नातं टिकवून ठेवणं हे आता मोठं आव्हान झालं आहे. कारण एकमेकांना समजून घेण्याची किंवा कुठेतरी माघार घेऊन ॲडजस्ट करण्याची सवय आता कमी होत चालली आहे. अगदी सर्वसामान्य कुटूंबांमध्येही घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तिथे बॉलीवूडसारख्या सेलिब्रिटींची काय बात... पण अशा वातावरणात इतकी वर्षे राहूनही अमिताभ आणि जया या सुपरहिट जोडीचं नातं मात्र घट्ट टिकून आहे. त्यांच्या आयुष्यातही खूप वादळं आली. अफेअर्सच्या बाबतीतही चर्चा रंगल्या. पण आज या दोघांच्या सहजीवनाला ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेला असला तरी त्यांचं नातं मात्र आजही तितकंच फ्रेश आहे. त्यांचं प्रेम टिकून आहे. या त्यांच्या लव्ह लाईफचं सिक्रेट नेमकं काय याविषयी त्यांनीच दिलेली ही खास माहिती...
अमिताभ बच्चन यांच्या लव्ह लाईफचं सिक्रेट काय..
अमिताभ बच्चन यांनी त्यांचं नातं सांभाळून ठेवण्यासाठी असं काय वेगळं केलं असा प्रश्न त्यांच्या एका चाहत्याला नेहमीच पडायचा. हा त्यांचा चाहता कौन बनेगा करोडपती या त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि नेमकी त्याला चक्क अमितजींनाच हा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. यावर अमिताभजी यांनी अगदी मोजक्या शब्दांत जे उत्तर दिलं ते प्रत्येक जाेडप्यासाठीच खूप उपयुक्त ठरणारं आहे. अमितजी म्हणाले की नात्यामध्ये प्रेम टिकवून ठेवायचं असेल आणि बायकोने आनंदी राहावं असं वाटत असेल तर समजूतदारपणा दाखवा. शिवाय जो प्रॉब्लेम बहुसंख्य पुरुषांमध्ये दिसून येतो, त्यावरही त्यांनी बोट ठेवलं.
इगो बाजुला ठेवा. चूक झाली असेल तर मान्य करा आणि नातं टिकवून ठेवा.. त्यांनी आनंदी सहजीवनाची ही जी काही सूत्रं सांगितली आहेत ती नवरा आणि बायको या दोघांनाही बरोबर लागू होणारी आहेत. कारण हल्ली दोघंही आपापलं म्हणणं खरं करण्यासाठी अडून बसलेली असतात. दोघांमध्येही खूप इगो असतो आणि समजूतीने घेण्यासाठी माघार घेण्याचीही त्यांनी तयारी नसते. मग अशावेळी आपलं नातच प्रचंड ताणलं जात आहे, हे त्यांच्या गावीही नसतं. हे कुठेतरी कमी झालं तर प्रत्येक नातं टिकून राहाणं खूप सहज, सोपं होऊन जाईल, नाही का?
Web Summary : Amitabh Bachchan shared his secret to a successful marriage: understanding and humility. He emphasized leaving ego aside, admitting mistakes, and prioritizing the relationship for lasting love and happiness. These tips apply equally to both partners.
Web Summary : अमिताभ बच्चन ने सफल विवाह का रहस्य बताया: समझदारी और विनम्रता। उन्होंने अहंकार को त्यागने, गलतियाँ स्वीकार करने और स्थायी प्रेम और खुशी के लिए रिश्ते को प्राथमिकता देने पर जोर दिया। ये सुझाव दोनों भागीदारों पर समान रूप से लागू होते हैं।