Join us  

सतत वाद होतात-पार्टनर समजूनच घेत नाही? ५ गोष्टी करा, श्री श्री रवी शंकर सांगतात सुखी नात्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:19 AM

Sri Sri Ravishankar Secrets To a Successful Relationship : पार्टनरने समजून घ्यावं अशी अपेक्षा असताना चिडचिड किंवा राग येत असेल तर यामुळे नात्यातील आनंद कमी होऊ शकतो.

रिलेशनशिप असो किंवा लग्न दोघांमध्ये मतभेत होणं, एकमेकांचे विचार न पटणं खूपच कॉमन आहेत. अनेकदा याच गोष्टींमुळे नात्यावर चुकीचा परिणाम होतो. (Relationship  Tips)अनेकदा स्वत:ला बदलावं लागतं, पार्टनरने समजून घ्यावं अशी अपेक्षा असताना चिडचिड किंवा राग येत असेल तर यामुळे नात्यातील आनंद कमी होऊ शकतो.एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना कमी होऊ शकतात. (Sri Sri Ravishankar Secrets To a Successful Relationship)

आर्ट लिविंगचे संस्थापक आणि लोकप्रिय अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी  नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी आणि उत्तम नातेसंबंधांसाठी काही सोप्या टिप्स  शेअर केल्या आहेत. तुम्हीसुद्धा  नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी या सोप्या टिप्ससचा वापर करू शकता. रवीशंकर यांनी सांगितलेल्या टिप्स शेवटपर्यंत नात्यातलं प्रेम टिकवण्यास मदत  करू शकतात. (Thing To Know to Improve Your Relationship)

पार्टनरकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष देऊ नका

श्री श्री रवीशंकर सांगतात की आपल्या आयुष्यात कोणतंही लक्ष्य मिळवण्यासाठी तुम्ही त्या दिशेने पुढे जात राहायला हवं.  ज्यामुळे तुमचं नातही चांगलं  चालेल. पण पूर्ण लक्ष नात्याकडेच राहिले तर चालणार नाही. पार्टनरसोबत राहत असताना वैयक्तिक विकास आणि आयुष्यातील संधींवर पूर्णपणे लक्ष द्यायला हवं.

एकमेकांना पर्सनल स्पेस द्या

प्रेम मिळण्यासाठी इच्छा गरजेची असते. ही इच्छा नष्ट झाल्यात तुमच्यात प्रेम जिवंत राहणार नाही. सतत बोलणं, सतत कॉलिंग असं करण्यापेक्षा  एकमेकांना पर्सनल स्पेस  द्या. यामुळे भांडणं कमी  प्रमाणात होतील आणि एकमेकांना हवातसा वेळ एकमेकांबरोबर घालवता येईल. 

नात्यात देवणा-घेवाण

कोणत्याही  छोट्या मोठया गोष्टीत पार्टनरचे मत विचारात घ्यायला विसरू नका. मनोविज्ञानानुसार याला बेंजामिन फ्रँकलिन प्रभाव असं म्हणतात. यानुसार जे लोक आपल्यासाठी सर्वकाही करतात.  त्यांना अधिक पसंती दिली जाते. छोट्या, मोठ्या कामांमध्ये पार्टनरचा सल्ला नक्की घ्या. यामुळे त्यालाही पूर्ण इन्वॉलव्ह होता येईल. 

ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

काही गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्या

सद्गुरू सांगतात काही लोकांना स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. पार्टनरला तुमची भिती वाटू शकते ज्यामुळे नातं खराब होऊ शकतं. म्हणून  घरी आरामातून बसून  योगा, ध्यान करा. ज्यामुळे नात्यात सकारात्मक वातावरण तयार होतील.

एकमेकांचा आदर करा

श्री श्री रविशंकर यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नात्यात सन्मान असायला हवा.  एकमेकांचा अनादर केल्यास कोणतंही नात व्यवस्थित टिकणार नाही. यामुळे लालच  कमी होते. म्हणूनच जीवनात तुम्हाला जे काही मिळाले आहे त्याबदद्ल आभार व्यक्ती करा.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप