AI Fruit videos: bad jokes and dirty comments on women in viral videos, a new topic of discussion around the world : AI Fruit videos : विनोदाच्या नावाखाली महिलांचा भयंकर अपमान करणारा नवा व्हायरल मनोरंजन प्रकार
AI Fruit videos : फळांच्या व्हायरल लव्हस्टोरीत महिलांवर अश्लिल जोक-घाणेरड्या कमेंट, जगभर चर्चेचा नवा विषय
गेल्या आठवडाभरात अनेकांनी एआय फ्रुट्स व्हिडिओ पाहिले. फिरवले-पुढे ढकलले. ते पाहताना काहींना गंमत वाटली, हसू आले. मनोरंजनाच्या नावाखाली ते लोकप्रियही झाले, मिलिअन्स व्ह्यूजची चर्चा झाली. जेन झीला तर ते प्रचंड आवडले. मात्र त्या व्हिडिओत महिलांचा छळ करणं, अपमान करणं, त्यांना मारणं, बावळट मूर्ख म्हणणं हे इतकं सर्रास दाखवण्यात आलं आहे की, जसं काही असंच वागणं ‘नॉर्मल’ असावं. (social viral)आता त्यावर जगभर चर्चाही होते आहे पण काहींचं म्हणणं की त्यात काय एवढं, मनोरंजन तर आहेच. पण महिलांवर होणारे लिंगभेद करणारे विनोद जसे सर्रास केले जातात आणि त्यात अजूनही कुणाला काही अपमानास्पद वाटत नाही तशी ही नवीन एआयफळेही हेच रुजवत आहेत की बायका दुय्यम असतात, त्यांना टाचेखाली ठेवा.(new trend)
हे एआय फ्रुट्स व्हिडिओ टीव्हीवरच्या मालिकांसारखेच आहेत. टिपिकल सोप ॲपेरा. त्यात काही महिला फळं आहेत तर काही पुरुष फळं. स्ट्रॉबेरीचं नाव आहे स्ट्रॉबेरिना, केळी अर्थात बनानाचं नाव आहे बनोनिया. या व्हिडिओंत या महिला फळांचा पुरुष फळं येताजाता अपमान करतात, त्यांच्यावर ओरडतात, त्यांना मारतात. आणि अगदी टोकाची मारहाण करतात, घरगुती हिंसाचार असावी तसं. (animation)अत्यंत जुनाट आणि अतिशय लिंगभेदी स्टिरिओटाइप्स त्यात वापरण्यात आले आहेत. महिलांना टार्गेट करत, त्या दुय्यम आहेत आणि त्यांनी तसंच रहायला हवं हे ही एआय फळं बिंबवतात!अनेकांनी या साऱ्यावर आक्षेप घेतला. समाजमाध्यमात चर्चाही झाली. त्यावर असा युक्तिवादही करण्यात आला की, ज्यात त्यात लोक गंभीर का होतात? ते साधं मनोरंजन आहे. मात्र हा युक्तिवादच चुकीचा आहे. वयात येणाऱ्या किंवा तरुण मुलांना हे सर्रास सांगितलं जात आहे की, महिलांशी असंच वागलं पाहिजे. त्यांची नजर त्यातून मरतेय. सिनेमातही अल्फा मेल नावाचा नायक तरुण पिढीला भुरळ घालतोय, तो मैत्रीण, बायको, बहीण यांना आपली मालकी असल्यासारखं वागवताना दिसतो. प्रोटेक्टर होतो. तेच आता ही एआयफळं करत आहेत.एआयला शिकवून, प्रॉम्प्ट देऊन तयार करण्यात आलेले हे व्हिडिओ मनोरंजनाच्या नावाखाली लिंगभेद करत आहेत.व्हिडिओ तर असे तयार होत राहणार, पण आपण आणि आपली मुलं गंमत, मनोरंजन या नावाखाली काय पाहतो आहोत हे तपासून पाहणं मात्र गरजेचं आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : AI Fruit Videos: Viral stories spark sexism debate; women demeaned.
Web Summary : AI fruit videos, popular for entertainment, face criticism for promoting sexism. Female fruit characters are often abused and demeaned, reinforcing harmful stereotypes and raising concerns about influencing young audiences. Questioning if entertainment normalizes gender bias is crucial.
Web Title : एआई फ्रूट वीडियो: वायरल कहानियों से लिंगभेद बहस; महिलाओं का अपमान।
Web Summary : एआई फ्रूट वीडियो, मनोरंजन के लिए लोकप्रिय, लिंगभेद को बढ़ावा देने के लिए आलोचना का सामना करते हैं। महिला फल पात्रों को अक्सर दुर्व्यवहार और अपमानित किया जाता है, हानिकारक रूढ़ियों को मजबूत किया जाता है और युवा दर्शकों को प्रभावित करने के बारे में चिंताएं बढ़ जाती हैं। क्या मनोरंजन लिंग पूर्वाग्रह को सामान्य करता है, यह सवाल महत्वपूर्ण है।