>रिलेशनशिप > Relationship : '...पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी जवळ यायचे, नंतर सोडून जायचे'; मॉडेलचा सेक्स लाईफबद्दल खुलासा

Relationship : '...पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी जवळ यायचे, नंतर सोडून जायचे'; मॉडेलचा सेक्स लाईफबद्दल खुलासा

Relationship : आमच्यात सेक्यूअल इंटिमसी व्हायची. त्यानंतर लगेचच आमचं रिलेशनशिप तुटायचं. मला असं वाटायला लागलेलं की, पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी माझ्याजवळ येतात आणि गरज पूर्ण झाल्यानंतर सोडून जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:25 PM2021-10-08T18:25:55+5:302021-10-08T18:37:54+5:30

Relationship : आमच्यात सेक्यूअल इंटिमसी व्हायची. त्यानंतर लगेचच आमचं रिलेशनशिप तुटायचं. मला असं वाटायला लागलेलं की, पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी माझ्याजवळ येतात आणि गरज पूर्ण झाल्यानंतर सोडून जातात.

Relationship :Celibate relationship amarantha robinson model australia experience sex abstinence | Relationship : '...पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी जवळ यायचे, नंतर सोडून जायचे'; मॉडेलचा सेक्स लाईफबद्दल खुलासा

Relationship : '...पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी जवळ यायचे, नंतर सोडून जायचे'; मॉडेलचा सेक्स लाईफबद्दल खुलासा

Next
Highlightsकोणाशीही लैगिंग जवळीक न वाढवता २ वर्ष खूप चांगले गेले. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण राहिला नव्हता. मी खूप खूश राहू लागले.

विशिष्ट वयानंतर दैनंदिन आयुष्यात लैंगिक गरजाही महत्वाच्या असतात. पण कधी यामुळे आयुष्याला वेगळं वळणही लागू शकतं. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध मॉडेल अमरंथा रॉबिन्सनं द गार्डियनशी बोलताना आपल्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. अमरंथानं ३ वर्ष शरीरसंबंध का ठेवले नाहीत. यादरम्यान तिच्यासोबत काय काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

अमरंथानं सांगितले की, ''२०१६ मध्ये जेव्हा मी ३० वर्षांची गोते तेव्हा माझी डेटींग लाईफ खूप खराब सुरू होती. माझ्या आयुष्याचा एक पॅटर्न सेट झाला होता. मी ज्या पुरूषांना भेटायचे त्याच्यांबद्दल मला आकर्षण वाटायचे आणि आमच्यात सेक्यूअल इंटिमसी व्हायची. त्यानंतर लगेचच आमचं रिलेशनशिप तुटायचं. मला असं वाटायला लागलेलं की, पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी माझ्याजवळ येतात आणि गरज पूर्ण झाल्यानंतर सोडून जातात.

मग मी विचार केला की, आयुष्यातून सेक्सला हटवून पाहिलं तर..., फक्त लैंगिंक गरजांचा उद्देश न  ठेवता माझ्यासोबत कोणी राहत असेल तर  ती व्यक्ती खरंच माझ्यासाठी खास असेल. म्हणून मी फिजिकली कनेक्ट होणं पूर्णपणे बंद केलं याचवेळी मी चर्चमध्येही जायला लागले. तिथून मला विश्वास आणि मनोबल मिळालं. ''

अमरंथा पुढे म्हणाली की, ''कोणाशीही लैगिंग जवळीक न वाढवता २ वर्ष खूप चांगले गेले. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण राहिला नव्हता. मी खूप खूश राहू लागले. चर्चच्या सिद्धांतांनुसार वागू लागले. हळूहळू मी भावनिकदृष्ट्या बळकट झाले. पण नंतर मला जाणवलं की मी  कोणत्याही कामात माझे  १०० टक्के देत नाहीये. उर्जा कमी आहे. तिसऱ्या वर्षी मला माझं आयुष्य बोअर वाटू लागलं.

माझ्या आयुष्यात करण्यासारखं काही राहिलेलंचं नाही असं वाटलं. हे फक्त सेक्स पुरता मर्यादित नव्हतं. तर  लहान सहान गोष्टीत फ्लर्टिंग करणं, एखाद्या व्यक्तीला खास समजणं हे मी मिस करत होते. जणूकाही मी जगणंच विसरले आहे. माझं शरीर सेक्शूएलिटीपासून हळूहळू दूर जात होतं.  चर्चमध्ये जाण्याचीही इच्छा होत नव्हती.''

पुढे ती म्हणाली की, ''मी स्वत:ला एक संधी देण्याचा विचार केला आणि आयलँडच्या एका पुरूषाला ऑनलाईन भेटली नंतर तिथे ट्रिपला जाण्याचा प्लॅन केला. हा प्लॅन करतान माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मी विचार करत होती जर मी ही ट्रिप जगले नाही तर आयुष्याचा आनंद कसा घेऊ शकेन? मग मी ठरवलं माझं शरीर आणि आत्म्याचा आवाज ऐकणार आणि तसंच वागणार. माझी डेटींग लाईफ बोअरिंग होती पण मी अनुभव घ्यायला तयार होते.

आयलँडवर मी सगळं केलं जे काही मला करायचं होतं. आता मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की, माझं आयुष्य इतकं चांगलं असतानाही शरीरसंबंधांमुळे  मानसिक त्रास व्हायचा. मला आता वाटतंय की माझं सेक्स लाईफ आणि रिलेशनशिप यांचा काहीही संबंध नाही. मला आपलं शरीर आणि सेक्युएसलिटीशी जोडून राहायला आवडतं.''

गैरसमजातून स्वत: ठरवलेल्या गोष्टी अनेकदा आपल्याला नुकसान पोहोचवतात. हे या सगळ्यातून अमरंथा  शिकली. म्हणूनच तीनं यापुढे कोणत्याही गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवणार नाही असं  ठरवलं. दरम्यान काही वर्ष शरीरसंबंधांपासून दूर राहिल्यानं मला आयुष्यात काय हवंय, मी कोण आहे याची उत्तरं नव्यानं मिळाली असं ती म्हणते.
 

Web Title: Relationship :Celibate relationship amarantha robinson model australia experience sex abstinence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Couple marriage rules : बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले.... - Marathi News | Couple marriage rules : Husband wife couple marriage rules for making relationship work goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले....

Couple marriage rules : मॅरेज रूल्सचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी असं म्हटलं की हे नियम बकवास आहेत. यातून हे दोघं नवरा बायको एकमेकांबाबत किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय ...

सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो - Marathi News | Sushmita Sen to Ekta Kapoor: Bollywood's single mothers who have adopted children or mothers by surrogacy; See photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो

आम्ही एकट्या असलो म्हणून काय झालं, आम्हालाही मूल हवंय म्हणत अभिनेत्री निभावतायंत आपली भूमिका ...

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी? - Marathi News | Ajay Devgn as he completes 30 years in cinema : Bollywood couple ajay devgan and kajol love story | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल हे अजय देवगणचे पहिले प्रेम होते असे तुम्हाला वाटते का? बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईनमधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, परंतु अशा प्रेमकथांबद्दल लोकांना क्वचितच माहिती असेल. ...

International Men’s Day 2021:  हॉट बॉडी, किलर स्माइल, स्मार्ट लूक नाही तर; स्त्रियांना जास्त आवडतात 'या' ७ प्रकारचे पुरूष - Marathi News | International Men’s Day 2021: 7 Types Of Men Every Woman Wants  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉट बॉडी, किलर स्माइल, स्मार्ट लूक नाही तर; स्त्रियांना जास्त आवडतात 'या' ७ प्रकारचे पुरूष

International Men’s Day 2021: कोणत्याही नात्यात सुंदरतेबरोबरच बौद्धिक जोड असणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा ते नाते फार लवकर कंटाळवाणे होते. त्याच वेळी, दोन बुद्धिमान लोकांमधील संबंध दीर्घकाळ टिकतात. स्त्रिया नेहमीच बुद्धिमान पुरुषांकडे आकर्षित होतात. ...

Sexual Health Tips : ....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय - Marathi News | Sexual Health Tips Men's Sexual Health : low sperm count causes prevention | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी उपाय जाणून घ्या

Sexual Health Tips : जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वडील बनण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला असाल तर शुक्राणूंची संख्या कमी असणे हे देखील त्यामागचे प्रमुख कारण असू शकते. ...

वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन - Marathi News | Vegan condoms, a new option for safe family planning! Unique and scientific research of women in Delhi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन

महिला चुकूनही ज्या विषयाकडे फिरकणार नाहीत अशा गोष्टीचे उत्पादन करण्याचे आव्हान स्वीकारलेल्या अरुणा चावला या तरुणीचा प्रवास ...