Lokmat Sakhi >Relationship > 'Delulu' रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? जे नात्यात मन दुखण्याचं ठरतं कारण, करू नका 'या' चुका!

'Delulu' रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? जे नात्यात मन दुखण्याचं ठरतं कारण, करू नका 'या' चुका!

What is Delulu Relationship? : सध्या रिलेशनशिपबाबतचा Delulu असा शब्द खूप व्हायरल होत आहे. हा शब्द डिल्यूजनलचा शॉर्टफॉर्म आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:16 IST2025-09-04T14:44:08+5:302025-09-04T15:16:06+5:30

What is Delulu Relationship? : सध्या रिलेशनशिपबाबतचा Delulu असा शब्द खूप व्हायरल होत आहे. हा शब्द डिल्यूजनलचा शॉर्टफॉर्म आहे.

Delulu relationships signs you are living in a fantasy not reality | 'Delulu' रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? जे नात्यात मन दुखण्याचं ठरतं कारण, करू नका 'या' चुका!

'Delulu' रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? जे नात्यात मन दुखण्याचं ठरतं कारण, करू नका 'या' चुका!

What is Delulu Relationship? : सोशल मीडियावर अलिकडे वेगवेगळे रिलेशनशिपबाबतचे ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या रिलेशनशिपबाबतचा Delulu असा शब्द खूप व्हायरल होत आहे. हा शब्द डिल्यूजनलचा शॉर्टफॉर्म आहे. म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादं नवं नातं सुरू करतो, तेव्हा आपण त्यात पूर्णपणे हरवून जातो. एखाद्या व्यक्तीच्या केवळ चांगल्या गोष्टीच आपल्याला दिसू लागतात. ज्यांचा आपण पाठलाग करतो. अशात बरेच लोक आपल्या मेंदूत असं ठरवून घेतात की, हे एक परफेक्ट नातं आहे.

हीच ती वेळ असते जेव्हा आपण ‘delulu’ म्हणजे कल्पनांमध्ये जगू लागतो. पण जेव्हा आपण सत्यापासून दूर जातो, तेव्हा आपल्याला इजा होणं स्वाभाविक आहे. म्हणजे अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर मनाला वेदना तर होतीलच. जो सहन करणं अवघड असतं. हेच आज आपण या लेखात पाहणार आहोत. यात आपण हे पाहणार आहोत की, आपणही प्रेमाच्या नादात delulu तर होत नाहीये ना.

Delulu चा अर्थ काय आहे?

Delulu चा अर्थ आहे सत्य सोडून आपल्या कल्पना आणि स्वप्नांमध्ये जगणं. म्हणजेच नात्यामध्ये आपल्या मनाने काही गोष्टी माननं किंवा त्यांचा विचार करणं. मुळात ते तसं नसतं. जसे की, काही इशाऱ्यांना फार जास्त किंवा मोठं समजणं किंवा भविष्याची प्लॅनिंग समजणं. पण नातं तर अजूनही ठरलेलं नसतं.

जास्त विचार करणं

अनेकदा आपण असा विचार करतो की, कुणीतरी आपल्या इन्स्टा स्टोरीवर इमोजी पाठवला आणि ती व्यक्ती आपल्यात इंटरेस्टेड आहे. हाच ‘delulu’ चा पहिला संकेत असतो. म्हणजे कुणी जरा कौतुक केलं तर त्याला वेगळाच अर्थ दिला जातो. तेही सत्य न समजून घेता.

फक्त आपलीच मेहनत

जर आपणच पार्टनरला नेहमी कॉल करत असाल, मेसेज करत असाल किंवा काही गोष्टींचं प्लॅनिंग करत असाल, समोरून काहीच रिस्पॉन्स मिळत नसेल तर हा सुद्धा delulu चा संकेत आहे. नातं हेल्दी तेव्हाच असतं जेव्हा दोन्हीकडून गोष्टी सारख्या केल्या जातात.

भविष्याचा विचार करणं

बऱ्याचदा लोक हम आपके है कौन? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधीच फार पुढचा विचार करू लागतात. यालाच delulu म्हणतात. यात आपले विचार सत्य काय ते जाणून घेण्याआधीच इतके पुढे निघून जातात की, पुढे जाऊन मोठा धक्का बसतो.

आकर्षण आणि प्रेम वेगळं

आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींना किंवा सहज बोलण्याला नात्याचं नाव देतो. असा विचार करतो की, समोरची व्यक्ती देखील तोच विचार करतेय, जो आपण करतोय. पण मुळात रिअ‍ॅलिटी वेगळीच असते. 

Web Title: Delulu relationships signs you are living in a fantasy not reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.