Join us  

Sexual Health : खूप कमी लोकांना माहीत असतं हॅप्पी Sex लाईफचं 'हे' सिक्रेट; समोर आला रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 7:22 PM

Sexual health : संशोधकांच्यामते सेक्स हा स्वत:सोबत पार्टनरला जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. संशोधकांनी लैगिंक जीवन चांगलं बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.

लैगिंक जीवन (Sex Life) चांगलं असेल तरच वैवाहिक आयुष्यही सुखी होतं. अनेकांना आपलं वैवाहिक आयुष्य आणि जोडीदारासोबतच नातं अधिकाधिक खुलवण्यासाठी काय करायला हवं याची कल्पना नसते. कॅनडातील ओटावा युनिव्हर्सिटीतील मनोवैज्ञानिक आणि सेक्स थेरेपिस्ट डॉक्टर पॅगी क्लेनप्लात्ज यांनी सेक्स लाईफबाबत केलेला एक अभ्यास समोर आला आहे.  संशोधकांच्यामते सेक्स हा स्वत:सोबत पार्टनरला जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. संशोधकांनी लैगिंक जीवन चांगलं बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. (Ways to help yourself to a better sex life)

पार्टनरला पूर्ण वेळ द्यायला हवा

संशोधकांच्यामते सध्याच्या काळात लोकांना सोशल मीडिया पाहत मोबाईल्सना चिकटून राहण्याची सवय असते. काहीजण तर इंटीमसीदरम्यानही फोन चेक करत असतात. ते शारीरिकदृष्ट्या पार्टनरसोबत असतात पण त्याचा मेंदू इतर ठिकाणी असतो. शरीरसंबंध ठेवताना पार्टनरसह पूर्णपणे इन्वॉल्व होणं गरजेचं आहे.

संभोगाची परिभाषा अधिक व्यापक

अजूनही सेक्सबाबत लोकांच्या मनात गैरसमज असून जुने विचार आहेत. आपण पार्टनरसोबत काय करायला हवं आणि काय नाही याचा पॅटर्न ठरवून अनेकांची सेक्स लाईफ सुरू असते. फक्त इंटरकोर्स नाही तर खूप गोष्टी चांगल्या संबंधांसाठी मॅटर करतात. किस करणं, फोरप्ले, सेक्स टॉक या गोष्टींमुळे पार्टनरला समजून घेण्यास मदत होते. संशोधकांच्यामते लोकांनी आपल्या सेक्स लाईफमधील फँटसीज ओळखायला हव्यात.

स्वत:वर विश्वास असायला हवा

अनेकांच्या मनात सेक्स फँटसीजबाबत भीती असते की त्यांचा पार्टनर चुकीचं काही समजला तर?, तज्ज्ञांच्यामते तुम्हाला सेक्समधील बारकावे समजून घ्यायचे असतील सेल्फ अरवेअरनेस महत्वाचा आहे. जर तुमच्या पार्टनरचा तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही आपल्या फँटसीज शेअर करू शकता. 

प्रामाणिक राहा

अनेकजण बेडरूमध्येम त्यांना सर्वाधिक आनंददायी काय वाटतं हे स्वीकारायला तयार नसतात.  जर तुम्ही आपल्या आवडी निवडी स्वीकारल्या नाही, पार्टनरला सांगितल्या नाही तर तुम्ही संबंध इन्जॉय करूच शकणार नाही.  सेक्स एज्यूकेटर सांगतात की, सगळ्यात आधी तुम्ही पार्टनरला विश्वासात घ्या नंतर तुम्हाला काय आवडतं काय नाही, पार्टनरच्या कोणत्या कृतीमुळे तुम्ही नर्व्हस होता हे त्यांच्याशी बोला. 

 कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात

सुरूवातीपासूनच बोलायला शिका

रिलेशनशिपच्या सुरूवातीपासूच तुम्ही  सेक्सबाबत मोकळेपणानं बोलायला हवं. एकमेकांना फिडबॅक आवर्जून द्या. एकमेकांच्या चांगल्या-  वाईट सवयींबद्दल बोला. सेक्सला गांभीर्यानं घेण्यापेक्षा हसत खेळत बोलून पार्टनरसह आनंदानं जगा.  रोजच्या जगण्यातील इतर कामांप्रमाणेच संबंधानाही तेव्हढीच प्रायोरिटी द्या. 

टॅग्स :हेल्थ टिप्सलैंगिक आरोग्यलैंगिक जीवनआरोग्य