Join us  

What Age group Is Most Sexually Active In India : भारतीय महिला होतात पुरुषांपेक्षा 'लवकर' सेक्शुअली ऍक्टिव्ह; Sex Life चं गुपीत सांगणारा रिसर्च समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 4:34 PM

What Age group Is Most Sexually Active In India : एचएफएचएसच्या डेटानुसार भारतीय पुरूषांच्या तुलनेत महिला सगळ्यात लवकर सेक्शुअली एक्टिव्ह होतात.

भारतात लैगिंक आरोग्यबद्दल (Sex Life) अजूनही मोकळेपणानं बोललं जात नाही.  पौगंडावस्थेत असताना होणारे अत्याचार, लैगिंक त्रास, अपेक्षा अजूनही मनात दाबून ठेवल्या जातात. दरम्यान नॅशनल फॅमिली हेल्थच्या (National Family Health Survey)  ताज्या सर्वेक्षणातून शरीरसंबंधांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वे अंतर्गत लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. लग्नानंतरही इतरांसह संबंध ठेवणं कितपत योग्य? सेक्शुअली एक्टिव्ह वयाच्या कितव्या वर्षी झाले. यावर  भारतीय पुरूष आणि महिलांची मतं विचारात घेण्यात आली. (Sexual behavior in family health survey 5 data on indian men and women)

एचएफएचएसच्या डेटानुसार भारतीय पुरूषांच्या तुलनेत महिला सगळ्यात लवकर सेक्शुअली एक्टिव्ह होतात. १५ वर्ष वयोगचात मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये सेक्सचा अनुभव घेतल्याची शक्यता जास्त होती.  या सर्वेक्षणात  २५ ते ४९ वर्षांच्या महिलांना प्रश्न विचारण्यात आले की त्यांनी पहिल्यांदा शरीरसंबंध कधी ठेवले. यावर १०.३ टक्के महिलांचं म्हणणं होतं की, १५ वर्षांचे असताना त्यांनी संबंध ठेवले होते.

 ‘ती’ नाही म्हणतेच कशी? -वैवाहिक सुखाविषयी भारतीय पुरुषांची मतं धक्कादायक

तर या वयात संबंध ठेवलेल्या पुरूषांचा आकडा ०.८ टक्के होता. भारतात सहमतीनं शरीरसंबंध ठेवण्याचे वय  १८ वर्ष आहे. पण यापेक्षा कमी वयाच्या ६ टक्के महिलांनी सर्वेमध्ये सांगितले  की त्यांनी आधीच संबंध ठेवले होते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ४.३ टक्के मुलांनी लवकर संबंध ठेवल्याचं मान्य केलं.

 सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

महिला सेक्शुअली एक्टिव्ह लवकर का होतात?

महिला लवकर सेक्शुअली एक्टिव्ह होण्यामागे अनेक गोष्टी आहेत. भारतीय समाजात पुरूषांचा दबदबाा आणि सेक्सच्या बाबतीत त्यांची लैगिंक इच्छा बळजबरीने पूर्ण करून घेतली जाते. अनेक मुली कमी वयात लैगिंक शोषणाला बळी पडतात. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या  ३ टक्के महिलांचं म्हणणं होतं की २२ वर्षांचे होण्याआधीच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते.

अशिक्षित मुलींमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचं वय १७.५ होतं तर १२ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तवेळ शिक्षणासाठी दिलेल्या मुलींमध्ये सेक्शुअली एक्टिव्ह होण्याचं  वय हे २२.८ होते. आर्थिकदृष्या गरिब मुलींमध्ये शरीरसंबंध १७ व्या  ठेवल्याचं समोर आलं तर श्रीमंत मुलींचे २१. २ वर्ष वय होतं. याऊलट मुलांनी पहिल्यांदा शरीरसंबंधांचा अनुभव २२ ते २५ वर्ष वयोगटात घेतला होता. 

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप