Relationship Tips: कितीही मजबूत नातं असलं तरी छोट्या छोट्या चुकांमुळे तुटतं. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, फक्त प्रेम आहे म्हणजे पुरेसं झालं. प्रेम तर हवंच, पण फक्त प्रेम असून चालत नाही. नातं कोणतंही असो लोकांकडून अशा काही चुका होत असतात, ज्यामुळे मजबूत नातंही कमजोर होतं. याबाबत माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी माहिती दिली आहे. डॉ. नेने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच आरोग्यासंबंधी माहिती देत असतात. यावेळी त्यांनी नातेसंबंधांबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा एका चुकीबाबत सांगितलं ज्यामुळे नातं फार टिकत नाही.
नातं तोडणारी चूक
डॉ. श्रीराम नेने म्हणाले की, नात्यामध्ये इन्व्हेस्ट केली जात नाही आणि वेळ दिला जात नाही म्हणून नाती टिकत नाहीत. मग ते नातं मुलांसोबतचं असो, पती-पत्नीचं असो किंवा प्रेयसी-प्रियकराचं असो. कुटुंबातील लोक असो वा पाळीव प्राण्यासोबत असो, नात्यात एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. जेणेकरून नातं डेव्हलप व्हावं आणि एकमेकांच्या गरजा जाणून घेता याव्यात. सोबतच जर तुम्हाला काही हवं असेल तर द्यावं सुद्धा लागेल. मग ती वेळ असेल, प्रेम असेल किंवा एफर्ट्स असतील. नात्यात वेळ आणि एफर्ट्स (Efforts) दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तेव्हाच नातं टिकून राहतं आणि मजबूत राहतं.
काही टाळायच्या चुका
- जर दोन व्यक्तींमधील संवाद योग्य नसेल तर कितीही जुनं आणि मजबूत नातं असेल तर त्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जर एकमेकांच्या काही गोष्टी पटत नसतील किंवा त्या गोष्टींमुळे वाईट वाटत असेल तर बोलून या गोष्टी दूर करता येऊ शकतात.
- जर एखादा गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालला असेल तर त्याला अधिक वाढू देऊ नका. गैरसमज किंवा संशय नात्यातील वैरी असतात. ज्यामुळे नाती तुटतात. अशात वेळीच गैरसमज किंवा संशय दूर केले पाहिजे.
- एकमेकांवरील विश्वास कमी झाल्यावरही नाती बिघडतात. नात्यांमध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो. विश्वास नसेल तर नातं फार काळ टिकत नाही.
- बरीच नाती या कारणानंही तुटतात कारण कपल्स भविष्याबाबत काही बोलत नाहीत. त्यांना आयुष्याकडून काय हवंय याबाबत बोलत नाहीत. दोघांमध्ये प्रेम कितीही असू द्या, पण भविष्याबाबत काहीना काही वाद होतात अशात नाती तुटतात.