lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था..

मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था..

Relationship: सासु- सुनेचं नातं कसं असावं असा प्रश्न पडला असेल, तर मीरा राजपूत Mira Rajput Kapoor आणि तिच्या सासुबाई नीलिमा अजीम  Nilima Ajim यांचे फोटो पहा.... दोघींचा हा सेल्फी सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 06:36 PM2021-11-21T18:36:26+5:302021-11-21T18:37:35+5:30

Relationship: सासु- सुनेचं नातं कसं असावं असा प्रश्न पडला असेल, तर मीरा राजपूत Mira Rajput Kapoor आणि तिच्या सासुबाई नीलिमा अजीम  Nilima Ajim यांचे फोटो पहा.... दोघींचा हा सेल्फी सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे.

Mira Rajput's great selfie with her mother-in-law Nilima Ajim, viral on social media | मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था..

मीरा राजपूतचे सासुबाईंसोबत जबरदस्त सेल्फी, सॉंस- बहू एकमेकींवर फिदा! फिर रसोडे में कौन था..

Highlightsबघा मीरा आणि नीलिमा यांच्या नात्याप्रमाणेच तुमच्या नात्यातही मस्त मिठास येईल सासु- सुनेचं नातं अधिकाधिक खुसखुशीत, कुरकुरीत होईल..

Mira Rajput-  Nilima Ajim बाॅलीवूड अभिनेता शाहिद कपूर याची बायको (Shahid kapoor's wife Mira) मीरा कपूर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी ती किती फिट आहे याची चर्चा होते, तर कधी तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसची चर्चा केली जाते. बॉलीवूडमध्ये आजघडीला जे काही बेस्ट कपल आहेत, त्यापैकी एक कपल म्हणजे शाहिद आणि मीरा. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री आणि बॉण्ड या बद्दलही नेहमीच वेगवेगळी चर्चा घडून येत असते. मीरा राजपूत सोशल मिडियावरही खूप ॲक्टीव्ह असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात काय चाललंय याची माहिती कायम मिळत असते. आता नुकताच मीराने तिचा आणि तिच्या सासुबाईंचा एक सेल्फी सोशल मिडियावर शेअर केला आहे. नेटकरी मंडळींना हा सेल्फी भारीच आवडला असून एका दिवसातच या सेल्फीने लाखो लाईक्स मिळविले आहे. 

 

मीराने जो सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, त्यात ती आणि नीलिमा एकमेकींच्या अगदी जवळ बसलेल्या आहेत. दोघींच्याही चेहऱ्यावर छान, प्रसन्न हसू असून हेच हास्य आणि आनंद टिपण्याचा प्रयत्न मीराने या सेल्फीद्वारे केला आहे. या सेल्फीला मीराने एक मस्त कॅप्शनही दिलं आहे. मध्यंतरी स्टार प्लसच्या एका जुन्या मालिकेचा व्हिडियो सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल झाला होता. त्यामध्ये सासू सुनेला ओरडून ओरडून विचारत होती की रसोडे मे कौन था.... बस्स हीच ओळ मीराने तिच्या या फोटोला कॅप्शन म्हणून दिली आहे. फोटोची कॅप्शन लिहिताना मीरा म्हणते की... ''Rasode mein kaun tha? You can bet neither of us 🤪 Bring on the chai and chikki ☕️''

 

मीरा आणि नीलिमा यांचे एकमेकींशी असलेले नाते खूपच घट्ट आणि मैत्रीपूर्ण असल्याचे मीराच्या इतरही अनेक फोटोंवरून दिसू येते. कारण नीलिमा यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि काही व्हिडियो मीराने यापूर्वी सोशल मिडियावर अनेकदा शेअर केले आहेत. मीराचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. नीलिमा यादेखील खूप चांगल्या अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही खूप दिवसांनी दिसलेला त्यांचा हा लूक आवडला असल्याचे फोटोंना आलेल्या कमेंट्सवरून दिसून येते. मीराप्रमाणेच तुम्हीही एखादा सेल्फी तुमच्या सासुबाईंसोबत काढा आणि सोशल मिडियावर शेअर करा.. बघा मीरा आणि नीलिमा यांच्या नात्याप्रमाणेच तुमच्या नात्यातही मस्त मिठास येईल सासु- सुनेचं नातं अधिकाधिक खुसखुशीत, कुरकुरीत होईल.. 

 

Web Title: Mira Rajput's great selfie with her mother-in-law Nilima Ajim, viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.