Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर रोज शरीरसंबंध केल्यामुळे वजन भरभर वाढतं? हे खरं की खोटं, कारणं काय आहेत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:53 IST

Does having sex every day lead to weight gain : लग्न, लैंगिक संबंध आणि जीवनशैली यांचा परस्पर संबंध असतो पण वजन वाढीची कारणं भलतीच आहेत.

लग्नानंतर किंवा नियमित लैंगिक संबंध ठेवल्यानं वजन वाढतं का? हा प्रश्न लपूनछपून गूगल करणारे अनेक आहेत. अनेकजण व्हायरल मेसेजमध्ये तसा दावाही करतात, पण खरंच सेक्सचा आणि वजनवाढीचा काही संबंध असतो का?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लैंगिक संबंधांमध्ये पुरुषांसाठी प्रतिमिनिट ४.२ कॅलरी आणि महिलांसाठी प्रति मिनिट सुमारे ३.१ कॅलरीज बर्न होतात. लैंगिकसंबंधातून एकावेळी सरासरी अंदाजे १०० ते १५० कॅलरी बर्न होतात. जे मध्यम वेगानं १५ मिनिटं चालण्याइतकं आहे. त्यामुळे केवळ लैंगिक संबंधांमुळे वजन वाढणं शक्य नाही (Ref). उलट यामुळे काही प्रमाणात कॅलरी बर्न होतात.  त्यामुळे सेक्स आणि वजनवाढीचा संबंध यात काही प्रत्यक्ष नातं नाही. पण हार्मोनल बदलांमुळे वजन कमी जास्त होऊ शकतं.

लव्ह हॉर्मोन म्हणून ओळखले जाणारे ऑक्सिटोसिन सेक्ससाठी महत्वाचं असतं. काही संशोधनानमुसार ऑक्सिटोसिन हे ताण कमी करण्यास मदत करते. जास्त तणाव हे कॉर्टिसोल हॉर्मोन वाढवते. ज्यामुळे पोटात चरबी जमा होऊ शकते. तणाव कमी झाल्यास सतत खाणं कमी होतं जे अप्रत्यक्षपणे वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते. संभोगानंतर प्रोलॅक्टिनची पातळी वाढते जे चांगल्या झोपेशी जोडलेले आहे. पुरेशी आणि चांगली झोप भूक नियंत्रण करणाऱ्या ग्रेलिन आणि लेप्टिन या हॉर्मोन्सना संतुलित ठेवण्यास मदत करते जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. 

वजन वाढण्याची खरी कारणं कोणती आहेत?

अनेक जोडपी लग्नानंतर जागरणं करतात. बाहेर जेवतात. रात्रीबेरात्री वाट्टेल ते खातात. त्यात वय वाढत असतं, पचनशक्ती बिघडते.  हार्मोनल संतुलन बिघडते त्यातून वजन वाढू शकते. मात्र हा प्रश्न लाइफस्टाइलचा आहे. सेक्स आणि त्यामुळे वजनवाढ असा सरळ नाही. नातं जपताना उलट आपली जीवनशैली अधिक चांगली व्हायला हवी ती न होता, चुकीच्या गोष्टींमुळे वजन वाढतं. त्याचा शरीरसंबंधांशी थेट काहीही संबंध नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Does sex after marriage cause weight gain? The truth revealed.

Web Summary : Sex burns calories, averaging 100-150 per session. Hormonal changes, like increased oxytocin, may reduce stress and indirectly aid weight management. Lifestyle factors post-marriage, such as late-night eating and disrupted sleep, are more likely weight-gain culprits, not sex itself.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप