Join us

एक्सपर्ट सांगतात- महिलांनो फक्त ३ गोष्टी करा, महिनाभरात वजन उतरून 'फॅट'च्या 'फिट' व्हाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 15:53 IST

1 / 6
वाढतं वजन हा तुमच्यासाठीही त्रासदायक विषय ठरत असेल तर तुमचा हा प्रश्न आता काही दिवसांतच सुटला म्हणून समजा..(3 important rules for fast weight loss)
2 / 6
वजन कमी करण्यासाठी महिलांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टरांनी अगदी साध्या सोप्या ३ गोष्टी सांगितल्या असून त्या काही दिवस नियमितपणे करून पाहा..(weight loss tips specially for women)
3 / 6
डॉक्टरांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे फास्टिंग. पण ते उपवास योग्य पद्धतीने व्हायला हवे. म्हणजेच महिन्यातून एखादा दिवस कोणतेही शिजवलेले अन्न खाऊ नका. फळं, ज्यूस, ताक असं तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात साचलेले जास्तीचे फॅट्स एनर्जीच्या स्वरुपात तुमच्या शरीराकडून वापरले जातात. त्यामुळे आपोआपच शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
4 / 6
दुसरा उपाय म्हणजे व्यायाम करणे. याविषयी डॉक्टर असं सुचवतात की करायचा म्हणून व्यायाम करू नका. तर दर दिवशी तुमच्याकडून तो व्यायाम करण्यात काही ना काही सुधारणा झाली पाहिजे याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ तुम्ही रोज ५ किमी सायकलिंग करता तर हे चांगलेच आहे. पण त्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला हळूहळू कमी करता येईल का, तुम्ही अधिक वेगात सायकलिंग करू शकाल का, यासाठी प्रयत्न करा..
5 / 6
तिसरा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बहुसंख्य व्यक्तींचा पाय नेमका तिथेच घसरतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुम्ही वरच्या दोन्ही गोष्टी कितीही चांगल्या पद्धतीने केल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रत्येकवेळी गोड खाताना आपण किती जास्त कॅलरी खात आहोत आणि त्याचा आपल्या वजनावर, तब्येतीवर काय परिणाम होऊ शकेल, याचा विचार स्वत:शीच करा आणि त्यानंतर तो पदार्थ किती प्रमाणात खाणे योग्य ते ठरवा..
6 / 6
हे काही नियम पाळले तर भराभर वजन कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते. काही दिवस या तिन्ही गोष्टी करून पाहायला हरकत नाही.
टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सव्यायामअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४महिला