Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > ऐकत नसलेल्या जोडीदाराशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, नातं घट्ट होईल-प्रेमही टिकेल

ऐकत नसलेल्या जोडीदाराशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, नातं घट्ट होईल-प्रेमही टिकेल

Sudha Murthy Tips For healthy Relationship : त्यांना सातत्यानं एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नातं दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काय करावं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:54 IST2025-10-29T13:48:42+5:302025-10-29T13:54:36+5:30

Sudha Murthy Tips For healthy Relationship : त्यांना सातत्यानं एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नातं दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काय करावं.

Sudha Murthy Tips For healthy Relationship Things You Should Apply in Your life | ऐकत नसलेल्या जोडीदाराशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, नातं घट्ट होईल-प्रेमही टिकेल

ऐकत नसलेल्या जोडीदाराशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, नातं घट्ट होईल-प्रेमही टिकेल

जेव्हा दोन व्यक्ती कोणत्याही नात्यात असतात तेव्हा समजणं आणि समजून घेणं या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. पण असं होताना दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या तक्रारी मांडत असतो. नातं सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. पती पत्नीत सतत वाद होत असतील तर नातं टिकवण्यासाठी तसंच नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी सुधा मूर्ती यांनी काही टिप्स आहे. सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिका तसंच राज्यसभा खासदारही आहेत. त्यांनी हेल्दी रिलेशनशीपबाबत काही टिप्स सांगितल्या आहेत. (Sudha Murthy Tips For healthy Relationship Things You Should Apply in Your life)

इंफोसिस फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना अनेक व्यासपीठांवर तुम्ही पाहिलं असेल. त्यांना सातत्यानं एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नातं दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काय करावं. यावर अनेक प्रकारच्या कमेंट्स देण्यात आल्या आहेत. बरेच लोक त्यांना फॉलो सुद्धा करतात. (Relationship Tips By Sudha Murthy)

नात्यात स्पर्धा नको

सुधा मूर्ती सांगतात की कोणत्याही नात्यात स्पर्धेची भावना असणं चुकीचं आहे. पुरूष एखादं काम उत्तम करू शकतात. गरजेचं नाही की महिलासुद्धा तेच काम उत्तमरित्या करू शकतील. त्या इतर कोणत्याही कामात एक्सपर्ट असू शकतात. दोघांनीही एक दुसऱ्याच्या स्ट्रेंथचा सन्मान करायला हवा.

दुधावर येईल घट्ट भाकरीसारखी साय येईल; दूध तापवताना लक्षात ठेवा ७ टिप्स, जाडजूड सायीसाठीची युक्ती

एकमेकांचे स्वातंत्र्य
 
कोणत्याही नात्यात स्वातंत्र्य खूप महत्वाचे आहे. असं न झाल्यास पार्टनरला एखाद्या नात्यात अडकल्यासारखं वाटू शकतं आणि नात्यात दुरावा येतो. म्हणून पार्टनरला स्पेस द्या आणि एकमेकांच्या आवडी निवडींचा सन्मान करा.

मैत्रीचं नातं

कोणत्याही नात्यात मैत्री असणं फार महत्वाचं असतं.  सुधा मूर्ती सांगतात की पती, पत्नी एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. मैत्रीत आपण बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित करतो. ज्यामुळे नातं खराब होऊ  शकतं. 

कपाळावरचे केस विरळ-टक्कल दिसतं? ५ रूपयांत कढीपत्त्यांचं हेअर टॉनिक लावा, दाट केस होतील

विश्वास खूप महत्वाचा

सुधा मूर्ती सांगतात की कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. जर  तुम्हाला एकमेकांवर विश्वास नसेल तर नातं व्यवस्थित टिकू शकत नाही. एकमेकांचा विश्वास संपादन करायला हवा.  नात्यात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे.

Web Title : सुधा मूर्ति के 4 टिप्स: मजबूत, प्यार भरे रिश्ते के लिए

Web Summary : सुधा मूर्ति स्वस्थ रिश्ते के लिए सुझाव साझा करती हैं: प्रतिस्पर्धा से बचें, एक दूसरे के स्थान और ताकत का सम्मान करें, दोस्ती को बढ़ावा दें और स्थायी बंधन के लिए विश्वास बनाएं।

Web Title : Sudha Murthy's 4 tips for a strong, loving relationship.

Web Summary : Sudha Murthy shares tips for a healthy relationship: avoid competition, respect each other's space and strengths, nurture friendship, and build trust for a lasting bond.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.