Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नव्या वर्षात झटपट वेटलॉस करण्यासाठी ७ साधे- सोपे उपाय, काही महिन्यांतच व्हाल एकदम फिट, स्लिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2025 09:35 IST

1 / 8
वजन कमी करायचं असेल पण तुमच्याकडून हेवी वर्कआऊट किंवा एकदम हार्ड डाएटिंग होत नसेल तर या काही साध्यासोप्या गोष्टी करून पाहा...(weight loss resolution for new year)
2 / 8
आहारातलं तेल खूप कमी करा. रोज जेवढ्या तेलात स्वयंपाक करता त्याच्या अर्धच तेल वापरा.(weight loss tips for new year 2026)
3 / 8
गोड पदार्थही कमी करा. चहा गोड आवडत असेल तर प्या. पण दिवसातून दोनवेळा चहा घेत असाल तर आता एकदाच घ्या. इतर गोड पदार्थ खाणं टाळा. किंवा खायचंच असेल तर अगदी एक- दोन घासच खा.(simple weight loss hacks for new year)
4 / 8
रोज खूप नाही पण १० मिनिटे तरी स्ट्रेचिंग, सुर्यनमस्कार असे घरच्याघरी व्यायाम करा. शरीराला योग्य आकार येऊन फिट राहण्यास मदत होते.
5 / 8
जेवणाच्या सुरुवातीला सॅलेड, कडधान्यांच्या उसळी खा. यामुळे प्रोटीन्स, फायबर मिळतात आणि कार्ब्स आपोआप कमी खाल्ले जातात.
6 / 8
जेवणाच्या वेळा आणि तुमचा आहार निश्चित करा. खूप आवडलं किंवा समोर आलं म्हणून खूप खाल्लं असं करू नका.
7 / 8
रोज एक तरी हंगामी फळ खा. फळांमधून ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.
8 / 8
शक्य असेल तिथे दुचाकीचा, लिफ्टचा वापर करणं टाळा. त्याऐवजी चालत जा.
टॅग्स : नववर्ष 2026वेट लॉस टिप्सअन्नफळेव्यायाम