Lokmat Sakhi >Relationship > शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो?

शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो?

Urination after sex when pregnant : सेक्सपूर्वी आणि सेक्सनंतर लघवीला जाणं- न जाणं यासंदर्भातल्या गैरसमजांची शास्त्रीय उत्तरं..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:52 PM2023-03-09T15:52:42+5:302023-03-09T15:56:00+5:30

Urination after sex when pregnant : सेक्सपूर्वी आणि सेक्सनंतर लघवीला जाणं- न जाणं यासंदर्भातल्या गैरसमजांची शास्त्रीय उत्तरं..

Urination after sex when pregnant : Is Peeing After Sex Really Necessary Peeing after sex Benefits, UTI prevention | शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो?

शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो?

सेक्स, लैंगिक संबंध, त्यातले आनंद याविषयी आपल्याकडे मुलामुलींना शास्त्रीय माहिती देण्याचे प्रमाण कमी आहे. (Urination after sex when pregnant) त्यामुळे चोरट्या मार्गांनी आता तर पॉर्न साइट पाहूनही अनेकजण अर्धवट माहिती मिळवतात. तसे प्रयोगही करतात आणि नात्यासह काम जीवनातलाही आनंद गमावून बसतात. तसाच एक गैरसमज दिसतो तो लैंगिक संबंध आणि लघवीसारख्या अत्यंत नैसर्गिक गोष्टीसंर्दभात. (Peeing after sex Benefits, UTI prevention)

मुळात हा प्रश्न सेक्सपेक्षाही लैंगिक आणि शारीरिक आरोग्य आणि स्वच्छता यासंदर्भातला आहे. मात्र शास्त्रीय माहिती समजून न घेता अनेकजणी नको त्या गोष्टींचा ताण घेऊन जगतात. त्यातलेच हे काही प्रश्न कॉमन असतात. सेक्सपूर्वी लघवीला जाऊन यावे का? संबंध ठेवताना जोडप्यापैकी कुणाला लघवी होऊन गेली तर? संबंधानंतर लगेच लघवीला गेल्यास गर्भधारणा होत नाही? या प्रश्नांची नेमकी खरी उत्तरं काय? (Is Peeing After Sex Really Necessary)

कॅन्सरचा धोका होईल कमी; रोज न चुकता ५ पदार्थ खा, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लॅन

NCSH (national coalition for sexualhealth) रिपोर्टनुसार सेक्शुअल रिलेशनपूर्वी लघवीला जाऊन येणं महिलांसाठी फायदेशीर असतं. यामुळे संबंध ठेवताना ब्लॅडरवर अतिरिक्त दबाव येत नाही. प्लेजर कॅपेसिटीसुद्धा वाढते. महिलांना ऑर्गेज्म जाणवतो तेव्हा युरिन पास झाल्यासारखं वाटू शकतं. तो आभास असतो. त्यामुळे शक्यतो संबंधांपूर्पी लघवीला जाऊन यायला हवं.

सेक्सनंतर लघवीला जाणे-समज आणि गैरसमज?

१) सेक्सनंतर लगेच लघवीला जाऊन आल्यास UTI ला काही प्रमाणात प्रतिबंध करता येतो. महिलांना युरिनरी  इन्फेक्शन होण्याचा धोकाही कमी होतो.

२) पुरुषांनी सेक्सनंतर लघवीला जाणं त्यांच्यासाठीही हायजिन म्हणून गरजेचं असतं.

३) फक्त युटीआय नाही तर सेक्शुअली ट्रांसमिटेड आजारांचा धोका टाळण्यासाठीही लघवीला जाणं आणि नाजूक अवयवांची स्वच्छता करणं गरजेचं असतं.

सेक्सनंतर लघवी केल्यानं गर्भधारणा टाळता येते का?

डॉ. गौरी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्सनंतर लघवीला गेल्यानंतर सेमीनल फ्लूईड म्हणजेच पातळ द्रव पदार्थ बाहेर पडतात. पण शुक्राणू बाहेर पडतातच असं नाही. तरल पदार्थ बाहेर येण्याआधीच शुक्राणू गर्भाशयाकडे गेलेले असू शकतात. म्हणूनच शरीर संबंधानंतर लघवी केल्यानं गर्भधारणा टाळता येते असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल.

Web Title: Urination after sex when pregnant : Is Peeing After Sex Really Necessary Peeing after sex Benefits, UTI prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.