lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > लग्नानंतर काही महिन्यातच सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो? या समस्येचं कारण काय? तज्ज्ञ सांगतात..

लग्नानंतर काही महिन्यातच सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो? या समस्येचं कारण काय? तज्ज्ञ सांगतात..

Common Myths About Intimate Relationships : नवीन लग्न झालं, अगदी प्रेमविवाह झाला तरी सेक्समधला रस लवकर संपला अशी समस्या अनेकांना जाणवते, त्याची कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 03:42 PM2023-09-21T15:42:43+5:302023-09-21T16:40:28+5:30

Common Myths About Intimate Relationships : नवीन लग्न झालं, अगदी प्रेमविवाह झाला तरी सेक्समधला रस लवकर संपला अशी समस्या अनेकांना जाणवते, त्याची कारणं काय?

Common Myths About Intimate Relationships : Intimacy Myths You Need To Know | लग्नानंतर काही महिन्यातच सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो? या समस्येचं कारण काय? तज्ज्ञ सांगतात..

लग्नानंतर काही महिन्यातच सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो? या समस्येचं कारण काय? तज्ज्ञ सांगतात..

लैंगिक आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात. बरेच लोक  लैंगिक समाधान-असमाधान याबाबत व्यवस्थित बोलत नाहीत. (Myths and Facts About Sex) इंटमसी, सेक्स, प्लेझर आणि बाळ होण्याबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात. इंटमसी आणि इंटरकोर्समध्ये काय फरक आहे, लग्नानंतर  सेक्समधील इंटरेस्ट खरंच कमी होतो का ते समजून घेऊ (Common Myths About Intimate Relationships)  मानसोपचारतज्ज्ञ आणि थेरपिस्ट रूची रूह यांनीहेल्थ शॉट्सशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

बीएमजे या वैद्यकीय संशोधन जर्नलमधील सर्वेक्षणानुसार, ३४ टक्के महिला आणि १५ टक्के पुरुषांनी सांगितले की, तीन महिने लग्न नातेसंबंधात राहिल्यानंतर सेक्समध्ये रस कमी झाला. संशोधकांना असेही आढळून आले की नातेसंबंधात जोडप्यांच्या लैंगिक इच्छा वयानुसार कमी होतात, याचा अर्थ जोडप्याचे वय वाढले की त्यांचे लैंगिक आकर्षण देखील हळूहळू कमी होते. लैंगिक संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या लैंगिक आवडी आणि निवडींबद्दलचा संवाद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सेक्शुअल प्लेझर इंटरकोर्सपुरताच असते?

अनेकांचा असा समज असतो की सेक्शुअल प्लेजरसाठी पेनिट्रेशन आणि ऑर्गज्म आवश्यक असतो. तज्ज्ञांच्या मते सेक्शुअल प्लेझर  फिजिकल आणि मानसिकदृष्या गरजेचा असतो. सेक्शुअल प्लेझर पूर्णपणे इंटरकोर्सवर अवलंबून नसते तर पेनिट्रेशन, इंटरकोर्स याचा एक भाग आहे. इंटिमसीसाठी मेंटल बॉन्डींग चांगले असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असते.

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

 

लग्नानंतर काही वर्षांनी संबंधातील इंटरेस्ट कमी होतो?

अनेकदा लोकांना हे कळत नाही की त्यांना कोणत्या प्रकारचे प्लेझर हवं आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांचा सेक्शुअल प्लेझर वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. याची सुरूवात प्युबर्टीपासून होते. टिएजर्सच्या हार्मोनल बदलांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. हळूहळू त्यांची सेक्शुअल इच्छा अधिक तीव्र होते, तर कधी कमी होते.

अनेकदा महिला हे समजू शकत नाही की त्यांना काय आवडते किंवा त्यांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत चालली आहे. परिणामी त्या आपल्या पार्टनरबरोबर सेक्स करताना अन्कर्फर्टेबल फिल करतात. त्यांना असं वाटतं की सेक्समध्ये प्लेजर देणं हे फक्त पुरूषाचे काम आहे.

ओटी पोट लटकतंय, फिगर पूर्ण बिघडली? रोज सकाळी ४ गोष्टी करा, आपोआप स्लिम-फिट दिसाल

बऱ्याच महिलांना असं वाटतं की त्या स्वत:हून पार्टनरला संभोगाबद्दल विचारतील तर पार्टनर नकार देईल. असा गैरसमज असल्यामुळे किंवा पार्टनरने आपल्या चुकीचं समजू नये असं वाटून महिला स्वत:हून सेक्शुअल एक्ट सुरू करत नाहीत.

घर, मूलं आणि करीअरच्या जबाबदाऱ्यांमध्ये महिला इतक्या व्यस्त राहतात की त्यांची इच्छा कमी होते. अनेक महिलांना कामाच्या थकव्यामुळे प्लेझरची जाणीव होत नाही. अशावेळी पार्टनरनेही पत्नीचा समजून घ्यायला हवं. महिलांच्या आयुष्यात अनेक हार्मोनल बदल होत असतात. (गर्भावस्था, ताण-तणाव) यामुळे त्यांचा सेक्समधील इंटरेस्ट कमी  होऊ शकतो. नात्यातील गोडवा आणि लैंगिक संबंधांमधील रस तसाच ठेवण्यासाठी भावनात्मक संबंध, संवाद गरजेचा असतो. तर एकमेकांचं पटत नसेल किंवा सतत वाद होत असतील लैंगिक सुखाचा आनंद घेता येत नाही.

Web Title: Common Myths About Intimate Relationships : Intimacy Myths You Need To Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.