lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > फुकट जेवायला मिळेल म्हणून मुली डेटवर जातात? फूड कॉल नावाचा भलताच ट्रेण्ड, अभ्यासक म्हणतात..

फुकट जेवायला मिळेल म्हणून मुली डेटवर जातात? फूड कॉल नावाचा भलताच ट्रेण्ड, अभ्यासक म्हणतात..

'Foodie Call': Nearly A Third Of Women Have Gone On Dates Just For Free Food, Survey Finds : फूड कॉल नावाचा ट्रेण्ड सांगतो की प्रेम, नातं हे नंतर काहीजणी डिनरडेटचं आमंत्रण जेवणापुरतं स्वीकारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2024 01:37 PM2024-01-04T13:37:05+5:302024-01-04T13:38:02+5:30

'Foodie Call': Nearly A Third Of Women Have Gone On Dates Just For Free Food, Survey Finds : फूड कॉल नावाचा ट्रेण्ड सांगतो की प्रेम, नातं हे नंतर काहीजणी डिनरडेटचं आमंत्रण जेवणापुरतं स्वीकारतात

'Foodie Call': Nearly A Third Of Women Have Gone On Dates Just For Free Food, Survey Finds | फुकट जेवायला मिळेल म्हणून मुली डेटवर जातात? फूड कॉल नावाचा भलताच ट्रेण्ड, अभ्यासक म्हणतात..

फुकट जेवायला मिळेल म्हणून मुली डेटवर जातात? फूड कॉल नावाचा भलताच ट्रेण्ड, अभ्यासक म्हणतात..

सध्याची पिढी ही सोशली झाली आहे. सोशल मिडियावरच भेटीगाठी होतात, आणि चॅटिंगमध्ये विचार जुळल्यानंतर ते वैयक्तिक डेटवर जातात. डेटवर जाण्याचे सध्या अनेक ऑप्शन्स आहेत. काही जण एखादा चित्रपट पाहायला जातात, तर काही जण हँग आउट करतात. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेण्ड करून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि डेटवर जाणं एखादा मुलगा एखाद्या मुलीला विचारतो तेव्हा बाहेर जेवणाखाण्याचा खर्च तोच करणार असं गृहित धरलं जातं? काहीमुली आता बिल देतात, किंवा अर्धा अर्धा खर्च वाटू म्हणतात. पण ते अपवाद अजूनही डेटवरच्या खाण्यापिण्याचा खर्च मुलगाच करणार असं गृहितकच असतं.

आता एक अभ्यास असं म्हणतोय की या प्रकाराला 'फूड कॉल' असे म्हणतात. म्हणजे काय तर त्या मुलीला ना डेटमध्ये रस असतो, ना मुलात, ना त्याला भेटण्यात पण फुकट मस्त हाॅटेलिंग आणि खाणंपिणं होईल म्हणून काहीजणी डेटवर जातात, म्हणजे थोडक्यात काय तर फुकट आणि चांगलंचुंगलं खायला मिळेल म्हणून डेटवर जातात('Foodie Call': Nearly A Third Of Women Have Gone On Dates Just For Free Food, Survey Finds).

एलपीजी गॅस बचत करण्याच्या ५ खास टिप्स 

हे वाचून धक्का बसेल, काय मुलींवर वाट्टेल ते आरोप करतात असंही कुणी म्हणेल? पण हा अभ्यास केला आहे  कॅलिफोर्निया-मेरेड विद्यापीठातील संशोधकांनी. सायकॉलॉजी टूडे या वेबसाईटवर प्रसिध्द झालेल्या ले‌खानुसार ब्रायन कोलीसन, जेनीफर हॉवेल, ट्रिस्ता हालिग या मानसोपचार तज्ज्ञांनी केलेला अभ्यास म्हणतो की अनेकदा काही महिला डिनरडेटचं आमंत्रण स्वीकारतात, तेव्हा त्या प्रेमातच असतात किंवा सोबत काही आपलं भवितव्य असू शकेल असा विचारच करतात असं नाही. त्या फक्त तात्पुरती भेट, जेवण असा विचार करुन जातात.  'डार्क ट्रायड' असं ते त्याला नाव देतात. सायकोपॅथी, मॅकियाव्हेलियनिझम, नार्सिसिझम या गोष्टी त्यात आढळतात. या साऱ्या प्रकारालाच म्हणतात फूड कॉल.

मुलाखत देताना त त प प होते? ३ सोप्या गोष्टी, नोकरीसाठी सिलेक्शन होणारच

दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये झाले सर्वेक्षण

सोसायटी फॉर पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 'हे संशोधन दोन गटातील महिलांमध्ये करणायत आले होते. पहिल्या गटात ८२० महिला होत्या. ज्यामध्ये त्यांना या विषयावर प्रश्न विचारले गेले. यातील २३ टक्के महिलांनी मान्य केले की, ते पहिल्या भेटीत खाण्याकडे लक्ष देतात. कारण पहिल्या भेटीत कोणाला ओळखणे कठीण आहे, त्यामुळे प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, दुसऱ्या गटात ३५७ महिलांपैकी ३३ टक्के महिलांनी कबूल केले की त्या फक्त चविष्ट पदार्थ खाण्यासाठी डेटवर जातात. अर्थात हा एक ट्रेण्ड आहे, तो त्याच संदर्भाने घ्यायला हवा, सरसकट खरं मानून चालू नये.

Web Title: 'Foodie Call': Nearly A Third Of Women Have Gone On Dates Just For Free Food, Survey Finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.