Join us

सतत भांडण-सतत वाद? फक्त ६ गोष्टी करा-रोजची तु तू-मै मै संपून वाढेल प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 16:47 IST

Relationship tips, Constant fights-constant arguments? Just do 6 things, love life tips : प्रेम वाढवण्यासाठी आणि भांडणं मिटवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी. काही सवयी ठरतात नात्यासाठी फायद्याच्या.

आजकाल अगदी लहान गोष्टीवरूनही जोडप्यांचे बिनसते. एखाद्या नात्यात असणाऱ्या दोन व्यक्ती संपूर्ण सारख्या असू शकत नाहीत. स्वभाव जुळवून समजूतदारपणा दाखवावा लागतो, तरच नाते टिकते. (Relationship tips, Constant fights-constant arguments? Just do 6 things, love life tips  )पण  ब्रेकअप तसेच लोकांचे घटस्फोट व्हायचे प्रमाण फार वाढले आहे. एखादं नातं टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्तींचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. साध्या गोष्टी किचकट करायची गरज नसते. काही साध्या कृती करुनही नाती टिकवता येतात. जर वारंवार खटके उडतात, चिडचिड होते तर त्यावर उपाय शोधणे उचित ठरते. अशा ६ सवयी आहेत ज्या नातं टिकवण्यासाठी फार गरजेच्या असतात.     

१. नात्यात संवाद हवा. भांडणानंतर अबोला धरणे नात्यासाठी धोक्याचे असते. कितीही किचकट विषय असला तरी तो संवादाने सोडवता येतो. एकमेकांचे म्हणणे ऐकण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या भावनाही समोरच्याला वेळोवेळी सांगा. मनात काही साठवून ठेवायचे नाही. मनात साठल्यावर त्याचे रुपांतर रागात होते. त्यामुळे संवाद  फार महत्वाचा. 

२. शारीरिक संबंधांचा नात्यावर फार परिणाम होते. त्यामुळे मिठी मारणे, हातात हात धरणे अशा कृती नात्यात कायम असायला हव्यात. त्यामुळे समोरच्याला आपल्या प्रेमाची जाणीव होते. 

३. तुमच्या भूमिका सतत बदलत राहतात. इतरही नाती सांभाळावी लागतात. ती नाती सांभाळताना तुमच्या प्रियकराला किंवा प्रियसीला वेळ द्यायला विसरु नका. कामाच्या घाईत कधी भेटणे राहून जाते. त्यामुळे मेसेज, फोन या माध्यमांतून कायम संवादात राहा. एकमेकांना वेळ द्या.

४. नाते मैत्रीसारखे असायला हवे. जसे आपल्याला मित्रमैत्रीणींशी मनमोकळेपणाने बोलता येते तसेच या नात्यातही बोलता यायला हवे. नात्यात मैत्री  असायलाच हवी. 

५. माफी मागणे आणि माफ करणे फार गरजेचे असते. लहान गोष्टींमध्ये रुसवे फुगवे होतातच. मात्र ते चघळत न बसता सोडवणे योग्य ठरते. चूक मान्य करायला शिका. समोरच्या प्रति आदर असायला हवा. 

६. कोणत्याही नात्यात समोरच्या दोघांनी एकमेकांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे असते. लहान मोठ्या यशांमध्ये कायम कौतुक करणे, सोबत उभे राहणे मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे असते.  

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमानसिक आरोग्यलैंगिक जीवन