Lokmat Sakhi >Relationship > काय आहे ‘Hobosexuality’ रिलेशनशिप आणि भारतात का वाढतोय याचा ट्रेण्ड?

काय आहे ‘Hobosexuality’ रिलेशनशिप आणि भारतात का वाढतोय याचा ट्रेण्ड?

What Is Hobosexuality : ‘Hobosexuality’ बाबत सोशल मीडियावर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. त्यामुळे हे रिलेशनशिप कसं आहे आणि काय आहे, याबाबत आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:55 IST2025-08-29T10:51:48+5:302025-08-29T10:55:14+5:30

What Is Hobosexuality : ‘Hobosexuality’ बाबत सोशल मीडियावर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. त्यामुळे हे रिलेशनशिप कसं आहे आणि काय आहे, याबाबत आपण पाहणार आहोत.

What is hobosexuality and how its trend increasing in India | काय आहे ‘Hobosexuality’ रिलेशनशिप आणि भारतात का वाढतोय याचा ट्रेण्ड?

काय आहे ‘Hobosexuality’ रिलेशनशिप आणि भारतात का वाढतोय याचा ट्रेण्ड?

Hobosexuality Trend: लाइफस्टाईल इतकी बदलली आहे की, रोजच्या जगण्यासोबतच नात्यांमध्येही मोठा बदल बघायला मिळत आहे. कपल्सच्या  नात्यांचीही वेगवेगळी रूपं आणि वळणं समोर येत आहे. अलिकडे नात्यांसंबंधी नवनवीन ट्रेण्ड समोर येत असतात. जे शहरांमध्ये अधिक फोफावताना दिसतात. असाच एक  ट्रेण्ड म्हणजे ‘Hobosexuality’. सोशल मीडियावर अनेकांच्या मनात याबाबत अनेक प्रश्नही आहेत. त्यामुळे हे रिलेशनशिप कसं आहे आणि काय आहे, याबाबत आपण पाहणार आहोत.

‘Hobosexuality’ हे एक असं रिलेशनशिप आहे, ज्यात लोक केवळ आपल्या स्वार्थासाठी किंवा गरजांसाठी रिलेशनशिपमध्ये येतात. तसा या रिलेशनशिपचा ट्रेण्ड अमेरिका आणि यूरोपमध्ये सुरू झाला. पण आता हळूहळू भारतातील मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या महानगरांमध्येही पसरत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊ.

काय आहे Hobosexuality?

Hobosexuality सारख्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती रोमॅंटिक नात्याचा घर, आर्थिक मदत आणि इतर सुविधांसाठी पर्याय म्हणून वापर करते. यासारख्या नात्यामध्ये वरवर तर सगळं चांगलं आणि प्रेमळ दिसतं. पण मुळात कपलपैकी एकच व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींचं ओझं वाहत असतं. त्यात घराचं भाडं, बिल्स किंवा रोजच्या जबाबदाऱ्या या गोष्टींचा समावेश असतो.

भारतात का वाढतोय हा ट्रेण्ड?

काही रिपोर्टनुसार, मोठ्या शहरांमध्ये गेल्या एका वर्षात घरांच्या आणि घराच्या भाड्याच्या किंमती 10 ते 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महानगरांमध्ये वन बेडरूमचं भाडं 35 ते 50 हजार रूपयांपर्यंत गेलं आहे. 

Deloitte चा एक रिपोर्ट सांगतो की, शहरांमध्ये एकट्या राहणाऱ्या तरूणांच्या उत्पन्नातील जवळपास 40 ते 50 टक्के रक्कम केवळ भाडं भरण्यात जातं. तसेच शहरांच्या गर्दीत अनेक लोक एकटेपणाचाही सामना करतात. त्यामुळेही सुद्धा हा ट्रेण्ड वाढला आहे.

Gateway of Healing च्या मानसिक आरोग्य एक्सपर्ट आणि संस्थापक डॉ. चांदणी तुगनैत सांगतात की, "आम्ही बघत आहोत की खासकरून महिला अशा जोडीदारासोबत जुळत आहेत, जे नात्यात इमोशनल, फायनॅन्शिअल आणि लॉजिस्टिकबाबत सपोर्ट करतात. पण त्यांच्या जीवनात अनेक खाचकडगे असतात. वरवर हे नातं रोमॅंटिक वाटतं, पण मुळात त्यात एक लपलेलं असंतुलन असतं. ज्यात कपलपैकी एका व्यक्तीला जास्त फायदा होतो".

Web Title: What is hobosexuality and how its trend increasing in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.