Join us  

Sexual health : Sex चा विषय काढताच तिची चिडचिड होते? 'हा' आजारही असू शकतो, ४ गंभीर कारणं....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 7:05 PM

Sexual health : बीएमजी ओपन स्टडीज या ब्रिटिश अभ्यासानुसारही शहरी धकाधकीची लाइफस्टाइल आणि स्ट्रेस यामुळे लैंगिक जीवनातला रस कमी होत असल्याचे दिसते.

सुखी लैगिंक जीवनामुळे वैवाहिक आयुष्य फुलतं. नात्याची वीण घट्ट होते. पण कधीकधी एक फेज अशी येते की स्त्रियांचा सेक्समधला रस संपून जातो. तो विषय त्या टाळतात. जोडीदाराला सतत नकार देतात. त्यांचं मन त्या संबंधातून उडालेलं असतं. अनेकदा जोडीदार हे समजून घेतात, कधी त्यावरुन वाद, भांडणं, धुसफूस आणि चार भिंतीतला कलह सुरु होतो. ती मुद्दाम करते, आजारीच आहे असं म्हणत दोष देण्यापेक्षा असे नेमके का होत असेल याचा विचार करायला हवा.

त्याची कारणं आजवरच्या अनेक शास्त्रीय अभ्यासातूनही समोर आलेली आहेत. लॉस ऑफ सेक्शुअल डिझायर ही एक प्रकारची डिसऑर्डर किंवा आजारही असू शकतो. शेरील किंग्जबर्ज या सेक्स सायकॉलॉजिस्टने यासंदर्भात केलेले अभ्यास प्रसिध्द आहेत. बीएमजी ओपन स्टडीज या ब्रिटिश अभ्यासानुसारही शहरी धकाधकीची लाइफस्टाइल आणि स्ट्रेस यामुळे लैंगिक जीवनातला रस कमी होत असल्याचे दिसते.

रस कमी होण्याची कारणं कोणती?

१. जोडीदाराची एखादी सवय आवडत नाही.

दैंनदिन वागण्यातली एखादी गोष्ट आवडत नसेल, जोडीदाराचं वागणं- बोलणं आवडत नसेल, तर मनात येणारी कटूता म्हणून जवळीक स्त्री नाकारते. संबंधात तिला सुख वाटत नाहीत. त्यामुळे  चिडचिड करण्यापेक्षा पार्टनरला विश्वासात घेऊन जर मोकळेपणानं बोललं, काय गैरसमज, किंवा कशाबद्दल नाराजी आहे ते समजून त्याप्रमाणे तोडगा काढला तरी नाते सुधारू शकते.

२. फोर प्ले संदर्भातल्या अपेक्षा

महिलांना फोरप्ले आवडतो, अनेकजणी ते बोलून दाखवत नाही. काय सांगायचं हे त्यांना कळत नाही. आणि जोडीदाराला शृंगारात अजिबात रस नसतो, त्यातून ती कृती महिलेला सुख देण्यापेक्षा दु:खच देते.  पत्नीला सेक्स नको असतो असे नाही, पण तिच्या अपेक्षा वेगळ्या असतात. जर फोरप्लेमध्ये जास्त वेळ दिला नाही तर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओलसरपणा येत नाही आणि अशावेळी महिलेला संबंधांवेळी वेदना होतात. कधी कधी तिला कामोत्तेजना अनुभवही येत नाही. म्हणूनच फोरप्लेसाठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे.

३. ताण तणाव, थकवा

ऑफिस आणि घरातील सर्व कामांनी थकवा आलेला असू शकतो. त्यामुळे सेक्स करण्याऐवजी रात्री विश्रांती घेणे तिला स्वाभाविक वाटते. शरीर संबंध ठेवायला खूप उर्जेची, गरज असते. दिवसभराचा थकवा असताना रात्री शरीरसंबंध ठेवण्यात सगळ्यांनाच उत्साह असतो असं नाही. त्यापेक्षा रात्री छान झोप घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे फ्रेश मूडमध्ये असताना संभोग केल्यास उत्तम ठरेल किंवा सुट्टीच्या दिवशी, विकेंडला प्लॅन करून तुम्ही पार्टनरसह चांगला वेळ घालवू शकता.

प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

४. सेक्सबाबत वाटणारी भीती

सेक्स दरम्यान वेदना जाणवत असतील तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. अनेकींना त्या संबंधाबाबत भीती असते, वेदना होतात ते सांगता येत नाही. म्हणूनही शरीरसंबंध त्या टाळतात. त्यासंदर्भात निकोप चर्चा, प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला आणि परस्पर सामंजस्य हेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक आरोग्य