Join us

वेटलॉससाठी तुम्हीसुद्धा 'हे' ६ शॉर्टकट वापरत असाल तर थांबा! वजन कणभर कमी होणार नाही, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 10:22 IST

1 / 10
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा (Weight Loss From These Techniques Can Be Harmful) खूप प्रयत्न करतो. परंतु काहीवेळा एक्सरसाइज, डाएट योग्य पद्धतीने फॉलो करून देखील वजन कमी होत नाही. अशावेळी आपण झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे शॉर्टकट वापरण्याचा सोपा पर्याय निवडतो.
2 / 10
वजन जलद गतीने कमी करण्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट (Things You Should Never Do to Lose Weight ) नसतात. याउलट वजन जर चुकीच्या पद्धतीने कमी केले किंवा काही शॉर्टकट वापरले तर वजन तर कमी होणार नाहीच पण आरोग्यावर देखील होतील अनेक वाईट परिणाम.
3 / 10
यासाठीच, कोणत्या ६ चुकीच्या पद्धतीने वजन कमी (The Surprisingly Most Unhealthy Ways to Lose Weight) करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते ते पाहूयात.
4 / 10
काहीजण जलद गतीने वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील खाणं स्किप करतात, किंवा काहीवेळा कमी प्रमाणांत खातात. याचबरोबर, काहीजण फक्त फळं किंवा भाज्याच खातात अशा पद्धतीने क्रश डाएट करून वजन कमी करणे ही चुकीची पद्धत आहे. असे केल्याने आपल्या शरीरात पोषण मूल्यांची कमतरता निर्माण होऊन थकवा येऊ शकतो.
5 / 10
वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणे आवश्यक असते परंतु गरजेपेक्षा जास्त एक्सरसाइज करणे देखील हानिकारक ठरते. ओव्हर एक्सरसाइज केल्याने मसल्स कमजोर होऊ शकतात. ज्यामुळे हाडांचा मजबूतपणा कमी होऊन हार्मोनल इम्बॅलेन्स होऊ शकतो.
6 / 10
वजन कमी करण्यासाठी फॅट बर्निंग सप्लिमेंट्स घेतल्याने वजन कमी होत नाही. परंतु वारंवार अशा सप्लिमेंट्स घेतल्याने त्यातील हानिकारक केमिकल्समुळे हार्ट प्रॉब्लेम्स, हाय ब्लडप्रेशर आणि लिव्हर डॅमेज असे अनेक आजार होऊ शकतात.
7 / 10
लिक्विड डाएट या प्रकारांत फक्त फळं - भाज्या यांचे रस आणि डिटॉक्स वॉटर पिऊन लिक्विड डाएट केले जाते. काही न खाता फक्त अशा प्रकारचे लिक्विड डाएट करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
8 / 10
काहीजण वजन कमी करण्यासाठी फक्त प्रोटीन आणि कर्बोहायड्रेडयुक्त आहार घेण्यावर अधिक भर देतात. ज्यामुळे शरीरात इतर आवश्यक पोषणमूल्यांची कमतरता निर्माण होऊन शारीरिक थकवा किंवा हार्मोनल इम्बॅलेन्स होऊ शकतो. याचबरोबर, पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊन पचनक्रिया बिघडू शकते.
9 / 10
वजन कमी करण्यासाठी भूक न लागण्याची औषधे घेणे हा चुकीचा पर्याय आहे. कालांतराने या औषधांचा आपले हृदय, पोट आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
10 / 10
काहीजण वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याऐवजी फक्त ग्रीन टी - ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात, जे संपूर्णपणे चुकीचे आहे. ग्रीन टी - ब्लॅक कॉफी मेटाबॉलिज्मचा वेग वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. परंतु जास्त प्रमाणात प्यायल्यास डिहायड्रेशन,अ‍ॅसिडिटी आणि झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स