lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश...

Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश...

Relationship Tips : नातं कायम ताजंतवानं आणि तितकंच रोमँटीक ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 04:16 PM2022-05-11T16:16:29+5:302022-05-11T17:00:10+5:30

Relationship Tips : नातं कायम ताजंतवानं आणि तितकंच रोमँटीक ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी....

Relationship Tips: Remember 5 important things to increase romance in a relationship after marriage; Always happy with your partner | Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश...

Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश...

Highlightsदिवसातील ठराविक वेळ किंवा ठराविक गोष्ट एकमेकांसोबत केली तर आपला कनेक्ट वाढण्यास नक्कीच मदत होते. नातं सदाबहार राहणं वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही, पण काही गोष्टींमुळे त्यातली मजा टिकवून ठेवता येते

लग्न झालं की जोडीदार एकमेकांचे होतात हे खरे. पण जसेजसे दिवस जातात तसे नात्यातले नाविन्य कमी होते आणि एकमेकांचे दोष, चुका दिसायला लागतात. लग्नानंतर सुरुवातीचा काळ गुलाबी असतो खरा पण एकदा एकमेकांचे स्वभाव, आवडी-निवडी, वागण्याच्या पद्धती कळल्या की मग खटके उडायला सुरुवात होते. मग आपण प्रेम केलेली व्यक्ती हिच होती का असा प्रश्न निर्माण होईल इतकी नात्यात दरी निर्माण व्हायला लागते. एकदा ही दरी निर्माण झाली की ती भरुन यायला खूप वेळ लागतो. मात्र नात्यातील प्रेम, आपुलकी, रोमान्स जास्तीत जास्त वर्ष टिकवायचा असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात (Relationship Tips). नात्यातील ताजेपणा जपायचा तर एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, आदर देणे, चर्चा करुन वादाचे मुद्दे दूर करणे या गोष्टींकडे मुद्दाम लक्ष द्यायला हवे. पाहूयात नातं कायम ताजंतवानं आणि तितकंच रोमँटीक ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी....

(Image : Google)
(Image : Google)

१. वेळेचे नियोजन 

हा मुद्दा काहीसा वेगळा वाटत असला तरी कपल म्हणून तुम्ही एकत्र राहत असता तेव्हा तुम्ही घरातली कामे, ऑफीस याबरोबरच स्वत:साठी आणि एकमेकांसाठी वेळ काढायला हवा. वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने केले तर हे सहज शक्य आहे. त्यामुळे नाते खुलण्यास मदत होईल.

२. वाद मिटवणे 

नवराबायकोच्या नात्यात तुम्ही एकमेकांशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. काही बाबतीत तुमची मते एकमेकांशी जुळत नाहीत असे होऊ शकते. मात्र वेळीच हे वाद मिटवले नाहीत तर फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामुळे रागराग होणे, मानसिक ताण येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे भांडणे झाली की ती वेळच्यावेळी एकमेकांशी बोलून सोडवायला हवीत. 

३. एकमेकांना आदर देणे 
भांडायचे तेही आदराने हा केवळ सैन्यातील वाक्प्रचार नाही तर प्रत्यक्षातही तसे करता यायला हवे. आपण एकदा वापरलेले शब्द आपल्याला काही केले तरी परत घेता येत नाहीत. त्यामुळे विशेषत: लग्नाच्या बाबतीत जोडीदाराशी बोलताना दोघांनीही आदरानेच बोलायला हवे. तुमचे घरगुती खासगी विषय चारचौघात बोलणे योग्य नाही. त्यामुळे तुमची किंमत कमी होण्याची शक्यता असते, म्हणूनच कितीही वाद झाले तरी एकमेकांशी आदरानेच बोलायला शिका.

४. पार्टनरमधली चांगली बाजू पाहा

आपण सगळेच रोजच्या व्यापात पार गढून गेलेलो असतो. ऑफीस, घर, आर्थिक, कौटुंबिक आणि इतर ताण यांमधून आपल्याला अजिबात वेळ नसतो. असे असले तरी आपल्या पार्टनरला एखादी कॉम्प्लिमेंट द्यायला विसरु नका. दिवसातून एकदा तरी तुमचं तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम आहे, तुम्हाला तिची/त्याची काळजी आहे. तिच्या किंवा त्याच्या प्रगतीमध्ये तुम्ही खूप आनंदी आहात हे सांगायला विसरु नका. 

५. एकमेकांशी कनेक्ट वाढवा

दिवसभरात कोणतीही एक गोष्ट तुम्ही एकमेकांसोबत आवर्जून करु शकता. मग तो सकाळी उठल्यावर घ्यायचा चहा असेल किंवा रात्री झोपताना मारलेला एखादा राऊंड असेल. दिवसभर आपण सगळेच खूप बिझी असतो पण दिवसातील ठराविक वेळ किंवा ठराविक गोष्ट एकमेकांसोबत केली तर आपला कनेक्ट वाढण्यास नक्कीच मदत होते. 

Web Title: Relationship Tips: Remember 5 important things to increase romance in a relationship after marriage; Always happy with your partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.