Join us  

‘बचपन का प्यार, सिक्रेट था?’ मुंबई पोलीसही सांगताहेत; सावधान ! पासवर्ड व्हायचा चोरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 3:38 PM

Mumbai police posts bachpan ka pyaar : या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी लोकांना ऑनलाइन सुरक्षितता आणि वीक स्ट्रेन्थ पासवर्डचे महत्त्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

वॉज युअर बचपन का प्यार अ सिक्रेट?’- मग तुमचा पासवर्ड कदाचित असून सेफ असेल, पण तरी त्यातही काही स्पेशल कॅरेक्टर्स ॲड करा. असं म्हणत मुंबई पोलीसांनीच सायबर सुरक्षेचा सल्ला दिला आणि ‘बचपन का प्यार मेरा’ पासवर्ड ठेवण्यात धोका आहे, सावध व्हा असंही ते म्हणाले. तसंही आजकाल एक किस्सा आहेच की पहिला प्रेम सक्सेसफूल नाही झालं तर ते आपला मेलचा, एटीएमचा पासवर्ड बनतो. काहींचे तर पहिले प्यारही बरेच असतात, पण नावं बदलत जातात. काही त्याहून हुशार आपली जन्मतारीख, गाडीचा नंबर, पासवर्ड ठेवतात. आणि मग तो पासवर्ड लिक झाला, डेटा चोरीला गेला की झालाच आनंद! 

बरं हे सारं हॅकर्स नी केलं तर ठीक, पण अनेकदा पार्टनर, नवरा-बायको, गर्लफ्रेण्ड, बाॅयफ्रेण्डही असे पासवर्ड सहज ओळखतात आणि मग वाचून काढतात आहे नाही तर दर्दभरी किंवा रोमॅण्टिक दास्ता. मग नात्यात अशी काही आतषबाजी होते, भांडणं, गैरसमज, वाद, ब्रेकअप सगळं सुरु राहतं. स्क्रीनशॉट्सचे पुरावे फिरतात. आणि जगणं नामोहराम करतात. त्यावर हा उपाय बरा, बचपन का प्यार लक्षात ठेवला आणि प्रकरण फार जगजाहीर नसलं तरच पासवर्ड ठेवलेला बरा, त्यातही स्पेशल कॅरेक्ट्ररसह. प्रकरण तेव्हाही जगजाहीर असेल, तर सावध! जाने मेरी जानेमन!

या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी लोकांना ऑनलाइन सुरक्षितता आणि वीक स्ट्रेन्थ पासवर्डचे महत्त्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. “तुमंच बालपणीचं प्रेम एक सिक्रेट होतं का? मग कदाचित तुमचा पासवर्डही त्यात नावानं असू शकतो. मग त्यात काही खास अक्षरे जोडा! ”

मुंबईपोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येतं की, पासवर्ड सहज कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यात काही खास अक्षर जोडलेली असावीत. या  पोस्टवर सोशल मीडीयावर युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ६६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. 

सोशल मीडियावर  काय शेअर करायचं नाही?

 1) महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो

काहीजण पासपोर्ट तयार केल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकतात. तर काहीजण आधारकार्डचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. असं केल्यानं तुमची वैयक्तीक महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचते. याचा गैरवापर केला जाऊ शकतो. तुमची ही  चूक मोठ्या गुन्हांचे कारण ठरू शकते. म्हणून आपल्या वैयक्तीत कागदपत्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. कोणत्याही धार्मिक, विवादित आणि सांप्रदायिक जागेवरील सेल्फी, ज्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे फोटो शेअर करू नका. 

2) लाईव्ह लोकेशन

ही ब्रिटनमधील एक घटना आहे. लाईव्ह लोकेशन शेअर करणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं होतं. फेसबुक पोस्टवर त्यांची लाईव्ह लोकेशन स्टॉकरनं पाहिलं आणि त्यांचा पाठलाग करू लागला. लोकेशन शेअर करणं अनेकांना खूप सामन्य वाटू शकतं.  पण त्यामुळे तुमच्या खासगी आयुष्यात कोणीही डोकाऊ शकतं. म्हणून सोशल मीडियावर लाईव्ह लोकेशन शेअर करणं टाळा.

3) आपला फोननंबर शेअर करणं

बरेच लोक ही माहिती सार्वजनिकपणे शेअर करतात, परंतु हे करणे योग्य नाही. असे बरेच लोक आहेत जे आपला फोन नंबर सार्वजनिक करतात आणि स्पॅम ते हॅकिंगला बळी पडतात. स्टॉकर्ससाठी सोशल मीडियावर अशी माहिती मिळवणे म्हणजे सोन्याची खाण मिळण्यासारखे आहे. अशी कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर न करण्याचा प्रयत्न करा.

4) बेकायदेशीर गोष्टी

आता तुम्ही असा विचार करत असाल की यात काय बेकायदेशीर आहे. गाडीमध्ये पार्टी करताना फेसबुकवर सेल्फी पोस्ट करणे देखील बेकायदेशीर आहे. अशा बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु त्या प्रत्यक्षात बेकायदेशीर आहेत आणि आपल्याला अडचणीत आणू शकतात. उदाहरणार्थ, आपण विचार न करता लहान मुलाचा रडण्याचा व्हिडिओ शेअर केल्यास, हे घरगुती हिंसाचाराचे एक प्रकरण बनू शकते. 

टॅग्स :रिलेशनशिपमुंबईपोलिसमिम्सव्हायरल फोटोज्