यक्तीला डेट करण्याचा नवा डेटिंग ट्रेंड? Gen-Z जनरेशनलाही भावतोय

What is Shrekking : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला डेटिंगसंबंधी श्रेकिंग ट्रेंड नेमका काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:35 IST2025-09-06T12:33:41+5:302025-09-06T12:35:21+5:30

What is Shrekking : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला डेटिंगसंबंधी श्रेकिंग ट्रेंड नेमका काय आहे?

What is new dating trend Shrekking, know all about it | आपल्याहून कमी सुंदर व्यक्तीला डेट करण्याचा नवा डेटिंग ट्रेंड? Gen-Z जनरेशनलाही भावतोय

आपल्याहून कमी सुंदर व्यक्तीला डेट करण्याचा नवा डेटिंग ट्रेंड? Gen-Z जनरेशनलाही भावतोय

What is Shrekking: सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ज्यावर रोज वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंड होत असतात. ज्यात रिलेशनशिपबाबतच्या गोष्टींचाही समावेश असतो. अशातच डेटिंगसंबंधी एक नवीन टर्म (Dating Trend) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याला म्हणतात श्रेकिंग. आपल्याला कदाचित माहीत असेलच की, श्रेकिंग (Shrekking) हा ट्रेंड प्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड फिल्ममधील कॅरेक्टर श्रेक आणि फियोनानं प्रेरित आहे. पण हे अलिकडे इतकं फेमस का होत आहे? तेच आज आपण पाहणार आहोत.

काय आहे श्रेकिंग?

तर मुळात श्रेकिंग हा नवा डेटिंग ट्रेंड आहे. ज्यात एक व्यक्ती अशा व्यक्तीला डेट करू लागते, ज्याला ते फिजिकली जास्त आकर्षक मानत नाहीत. पण त्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व फारच भावतं. ही डेटिंग टर्म श्रेक सिनेमातील कॅरेक्टरवरून घेण्यात आली आहे. जो दिसायला हॅंडसम नाही, पण त्याचं मन, इमानदारी आणि गंमतीदार स्वभाव सगळ्यांना आवडतो.

व्हायरल का होतोय हा ट्रेंड?

सोशल मीडियावर हा डेटिंग ट्रेंड व्हायरल होण्याचं कारणही खास आहे. एकीकडे लोक आजकाल आपल्या लूक्सवर अधिक लक्ष देतात, तेच हा ट्रेंड लोकांना व्यक्तीच्या हृदयावर आणि स्वभावावर  प्राथमिकता देण्यावर जोर देतो. लोक हे आता समजू लागले आहेत की, एका खरं, नितळ नातं सौंदर्यावर नाही तर स्वभावावर टिकून असतं.

श्रेकिंगला फॉलो करत आहे Gen-Z 

आजकालची Gen-Z जनरेशन श्रेकिंगला फॉलो करत असल्याचं बघण्यात आलं आहे. ते आपल्या नात्यात फिजिकल कनेक्शनपेक्षा जास्त इमोशनल कनेक्शनवर जास्त फोकस करत आहेत. आजच्या जगात लोक मेंटल पीस, समजदारी आणि ह्यूमरला जास्त प्राथमिकता देतात. हा ट्रेंड फॉलो करून लोक एक चांगला पार्टनर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Web Title: What is new dating trend Shrekking, know all about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.