lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं..

वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं..

Healthy Relationship tips : दोघांमधील अबोला  हा भांडणापेक्षा जास्त नुकसानकारक ठरतो. अशा स्थितीत समजूतदारपणा दाखवत घरच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:02 PM2021-06-01T19:02:08+5:302021-06-02T20:05:46+5:30

Healthy Relationship tips : दोघांमधील अबोला  हा भांडणापेक्षा जास्त नुकसानकारक ठरतो. अशा स्थितीत समजूतदारपणा दाखवत घरच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

Healthy Relationship tips : learn to forgive people when they are not sorry to you | वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं..

वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं..

Highlightsजेव्हा आपला जोडीदार तुमच्यावर रागावला असेल, मग ती मुलगी असो की मुलगा, परंतु त्यावेळी तो तुमच्याकडून भावनिक पाठिंबाची अपेक्षा करतो.

प्रत्येक नात्यात अशी वेळ येत असते  जेव्हा पार्टनरच्या वागण्यानं नकळतपणे मनाला ठेच पोहोचते.  तुम्ही याकडे अनेकदा दुर्लक्ष सुद्धा करता. पण कधी कधी मात्र डोक्यावरून पाणी जातं त्यावेळी वाद होणार हे निश्चितच असतं. तुम्ही मनानं स्ट्राँग असाल तर याचा काही फरत पडत नाही. काही गोष्टी त्यावेळी तुमचा मूड कसा आहे यावरही अवलंबून असतात. तसंच रागामुळे आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हाच चांगला उपाय मानला जातो. राग शांत करण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. जेणेकरुन काही अनुचित घडणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. 

शक्य असल्यास पार्टनरला माफ करा

सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या कारणानं निराश आहात? पार्टनरची कोणती गोष्ट खटकली याचा शोध घ्या. एकदा मूड ऑफ होण्याचं कारण समजल्यानंतर तुम्ही पार्टनरसोबत या विषयावर चर्चा करू शकता. आपल्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका. 

नात्यात इगो 

अनेकदा आपणंच बरोबर आहोत असं आपल्याला वाटत असतं. पार्टनरनं नेहमी येऊन माफी मागायला हवी असं आपल्याला वाटंत.  असा विचार करणं योग्य नाही. कारण जर तुमच्या पार्टनरनही असाच विचार केला भांडणं अजूनच वाढू शकतात. अशा स्थितीत कोणीच कोणाची माफी मागणार नाही. म्हणून नातं चांगल्या राहण्यासाठी इगो बाजूला ठेवून पाहा. त्याच्या किंवा तिच्या सॉरी बोलण्याची वाट पाहिल्यानं मानसिक ताणही येऊ शकतो. त्यापेक्षा पार्टनरची समजूत काढा, मनमोकळेपणानं बोला.

जबाबदारी घ्या

आपल्याकडून चूक झालीये असे आपल्याला वाटत असल्यास, उशीर न करता ते स्वीकारा. आपला जोडीदार माफी मागितल्यानंतर नक्कीच  सगळं काही विसरून तुमच्याशी बोलायला येईल. माफी मागण्यात काहीच चूक नाही, विशेषत: जेव्हा ते आपल्या नात्यावर परिणाम करत असेल.  तुमची वागणूक तुमच्या दोघांचे नाते वाचवण्यासाठी पूल म्हणून काम करते. भांडण कितीही मोठं असलं तरी तुम्ही ठरवलं तर वाद मिटवून गोडवा टिकवून ठेवू शकता.

भावनात्मक सपोर्ट

जेव्हा आपला जोडीदार तुमच्यावर रागावला असेल, मग ती मुलगी असो की मुलगा, परंतु त्यावेळी तो तुमच्याकडून भावनिक पाठिंबाची अपेक्षा करतो. अशा परिस्थितीत, जर आपण स्वतःला भावनिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दाखवत असाल किंवा तो आपल्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी करत नसाल तर त्याच्या मनातील आदर तुम्ही गमावू शकता. 

अबोला  धरणं टाळा

दोघांमधील अबोला  हा भांडणापेक्षा जास्त नुकसानकारक ठरतो. अशा स्थितीत समजूतदारपणा दाखवत घरच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा जास्तवेळ अबोला धरल्यास गैरसमज होण्याची शक्यता असते.  जीवन केवळ सुखाचे नाव नाही, यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठिण परिस्थितीचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही. रागाचे काही स्पष्ट संकेत असतात, ज्यावरुन कळतं की, तुम्ही रागात आहात.

धैर्याची कमतरता, शिव्या देणे, समोरच्यास कमी लेखणे, चिडचिड करणे, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोषी ठरविणे, राग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटून जाणे, लोकांचे तुमच्यापासून दूर जाणे, पत्नी, मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे ही तीव्र रागाची कारणं असू शकतात. 

उपाय

तुम्हाला खूप जास्त राग येत असेल तर अशावेळी आपण कोणत्याही वादात पडू नये. कारण आपण आपला कंट्रोल हरवण्याची भीती असते. त्यामुळे बरं हेच होईल की, तुम्ही त्या जागेवरून दूर जावं. त्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. थंड पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दूसरा व्यक्ति शांत होईल, तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.

कधी कधी कामाच्या लोडमुळे व्यवस्थित झोप येत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तणाव आणि चिडचिड होते. यातून विनाकारण दुस-यांवर राग निघतो. अशात काहीही झाले तरी, तुम्ही कितीही बिझी असाल तरी निदान 7 तासांची झोप घ्या. रागासोबत डील करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे की, रागाचं कारण शोधा आणि त्यापासून झालेल्या त्रासाला दूर करावे.

अनेकदा पार्टनरचा विचार करुन काही लोक आपल्या मनातील गोष्टी तशाच दाबून ठेवतात. त्यांना जे वाटतं ते दुस-यांना सांगत नाहीत. त्यामुळे राग येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुमच्या मनात काय आहे ते बोलून टाका. यामुळे तुमच्या मनात काही दडून राहणार नाही आणि तुमची चिडचिड कमी होईल.

Web Title: Healthy Relationship tips : learn to forgive people when they are not sorry to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.