How To Say Sorry: आपण जेव्हा कुणाशी वाद झाला, कुणाशी भांडण झालं किंवा कुणाला काही मन दुखेल असं काही बोललो तर त्यानंतर पश्चाताप झाल्यावर समोरच्या व्यक्तीची माफी मागतो. आपल्या माफी मागण्याच्या पद्धतीवरून समोरच्या व्यक्तीला हे कळत असतं की, तुम्ही खरंच मनापासून माफी मागत आहात की बळजबरी माफी मागताय. त्यामुळे आपली माफी मागण्याची पद्धत खूप महत्वाची ठरते.
अलिकडेच एका शोधातून समोर आलं आहे की, माफी मागण्याची योग्य पद्धत काय आहे आणि कशाप्रकारे माफी मागणं अधिक प्रभावी ठरू शकतं. हा शोध रॉयल होलोवे यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये शिरी लेव-आरिनं याची माहिती घेतली की, सॉरी कशा पद्धतीनं म्हणणं अधिक प्रभावशाली ठरू शकतं.
सॉरी कसं म्हणावं?
शोधातून समोर आलं आहे की, सॉरी म्हणत असताना ज्या शब्दांचा वापर केला जातो, त्यावरून हे समजून येतं की, तुम्ही खरंच मनापासून सॉरी म्हणत आहात की फक्त मागावी म्हणून मागत आहात. सॉरी या शब्दाला फार लायटली घेतलं जातं. सॉरी मनापासून म्हणणं महत्वाचं ठरतं.
एखाद्या व्यक्तीला केवळ सॉरी म्हणण्याऐवजी थोडा खर्च केला तर सॉरी अधिक प्रभावशाली ठरू शकतं. म्हणजे सॉरी म्हणताना समोरच्या व्यक्तीला एखादं गिफ्ट द्याल तर अधिक चांगलं होईल. असं 2009 साली करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आलं होतं.
शब्दांची काळजी घेणं गरजेचं
तुम्हाला माफी जर लिहून मागायची असेल तर काय लिहावं हेही खूप महत्वाचं ठरतं. जर माफी मागण्यासाठी जास्त लांब आणि कठीण शब्दांचा वापर केला गेला तर माफी मागण्यासाठी जास्त मेहनत घेतली गेली असं समजतं..
शेवटी काय होतं?
शोधातून समोर आलं आहे की, जास्त लांब वाक्यांचा किंवा शब्दांचा वापर केल्यानं असं वाटतं की, माफी मागणाऱ्यासाठी हे शब्द बोलणं किंवा लिहिणं अवघड आहे, पण समजणाऱ्यासाठी हे अवघड नसतं. हे शब्द प्रभावी ठरतात. जास्त लिहिल्यामुळे असं वाटतं की, पश्चाताप करत माफी मागितली जात आहे.