Join us  

लग्न उगाच केलं असं वाटतं? लग्न केल्याचे महिलांना कोणते फायदे होतात? लग्न का करावं, समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 3:01 PM

Top 5 Benefits of Marriage for a Woman : एकच सेक्स पार्टनर असल्यानं लैंगिक विकारांचा (STD) धोका कमी होतो. 

''शादी का लड्डू जो खाये वो पछताए जो ना खाए वो भी पछताए!''  हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  लग्न उगाच केलं किंवा लग्न खूपच लवकर केलं असं अनेकांना वाटतं.   लग्नाचे महिलांना कोणते फायदे होतात, त्यांच्या आयुष्यात स्थिरता येते का? (What are the advantages of marriage for women) कोणते बदल होतात. फाइनेंशियल बेनिफिट्स, सोशल सिक्योरिटी यावर एक नजर टाकूया. रिसर्चनुसार जेव्हा लग्न पसंतीच्या व्यक्तीशी होत असेल तर त्या नात्याचं भविष्यही चांगलं असतं. पण मनाविरुद्ध लग्न केलं असेल तर नातं टिकवण्यात अडथळे येण्याची शक्यता असते. (Top 5 Benefits of Marriage for a Woman) 

१) आर्थिक स्थिरता

लग्नानंतर घरातील फायनेंशियल बर्डन दोन्ही मिळून उचलतात. पण लग्नानंतर सासरच्यांनी पगारावर पूर्ण हक्क दाखवणं चुकीचं आहे. मुलीनं गरजेनुसार पगार सासरच्याघरी द्यायचा की माहेरी ते ठरवावं. स्वत:साठीही काही करावे. 

२) लोकांची बोलणी ऐकावी लागत नाहीत

काय मग! लग्न कधी करणार? लग्नाचं वय झालं की नातेवाईक, आजबाजूचे लोक असा प्रश्न विचारतात. लग्न झाल्यानंतर हे असा प्रश्न विचारणं बंद होतं. पण तरीही सून किती वाजता उठते, ऑफिसमध्ये इतका वेळ काय करते, घरातली कामं करते का? यावरून बोलणी ऐकावीच लागतात. 

३) काळजी घेणारं कोणीतरी असतं.

लग्न केल्यानंतर एकटेपणा दूर होतो. पण एकच पार्टनर जबाबदार असून चालत नाही. बायकोप्रमाणे नवऱ्यानं देखील तिची तितकीच काळजी घ्यायला हवी. 

४) रिसर्चनुसार लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये मोर्टेलिटीचा धोका कमी होतो आणि त्यांचं आयुष्य वाढतं. लग्नानंतर साथ देणारी व्यक्ती सोबत असल्यानं स्वत:वर लक्ष देता येतं. 

५) एकच सेक्स पार्टनर असल्यानं लैंगिक विकारांचा (STD) धोका कमी होतो. 

६) फायनेंशियल बर्डन शेअर करण्यासाठी हक्काची व्यक्ती असते. 

७) एकटेपणा कमी होतो.

८) लग्न झाल्यानंतर नात्याला सामाजातून आदर मिळतो.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप