Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न नकोच म्हणणाऱ्या तरुणांना नवा त्रास, सेटलिंग डाऊन फोबिया! पाहा ‘हा’ नवा त्रास नेमका काय आहे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:51 IST

Settling Down Phobia : अनेक तरुण 'सेटलिंग डाउन फोबिया' म्हणजेच स्थिर आयुष्याची भीती या समस्येचा सामना करत आहेत.

Settling Down Phobia : आजकालची तरुण पिढी जुन्या पारंपरिक चौकटींपेक्षा वेगळं आयुष्य जगणं पसंत करते. भारतात आजही 'सेटल होणं' म्हणजे लग्न करून घर-संसार थाटणं असा अर्थ घेतला जातो. पण आजच्या जनरेशनला ही व्याख्या पटत नाही. खासकरून महानगरांमध्ये अनेकजण लग्न करण्यास टाळाटाळ करत आहेत. कुणी याला वैयक्तिक निर्णय म्हणतात, तर कुणी स्वातंत्र्याची निवड समजतात. तर काही लोकांच्या मते हे 'बिगडलेपण' आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक तरुण 'सेटलिंग डाउन फोबिया' म्हणजेच स्थिर आयुष्याची भीती या समस्येचा सामना करत आहेत. स्थिर आयुष्य मिळाल्यावर स्वातंत्र्य कमी होण्याची भीती, आयुष्यात नियंत्रण वाढेल अशी भावना, जबाबदारीची भीती, अशा अनेक कारणांमुळे आजची तरुण पिढी लग्नापासून लांब पळताना दिसते.

काय आहे सेटलिंग डाउन फोबिया?

अनेक लोक लग्नापासून पळ काढतात कारण त्यांना आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची लुजबूड नको असते.

सेटलिंग डाउन फोबियाचे दोन पैलू

पहिला चांगला पैलू म्हणजे काहींना लग्न न करणं मानसिक आनंद देतं, काहीजण मुलांना दत्तक घेऊन स्वतःचं जग निर्माण करतात. दुसरा म्हणजे नकारात्मक पैलू. यात काही काळानंतर एकटेपणा जाणवू लागतो. भावनिक आधार कमी वाटतो. ट्रस्ट इश्यूज म्हणजेच विश्वासाचा अभाव हेही या फोबियाचे एक प्रमुख कारण आहे.

तरुणांचा बदललेला माइंडसेट

आजची जनरेशन नात्यांबद्दल पूर्वीसारखं अंधविश्वास ठेवत नाही. ते प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि सावधपणे टाकतात. प्रेम असो किंवा पार्टनरशिप, ते सर्वकाही तपासूनच पुढे जातात. त्यामुळे लग्नासारख्या मोठ्या निर्णयासंबंधी त्यांच्या मनात शंका, भीती आणि द्विधा मनःस्थिती निर्माण होते. या बदलामुळे फॅमिली स्ट्रक्चरमध्येही मोठा फरक पडला आहे. सोशल मीडियाची चमक, तुलना, आणि करिअरचा दबाव यांनी तरुणांचा माइंडसेट आणखी बदलला आहे.

स्वातंत्र्य – सर्वांत मोठा मुद्दा

आजची पिढी स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व देते. त्यांच्या मते लग्नानंतर स्वातंत्र्य कमी होईल, निर्णयांवर मर्यादा येतील आणि आयुष्यावर नियंत्रण राहणार नाही. खासकरून मुलींमध्ये ही भावना अधिक दिसून येते कारण अनेक ठिकाणी आजही लग्नानंतर त्यांच्यावर अनेक बंधने येतात. त्यामुळे अनेक मुली लग्नापासून दूर पळतात.

विश्वासाचा अभाव

आजच्या जनरेशनमध्ये नाती खूप वेगाने येतात-जातात. दर काही महिन्यांनी पार्टनर बदलणाऱ्या संस्कृतीमुळे आयुष्यभर एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं अवघड होतं, अनेकदा लोक लग्न करूनही धोका अनुभवतात, ऑफिसमध्ये किंवा समाजात दिसणारे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या घटना पाहून लोकांना लग्नाबद्दल भीती निर्माण होते. त्यांना वाटतं, 'मी लग्न केलं तर मला पण धोका मिळेल का?'

मेंटल हेल्थची महत्त्वाची भूमिका

आजची तरुणाई विवाहापासून दूर राहण्याचे एक मोठे कारण म्हणजे मेंटल पीस. लग्नानंतर केवळ जोडीदारच नाही, तर त्यांचा संपूर्ण परिवार सांभाळण्याची जबाबदारी येते. त्यातून तणाव, चिंता, मानसिक थकवा वाढतो. करिअर, परिवार आणि नात्यांचा समतोल राखणे कठीण वाटते. म्हणूनच अनेक तरुण-तरुणी मानसिक शांततेसाठी लग्नापासून दूर राहणं पसंत करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Settling Down Phobia: Why today's youth fear commitment and marriage.

Web Summary : Many young people face 'Settling Down Phobia,' fearing loss of freedom and increased responsibility. Trust issues, career pressure, and prioritizing mental peace contribute to this trend, influencing family structures as youth delay or avoid marriage.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप