Join us

प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:46 IST

भारतात डिजिटल अफेयर्स अत्यंत वेगाने लोकप्रिय झालं आहे, विशेषतः तरुण पिढीमध्ये.

डिजिटल अफेअर्स, ज्यांना ऑनलाईन अफेअर्स किंवा सायबर अफेअर्स असंही म्हणतात. सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे हे संबंध विकसित केले जातात. भारतात डिजिटल अफेयर्स अत्यंत वेगाने लोकप्रिय झालं आहे, विशेषतः तरुण पिढीमध्ये.

भारतात का वाढतोय हा ट्रेंड?

भारतात डिजिटल अफेअर्स वाढण्याची अनेक कारणं आहेत. एक प्रमुख कारण म्हणजे इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर.  स्वस्त इंटरनेट असल्यामुळे लोकांना ऑनलाईन इतरांशी संपर्क साधणं सोपं झालं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ऑनलाईन डेटिंग अॅप्स आणि मेसेजिंग सर्व्हिसेस रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत, ज्यामुळे समान छंद असलेल्या लोकांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळते.

भारतात डिजिटल अफेअर्सचा वाढता ट्रेंड बदलत्या सामाजिक नियम आणि मूल्यांमुळे आहे. गेल्या काही दशकांमध्ये शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे जुन्या कल्पना बाजूला पडल्या आहेत. लोक सतत काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी पर्याय शोधत असतात.

ऑनलाईन पार्टनरसोबत इमोशनल बाँड

डिजिटल अफेअर्स वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात, जसं की कॅज्युअल ऑनलाईन संवादांपासून ते खोल इमोशनल कनेक्शनपर्यंत. काही लोक ऑनलाईन फ्लर्टिंग किंवा सेक्सटिंगमध्ये गुंतू शकतात, तर काही लोक त्यांच्या ऑनलाईन पार्टनरसोबत मजबूत इमोशनल बाँड विकसित करू शकतात. काही प्रकरणांमध्ये डिजिटल अफेअर्समुळे ऑफलाईन मीटिंग्ज आणि शारीरिक संबंध देखील निर्माण होऊ शकतात.

डिजिटल अफेअर्सचे धोके

डिजिटल अफेअर्सबद्दल अनेक कंसर्न आहेत जसं की जवळीक, विश्वास आणि मर्यादा. अशी नाती जास्त काळ टिकवणं कठीण असतं. यामध्ये फसवणूक,  किंवा काही कट रचल्याच्या तक्रारीही अनेकदा दिसून येतात. उदाहरणार्थ, डिजिटल अफेअर्सचा वापर हनी ट्रॅप म्हणून देखील केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, एखाद्याला चांगलं ओळखणे आणि त्याला/तिला तुमचा पार्टनर बनवण्यापूर्वी थोडा रिसर्च करणे चांगलं, अन्यथा ते महागात पडू शकतं.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप