Join us

फक्त प्रेम आयुष्यभर पुरतं का?.. प्रेम तर आहेच पण ' या ' ५ गोष्टी आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 08:30 IST

Love Is There, But Do You Have These '5' Things Also? : एखाद्या नात्यासाठी फक्त प्रेम पुरेस असतं का ?

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हो ना? तर नाही. प्रत्येकाचं फार वेगवेगळं असतं. सारखं असूच शकत नाही. कारण माणसा-माणसानुसार नात्यांची व्याख्या बदलते. प्रत्येकाच्या अपेक्षा, गरजा वेगळ्या असतात. (Love Is There, But Do You Have These '5' Things Also?)तरी काही साधारण गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक नात्यात असल्याच पाहिजेत. जर त्या नसतील तर? तर तुम्हाला तुमच्या प्रियकराशी संवाद साधायची फार गरज आहे. (Love Is There, But Do You Have These '5' Things Also?)या गोष्टी आपल्याला फार शुल्लक वाटतात. प्रेमात चालत असं म्हणून आपण सोडून देतो. पण त्या साध्या असल्या तरी महत्त्वाच्या असतात. दुर्लक्ष करून चालत नाही. 

१. समान आदर (Love Is There, But Do You Have These '5' Things Also?)प्रत्येक नात्यात एकमेकांना आदर देणे फार गरजेचे आहे. दोघांपैकी एकाला जरी कमी लेखले जात असेल, तरी त्या नात्यातून आत्मीयता निघून जाते. प्रियसीने प्रियकराला आदर दिला पाहिजे, तसेच प्रियकराने प्रियसीला द्यायला हवा. आपल्या आधीच्या पिढ्यांकडे बघितल्यावर जाणवते की, महिलांना आदर मिळालेला नाही. फार कमी जणींचा अनुभव चांगला असतो. एकमेकांबद्दल प्रेम असलेच पाहिजे, मात्र आदर असेल तरच ते नातं मजबूत आहे.

२. एकमेकांसाठी वेळधावपळीच्या जगात आपल्या माणसांना वेळ देणं राहून जातं. पण जेव्हा तुम्ही रीलेशनशीपमध्ये असता, तेव्हा वेळ देणं गरजेचं असतं. मग तुम्ही फोनवर बोला, व्हिडियो कॉल करा. तुमचे मार्ग तुम्ही शोधा. सतत संवाद हवा. जर तुमच्या प्रियकराला तुमच्यासाठी अजिबात वेळ नाही, तर कदाचित नात्यात दुरावा निर्माण झाला असू शकतो. दुर्लक्ष न करता बोलून गुंता सोडवा.

३. समान गुंतवणूकबरेचदा रेलेशनशीपमध्ये एकच व्यक्ती नातं टिकण्यासाठी कष्ट घेतो. अशा नात्यांना 'वनसायडेड रिलेशनशीप' असं म्हणतात. नात एका व्यक्तीमुळे नाही तर, दोघांच्या सहभागानेच आनंदी होऊ शकते. फक्त तुम्हीच पुढाकार घेत असाल. तर तुमच्या पार्टनरला नात्यात रस उरला नसल्याची शक्यता आहे. असे झाल्यास मोकळेपणाने बोलून घ्या.

४. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्यतुम्हाला काय पटतं, काय पटत नाही, ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला नात्यात असला पाहिजे. जेवढं तुम्ही त्याचं ऐकून घेणं गरजेचं, तेवढंच त्याने तुमचं ऐकून घेणंही. मतभेद तर प्रत्येक नात्यात असतात. समोरच्याचं मत पटलं नाही तर त्याबद्दल आदर ठेवता आला पाहिजे. तुमच्या मताला जर तुच्छ लेखलं जात असेल, तर तुमचं नातं हेल्दि आहे का? असा प्रश्न उद्भवतो.  

५. शारीरक संबंधशारीरिक संबंध ठेवताना दोघांची समान इच्छा असणे गरजेचे आहे. समोरच्याचे मन राखण्यासाठी मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात काही अर्थ नाही. जर तुमच्या मनाविरूद्ध संभोग क्रिया घडत असतील तर, जाऊ दे म्हणून सोडून देऊ नका. प्रेम संबंधात असल्यावर समोरच्याला आपण शरीरावर हक्क देतो, ही मानसिकता फार चुकीची आहे. कोणाच्याही शरीरावर कोणाचाही हक्क नसतो.

सुसंवाद साधून समस्या निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पण तरी जर सुधारणा नसतील तर विचार करा. आणि योग्य निर्णय घ्या.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमहिलामानसिक आरोग्य