Lokmat Sakhi >Relationship > दोघांच्या नात्यात मायक्रो-चिटिंग नावाचा व्हिलन, नात्यातला ‘असा’ लहानसा खोटारडेपणा संपवतो विश्वास

दोघांच्या नात्यात मायक्रो-चिटिंग नावाचा व्हिलन, नात्यातला ‘असा’ लहानसा खोटारडेपणा संपवतो विश्वास

What is Micro Cheating : नातेसंबंधाचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. यातीलच एक ट्रेंड म्हणजे Micro-Cheating. हा ट्रेंड नात्यांमध्ये मोठं वादळ आणू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:16 IST2025-09-22T12:37:10+5:302025-09-22T14:16:07+5:30

What is Micro Cheating : नातेसंबंधाचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. यातीलच एक ट्रेंड म्हणजे Micro-Cheating. हा ट्रेंड नात्यांमध्ये मोठं वादळ आणू शकतो.

What is micro cheating in relationship and whats its signs | दोघांच्या नात्यात मायक्रो-चिटिंग नावाचा व्हिलन, नात्यातला ‘असा’ लहानसा खोटारडेपणा संपवतो विश्वास

दोघांच्या नात्यात मायक्रो-चिटिंग नावाचा व्हिलन, नात्यातला ‘असा’ लहानसा खोटारडेपणा संपवतो विश्वास

What is Micro Cheating :  आजकालची लाइफस्टाईल इतकी धावपळीची झाली आहे की, लोक आपल्या नात्यांवरही हवं तसं लक्ष देऊ शकत नाहीयेत. दुसरीकडे बरेच लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा फिजिकल चीटिंगमध्ये अडकले आहेत. पण आता या नात्यांची परिभाषा सुद्धा बदलत्या काळानुसार बदलली आहे. थेट संवाद साधण्याऐवजी सोशल मीडिया आणि डिजिटल कनेक्शनमुळे कपल्समध्ये तणाव वाढत चालला आहे. अशात नातेसंबंधाचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. यातीलच एक ट्रेंड म्हणजे Micro-Cheating. हा ट्रेंड नात्यांमध्ये मोठं वादळ (Micro Cheating In Relationship) आणू शकतो.

काय आहे मायक्रो-चीटिंग?

मायक्रो-चीटिंग हे काही मोठं अफेअर नसतं, तर यात छोट्या छोट्या व्यवहारांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. पण सत्य हेच आहे की, याच सवयींमुळे पार्टनरमधील अंतर आणि अविश्वास वाढतो.

जसे की, एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीसोबत जास्त बोलत राहणं, चॅट करणं किंवा त्यांचं अधिक कौतुक करणं. एक्सच्या आठवणींमध्ये रमून राहणं. या सगळ्या गोष्टींमुळे नातं कमजोर होतं.

मायक्रो-चीटिंगचे संकेत

- जर जोडीदार मोबाइल लपवत असेल, मेसेज डिलीट करत असेल किंवा चॅट्स हाइड करत असेल तर हा रिलेशनशिपमध्ये विश्वास कमी असण्याचा इशारा आहे.

- जोडीदार मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांनी त्यांच्या जुन्या नात्यांबाबत सतत बोलणं, त्यांच्या आठवणी जाग्या करणं यामुळेही रिलेशनशिप कमजोर होतं.

- छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलणं किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करणं या गोष्टीही मायक्रो-चीटिंगचा भाग आहेत.

- एखाद्या व्यक्तीचं फार जास्त कौतुक करणं, पुन्हा पुन्हा कौतुक करणं हा मायक्रो-चीटिंगचा इशारा असू शकतो.

- जर जोडीदार एखाद्या व्यक्तीबाबत मित्रांकडून किंवा फॅमिलीकडून सत्य लपवत असेल तर ही बाब काही सामान्य नाही.

- एखाद्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटस किंवा फोटोंवर पुन्हा पुन्हा कमेंट करणं, लाइक करणं किवा डीएम करणं हाही गडबड असल्याचा संकेत असू शकतो.

मायक्रो-चीटिंगचे धोके

कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. जेव्हा जोडीदार छोट्या छोट्या गोष्टी लपवत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त महत्व देत असेल, तर आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. आधी तर ही गंमत किंवा सामान्य वाटू शकतं. पण पुढे जाऊन हा मोठा दगा ठरू शकतो.

Web Title: What is micro cheating in relationship and whats its signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.