What is Situationship ? : हल्ली नात्यांच्या अनेक परिभाषा समोर येत आहेत. काळानुसार तरूण मंडळी नात्यांकडे फारच वेगळ्या दृष्टीने बघत आहेत. असंच एक वेगळं नातं हल्ली चांगलंच बघायला मिळतं. ते म्हणजे सिचुएशनशिप. ना मैत्री, ना प्रेम आणि ना कोणतीही कमिटमेंट… जर तुमचं नातंही अशाच गोंधळात अडकलेलं असेल, तर शक्यता आहे की आपण सिचुएशनशिपमध्ये आहात. आजच्या काळात नातेसंबंध समजून घेणं आणि त्यांना नाव देणं खूप अवघड झालं आहे.
रिलेशनशिपमध्ये अनेक वेळा असं होतं की आपण एकमेकांच्या खूप जवळ असतो, एकत्र वेळ घालवतो, मनमोकळ्या गप्पा मारतो. पण नात्याला नाव देण्यापासून मात्र टाळतो. ना ते पूर्णपणे डेटिंग असतं, ना ऑफिशिअल रिलेशनशिप. Gen Z ने अशा गोंधळलेल्या नात्यांना सिचुएशनशिप असं नाव दिलं आहे. जर आपल्यालाही वाटत असेल की तुम्ही अशाच एखाद्या संभ्रमात आहात, तर या सोप्या संकेतांवरून ओळखा की तुम्ही सिचुएशनशिपमध्ये आहात की नाही.
सिचुएशनशिपची लक्षणं
कमिटमेंटचा अभाव
सिचुएशनशिपचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे कमिटमेंट नसणं. “आपण पुढे काय करणार?” असा प्रश्न तुमच्या मनात सतत असतो आणि समोरच्याला विचारल्यावर तो टाळाटाळ करतो. जर नात्यात प्रश्नच जास्त आणि उत्तरं कमी असतील, तर ते सिचुएशनशिप असण्याची शक्यता आहे.
फक्त गरज असेल तेव्हाच संपर्क
जर तुमचा पार्टनर फक्त त्याला काही काम असेल किंवा मदतीची गरज असेल तेव्हाच संपर्क करत असेल, तर हा देखील एक मोठा इशारा आहे. सिचुएशनशिपमध्ये नातं कमी घट्ट असतं आणि ते बहुतांशी गरजेपुरतंच मर्यादित राहतं. खऱ्या नात्यात मात्र एकमेकांची सवय आणि गरज दोन्ही बनतात.
वारंवार मूड बदलणं
सिचुएशनशिपमध्ये पार्टनरचा मूड सतत बदलत राहतो. कधी खूप जवळीक, तर दुसऱ्या दिवशी पूर्ण अंतर. कधी प्रेमळ शब्द आणि कौतुक, तर कधी शांतता आणि दूरावा. हे चढउतार तुम्हाला गोंधळात आणि तणावात टाकू शकतात.
हे समजून घेणं का गरजेचं आहे?
नातं कोणतंही असो, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सिचुएशनशिप चुकीची नाही, पण त्यामुळे तुम्ही कायम संभ्रमात राहता, ज्यामुळे भावनिक थकवा येतो. हे ओळखणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता — नातं पुढे न्यावं की स्वतःसाठी थोडं अंतर ठेवावं.
Web Summary : Gen Z embraces 'situationships': relationships lacking commitment. These are defined by inconsistent contact, fluctuating moods, and an unwillingness to define the relationship. Understanding this trend is crucial for emotional well-being and informed decisions about relationship direction.
Web Summary : जेन Z 'सिचुएशनशिप' को अपना रहा है: प्रतिबद्धता की कमी वाले रिश्ते। ये असंगत संपर्क, बदलते मूड और रिश्ते को परिभाषित करने की अनिच्छा से परिभाषित होते हैं। भावनात्मक भलाई और रिश्ते की दिशा के बारे में सूचित निर्णय लेने के लिए इस प्रवृत्ति को समझना महत्वपूर्ण है।