रात्री जेवण झाल्यावर या ८ गोष्टी करा, जीमला न जाता झरझर उतरेल चरबी; सुडौल-बारीक दिसाल
Updated:January 8, 2026 10:44 IST2026-01-08T10:29:29+5:302026-01-08T10:44:35+5:30
Weight Loss Diet : रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात जिरं किंवा बडिशेप घालून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो.

वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाबाबत आणि सवयींबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी करावे. जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. (Do These 8 Thing After Dinner To Lose Weight)
रात्रीच्या आहारात मूग डाळीची खिचडी, सूप किंवा भाज्यांचे प्रमाण जास्त असावे आणि कार्ब्स कमी असावेत. (Weight Loss Diet)
आहारात पनीर, डाळी किंवा अंड्यांचा पांढरा भाग यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा. ज्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.
वणादरम्यान जास्त पाणी पिऊ नये. जेवणाआधी अर्धा तास किंवा जेवणआनंतर अर्ध्या तासानं पाणी प्यावे.
रात्रीच्या जेवणात मीठ कमी वापरा आणि साखरेच्या पदार्थांपासून लांब राहा कारण यामुळे शरीरात पाणी साचून राहते.
जेवण झाल्यावर लगेच झोपण्याऐवजी १० ते १५ मिनिटं संथ गतीनं चाला. जेवताना मोबाईल किंवा टिव्ही पाहू नये यामुळे आफण गरजेपेक्षा जास्त जेवतो.
पचनशक्ती सुधारण्यासाठी जेवणानंतर ५ ते १० मिनिटं संथ गतीनं चाला. वल्यानंतर बेडवर लगेच आडवे पडू नका. यामुळे एसिडीटी किंवा छातीत जळजळ वाढते.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात जिरं किंवा बडिशेप घालून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. वेळेवर झोपणं महत्वाचं आहे कारण अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात आणि वजनही वाढते.