lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

Sushmita Sen And Rajat Tara: सुश्मिता सेन आणि तिचा पहिला ब्रॉयफ्रेंड रजत तारा यांच्याविषयी अनेक अफवा आहेत. त्याबाबतचं स्पष्टीकरण आणि दोघांच्या नात्याला असलेले अनेक कंगोरे सुश्मिताने नुकतेच उलगडले आहेत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 12:50 PM2023-11-27T12:50:52+5:302023-11-27T12:51:43+5:30

Sushmita Sen And Rajat Tara: सुश्मिता सेन आणि तिचा पहिला ब्रॉयफ्रेंड रजत तारा यांच्याविषयी अनेक अफवा आहेत. त्याबाबतचं स्पष्टीकरण आणि दोघांच्या नात्याला असलेले अनेक कंगोरे सुश्मिताने नुकतेच उलगडले आहेत....

I was the best man at my first boyfriend Rajat Tara’s wedding.... Sushmita Sen reveals about her relationship | एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

Highlightsसुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली आणि तिने रजतला तिच्यापासून दूर केलं, असं तिच्याविषयी बोलल्या गेलं. याविषयीचा नेमका प्रश्न तिला नुकताच एका मुलाखतीदरम्यान विचारला गेला.

सुश्मिता सेन आणि तिचे झालेले अफेअर, ब्रेकअप्स यांच्याविषयीच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. अनेकदा तिचे बाेल्ड स्टेटमेंट्सही यासाठी कारणीभूत असतात. सुश्मिताचं व्यक्तीमत्त्व तसं बोल्ड आणि बिंधास्त. त्यामुळे तिच्याभोवती वेगवेगळ्या चर्चांची वेगवेगळी वलयं नेहमीच फिरत असतात. सुश्मिता आणि रजत तारा यांच्याविषयीही बरंच बोललं गेलं. रजत तिचा पहिला बॉयफ्रेंड. सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली आणि तिने रजतला तिच्यापासून दूर केलं, असं तिच्याविषयी बोलल्या गेलं. याविषयीचा नेमका प्रश्न तिला नुकताच एका मुलाखतीदरम्यान विचारला गेला. यावेळी तिने ही गोष्ट पुर्णपणे चुकीची आहे, हे तर सांगितलंच पण तिच्या आणि रजतच्या नात्याविषयीही आणखी बरीच चर्चा केली. 

 

मिड डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार सुश्मिताला Sit With Hitlist या कार्यक्रमात रजतविषयी विचारण्यात आले. यावेळी सुश्मिता म्हणाली की रजत तारा हा एक खूप चांगला व्यक्ती असून तो माझा पहिला बॉयफ्रेंड आहे, याचा मला आजही आनंद वाटतो. आज तो एका गोड मुलीचा पिता आहे.

हिवाळ्यासाठी स्वेटशर्ट घ्यायचे? बघा ३ सुपर स्टायलिश- ट्रेण्डी पर्याय, खिशाला परवडणाऱ्या किमतीत...

त्याने Serbian महिलेशी लग्न केलं. ती सुद्धा खूपच चांगली आहे. त्यांच्या लग्नाला मी यावंच, असा तिचा आग्रह होता. त्यामुळे त्या दोघांसाठी मी लग्नाला गेले होते. "I was the best man at my first boyfriend Rajat Tara’s wedding....'' अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.

 

रजतबाबत बोलताना ती म्हणाली की मी साधारण १७- १८ वर्षांची होते. तेव्हा रजत २३ वर्षांचा होता. त्या वेळी मी स्वत:ला कधीही सुंदर म्हणून पाहिलं नव्हतं. पण त्यावेळी रजतने मला प्रोत्साहन दिलं आणि मिस इंडिया स्पर्धेत मी उतरले. काही लोकांना तुम्ही कधीच डम्प करू शकत नाही.

वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

पण तुम्ही पुढे जाता. मी तशीच पुढे गेले. तेव्हा रजतच मला म्हणाला की तो मला स्वत:ला बांधून ठेवू शकत नाही. तेव्हा आम्ही वेगळे झालो, पण आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. तो आजही माझा सगळ्यात मोठा सपोर्टर असून जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मला गरज पडेल तेव्हा कोणत्याही क्षणी माझ्यासाठी धावत येईल, असा मला विश्वास आहे... 

 

Web Title: I was the best man at my first boyfriend Rajat Tara’s wedding.... Sushmita Sen reveals about her relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.