अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) लोकप्रियता तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याविषयी नव्याने काही सांगण्याची अजिबातच गरज नाही. पण आता तिच्यासारखीच लोकप्रियता तिच्या पतीला म्हणजेच डॉ. श्रीराम नेने यांना मिळत आहे. काही वर्षांपुर्वीपर्यंत ते माधुरीचे पती म्हणून ओळखले जायचे. पण आता मात्र डॉ. श्रीराम नेने म्हणून ते ओळखले जात असून त्यांचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंगही खूप जास्त आहे. त्यांनी आरोग्याविषयी शेअर केलेल्या पोस्टसुद्धा खूप व्हायरल होत असतात. आता सुद्धा जागतिक महिला दिनानिमित्त (Women's Day 2025) त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टद्वारे त्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे स्थान असणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या सुखी संसाराचे गुपित सांगून ते त्यांच्या पत्नीसाठी म्हणजेच माधुरीसाठी काय करतात हे सुद्धा सांगितले आहे..(actress Madhuri Dixit's husband Dr. Shriram Nene shared secret of his happy married life)
डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र
महिला दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. नेने म्हणतात की आपण वर्षातला एक दिवस महिला दिन साजरा करतो. पण मग उरलेल्या ३६४ दिवसांचे काय महिला दिन हा फक्त १ दिवसाचाच का असावा वर्षातले सगळे दिवस महिलांना महिला दिनी जो गौरव दिला जातो तो मिळायला हवा.
उन्हाळ्यात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? कापसाचा बोळा घेऊन करा 'हा' उपाय- पाली घरातून गायब होतील
ते असंही म्हणतात की पुरुषांनी आपल्या घरातील महिलांच्या मागे खंबीरपणे उभे असणे गरजेचे आहे. कारण घर सांभाळण्यात, मुलांना माेठं करण्यात पुरुषांपेक्षाही महिलांचे योगदान जास्त असते. पण ती काही फक्त घरातील महिलांचीच कामे नाहीत. त्या कामात बरोबरीने पार्टनरशिप हवी आणि नवरा- बायको दोघांनी मिळून ती करायला पाहिजेत. त्यांच्या संसारातही हेच होतं. दोघंही घर, मुलं याकडे समान लक्ष देतात. कदाचित त्यांच्या याच गोष्टीमुळे माधुरीलाही तिच्या कामात, तिच्या आवडीच्या गोष्टीमध्ये पुरेसा वेळ देता येत असेल.
आज बऱ्याच घरांमध्ये आपण हेच चित्र पाहातो की नवरा आणि बायको दोघेही कमावत असतात. दोघेही कामासाठी घराबाहेर पडतात आणि सायंकाळी घरी येतात.
पण घरी आल्यानंतर नवरा निवांत बसतो आणि बायकोला स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, घरकाम अशा अनेक गोष्टी बघाव्या लागतात. यामध्ये कुठेतरी बदल होण्याची गरज आहे आणि डॉ. नेने सांगतात तशी कामातली पार्टनरशिप घरोघरी येणं आवश्यक आहे. नाही का?